PPC चा अर्थ काय? PPC information in Marathi
आपल्याला जर आपला बिझनेस जगभरात पसरवायचा असेल तर आजच्या ह्या स्पर्धेच्या युगात आपल्याला आपल्या प्रोडक्ट सर्विसची डिजीटल पदधतीने आँनलाईन मार्केटिंग करणे फार गरजेचे झाले आहे.
आणि पीपीसी हा एक असा शब्द आहे जो आपणास डिजीटल मार्केटींगच्या क्षेत्रात नेहमी ऐकायला मिळतो.पण याचा नेमका काय अर्थ होतो हे आपल्यापैकी बहुतेक जणांना माहीत नसते.
म्हणुन आजच्या लेखात पीपीसी म्हणजे काय?पीपीसीचा फुल फाँर्म काय होतो?पीपीसीचे विविध क्षेत्रात काय अर्थ होतात हे देखील आपण जाणुन घेणार आहोत.
PPC चा फुल फाँर्म काय होतो?
PPC चा फुल फाँर्म (pay per click) असा होत असतो.पीपीसी ही एक मेथड आहे जिचा वापर करून आपण आपल्या बिझनेसची जगभर आँनलाईन डिजीटल पदधतीने मार्केटींग करू शकतो.
Pay per Click म्हणजे काय?
गुगलच्या ज्या अँड विविध ब्लाँग वेबसाईटवर आपणास दिसुन येत असतात.त्या अँडवर विविध अँडव्हटायझरने आपल्या प्रोडक्ट सर्विसेसची आँनलाईन जाहीरात करण्यासाठी आपले पैसे लावलेले असतात.
एका अँडवर क्लीक करण्याचे जेवढे पैसे अँडव्हरटायझर देणार असतो त्याला pay per click असे म्हटले जाते.
थोडक्यात एका जाहीरातीवर क्लीक करण्याचे जेवढे पैसे अँडव्हरटाईझर देत असतो,जेवढा खर्च एका जाहीरातीवर क्लीक करण्याचा अँडव्हरटायझर करत असतात त्याला pay per click म्हटले जाते.
PPC marketing कशाला म्हणतात?
PPC म्हणजे pay per click हे इंटरनेट द्वारे आँनलाईन पदधतीने मार्केटिंग करण्याचे एक मॉडेल आहे ज्यामध्ये जाहिरातदार प्रत्येक वेळी त्यांच्या जाहिरातींवर क्लिक करण्यासाठी काही पैसे देतात.
जेव्हा आपण Google वर काही सर्च करतो तेव्हा आपल्याला खाली चित्रात काही सर्च अँड दिसुन येत असतात,त्यालाच PPC अँड असे म्हणतात.
PPC adds चे प्रकार कोणकोणते असतात?
जेव्हा आपण गुगलच्या सर्च इंजिनवर जाऊन एखादा किवर्ड टाईप करून त्यावर माहीती शोधत असतो.तेव्हा आपल्याला दोन प्रकारचे सर्च रिझल्ट दिसुन येत असतात.
1) organic search result :
2) paid search result :
1)organic search result :
यात आपण आपल्या प्रोडक्ट सर्विसची जाहीरात वेबसाईट दवारे गुगलवर एससीओ करून आपली वेबसाईट टाँपला रँक करून करत असतो.
आणि यात जी ट्रँफिक आपल्या वेबसाईटवर येत असते तिला organic traffic असे म्हटले जाते.
यात आपल्याला गुगलला पैसे देण्याची आवश्यकता नसते फक्त आपल्या वेबसाईटवर आँरगँनिक ट्रँफिक येण्यासाठी चांगल्या पदधतीने आँन पेज एससीओ करायची आवश्यकता असते.जेणेकरून आपली साईट गुगलवर टाँपला रँक करेल.
2) paid search result :
यात आपण आपल्या प्रोडक्ट सर्विसची जाहीरात वेबसाईट दवारे गुगलवर करण्यासाठी आपली वेबसाईट टाँपला रँक करत असतो ज्याचे पैसे देखील आपल्याला द्यावे लागत असतात.
आणि यात जी ट्रँफिक आपल्या वेबसाईटवर येत असते तिला paid traffic असे म्हटले जाते.
यात आपल्याला गुगलला पैसे द्यावे लागतात आणि यात आपल्याला आपल्या वेबसाईटवर आँरगँनिक ट्रँफिक येण्यासाठी चांगल्या पदधतीने आँन पेज एससीओ करायची आवश्यकता देखील पडत नाही.कारण आपण पैसे खर्च करून पेड ट्रँफिक घेतलेली असते.
PPC adds चे charges काय असतात?
पीपीसीचे चार्ज हे आपण लोकेशन काय निवडतो अँड रन करण्यासाठी यावर अवलंबुन असतात जर आपण आपल्या शहरापुरता अँड चालवत असेल तर आपल्याला कमी खर्च लागतो.
पण याच ठिकाणी आपण एखाद्या फाँरेन कंट्रीला टारगेट केले असेल तर आपल्याला जास्त चार्ज पे करावे लागतो.
याचसोबत आपण किवर्ड जर हाय रेटेड टारगेट केला असेल म्हणजे हाय सीपीसी किवर्ड टारगेट केला असेल तर त्याचा देखील आपल्याला जास्त चार्ज द्यावा लागत असतो.
पण जर आपण टारगेट केलेला किवर्ड लो सीपीसी असेल तर आपल्याला जाहीरातीसाठी कमी खर्च लागतो.
PPC ads चे फायदे कोणकोणते असतात?
आपण आपल्या प्रोडक्ट सर्विसेसची आँनलाईन पाहिजे त्या लोकेशनमध्ये जाहीरात करू शकतो.
आपण आपला sell आणि revenew वाढवू शकतो.आपल्या बिझनेसची मार्केटिंग करू शकतो.
आँफलाईन पेक्षा खुप कमी खर्चात आपल्या बिझनेसची आँनलाईन डिजीटली मार्केटिंग करता येते.
आपल्याला आपल्या प्रोडक्ट सर्विसेसची कोणत्या लोकेशनवर मार्केटिंग करायची आहे तसेच कोणत्या देशातील कस्टमर्सला कुठल्या किव्डवर टारगेट करायचे आहे हे आपण स्वता ठरवू शकतो.
PPC चे other full forms कोणकोणते आहे?
1)PPC full form in economics
PPC चा फुल फाँर्म (production possibilities curve असा होतो.
2) PPC full form engineering
PPC चा फुल फाँर्म (production planning and control असा होतो.
3)PPC full form in digital marketing
PPC चा फुल फाँर्म (pay per click) असा होतो.
4)PPC full form in cement
PPC चा फुल फाँर्म (portland pozzolana cement असा होतो.
5) PPC full form in banking
PPC चा फुल फाँर्म (pay per click) असा होतो.
6) PPC full form in computer
PPC चा फुल फाँर्म (pointer to pointer to checker तसेच powe processing chip असा होतो.
7) PPC full form in medical terms
PPC चा फुल फाँर्म (patient priorities care ) असा होतो.