क्यु आर कोड स्कॅम म्हणजे काय ? | QR Code Scam information In Marathi
आपल्या दैनंदिन जीवनात रोज पैशांची देवाणघेवाण करण्यासाठी तसेच डिजीटल पद्धतीने कोणालाही आॅनलाईन पेमेंट करण्यासाठी आपला मोबाईल युझ करत असलेल्या प्रत्येक मोबाईल युझरसाठी आजचा हा लेख महत्वाचा ठरणार आहे.
मित्रांनो क्यु आर कोडच्या मा़ध्यमातुन आॅनलाईन पेमेंट करणारया प्रत्येक व्यक्तीला क्यु आर कोड स्कॅम काय असतो यात लोकांची कशा पद्धतीने फसवणुक केली जाते या फसवणुकीपासुन आपला बचाव करण्यासाठी आपण काय करायला हवे हे माहीत असणे गरजेचे आहे.
याचकरीता आज आपण क्यु आर स्कॅम कोड हया विषयावर आज माहीती जाणुन घेणार आहोत.
क्यु आर कोड म्हणजे काय? QR Code Meaning In Marathi
क्यु आर कोड म्हणजे Quick Response Code होय.हा एक अतिशय जलदगतीने काम करणारा कोड असतो.
एक काळया कलरचा बाॅक्स असतो त्यात एक पॅटर्न दिलेले असते.त्या पॅटर्न मध्येच आपला मोबाईल नंबर अणि युआर एल हाईड केला जात असतो.
क्यु आर कोडचा वापर कुठे अणि कसा केला जातो?
आपल्याला क्यु आर कोडच्या मा़ध्यमातुन जेव्हा आॅनलाईन पदधतीने पेमेंट करायचे असते तेव्हा आपण हा बाॅक्स मध्ये दिलेला क्यु आर कोड आपल्या मोबाईल मध्ये असलेल्या गुगल पे फोन पे मधील Scan Any Qr Code मध्ये जाऊन क्यु आर कोड स्कॅनरदवारे क्यु आर कोडची प्रतिमा स्कॅन करत असतो.
यानंतर ज्याला आपण पेमेंट करतो आहे त्याचे नाव येत असते.खाली पेमेंटचे आॅप्शन देखील येते.मग खाली पेमेंटच्या आॅप्शन मध्ये जाऊन आपल्याला किती पैसे पाठवायचे आहे ती रक्कम टाकुन पेमेंट करायचे असते.
आजकाल सर्व जग डिजीटल होत चालले आहे म्हणून सर्व छोटेमोठे दुकानदार,विक्रेते,माॅॅल वाले कस्टमरकडून आॅनलाईन पेमेंट स्वीकारण्यासाठी दुकानात क्यु आर कोडचा वापर करताना आपणास दिसून येतात.
आपणास वस्तु घेतल्यावर हा दिलेला क्यु आर कोड स्कॅन करायचा असतो आणि कोड स्कॅन केल्यावर जे नाव येईल त्या दिलेल्या नावावर आपल्याला घेतलेल्या वस्तुचे पेमेंट करायचे असते.
याचसोबत क्यु आर कोड हा वस्तु प्रोडक्ट यांच्यावर सुदधा दिला जातो हा वस्तुवर दिलेला क्यु आर कोड स्कॅन केल्यावर आपणास त्या वस्तुची सर्व माहिती प्राप्त होते.क्यु आर कोडचा वापर विविध व्यवसायांमध्ये देखील केला जातो.
गुगल पे फोन पे सारख्या अॅपवरून आॅनलाईन पेमेंट करत असताना ज्या अॅपवरून आपण पेमेंट करतो आहे तिथे क्यु आर कोड स्कॅन करायचे आॅप्शन पण दिलेले असते.
किंवा आपण स्वताचा क्यु आर कोड जनरेट करू शकतो. क्यु आर कोड जनरेट करण्यासाठी आपण वेगवेगळ्या क्यु आर कोड जनरेटिंग आॅनलाईन वेबसाईट तसेच प्ले स्टोअर मधील दिलेल्या क्यु आर कोड जनरेटिंग अॅप्सचा वापर देखील करू शकतो.
क्यु आर कोड स्कॅम काय आहे?
हा एक स्कॅम आहे.ज्यात मोबाईल वापरकर्ते इंटरनेट युझर फसताना दिसुन येतात.
१) फिशिंग स्कॅम –
यात होते असे की मोबाईल इंटरनेट युझर आपली बॅक डिटेल तसेच इतर संवेदनशील माहीती प्रविष्ट करून एखाद्या अनधिकृत अनोळखी शाॅपिंग वेबसाईटवर जाऊन काही आॅनलाईन खरेदी वगैरे करत असतात.
हा व्यवहार करत असताना मोबाईल युझर आपले पेमेंट करत असताना आपली बॅक डिटेल देखील टाकत असतात.जसे की अकाऊंट नंबर क्रेडिट कार्ड नंबर इत्यादी.
अणि युझरने टाकलेली हीच बॅक डिटेल हे स्कॅमर कॅप्चर करत असतात.
अणि मग त्याची इंटर केलेली सर्व बॅक डिटेल कॅप्चर करून झाल्यावर त्या इंटरनेट युझरच्या परवानगीशिवाय त्याच्या खात्यातुन पैसे काढत असतात.किंवा त्याच्या इंटर केलेल्या वैयक्तिक माहितीचा एखाद्या चुकीच्या कामासाठी गैरवापर करत असतात.
उदा,बनावट ईमेल, फ्लायर, पत्र, संदेश, जाहिराती इ.
इंटरनेट युझर सोबत क्यु आर कोड स्कॅम करण्यासाठी इंटरनेट युझरची आॅनलाईन फसवणुक करण्यासाठी त्यांचा पर्सनल डेटा,बॅक डिटेल प्राप्त करण्यासाठी ज्या फेक वेबसाईट स्कॅमर बनवत असतात त्यांची डिझाइन त्यांनी अशा पध्दतीने केलेली असते युझरला वाटते जणु ती एक फेक फसवेगिरी करण्यासाठी बनवलेली वेबसाईट नव्हे तर आॅफिशिअल अणि जेन्युअन वेबसाईट आहे.
२) मालवेअर स्कॅम-
यात मोबाईल तसेच इंटरनेट वापरकर्त्याच्या डिव्हाईस मध्ये मालवेअर डाउनलोड करण्यासाठी काही QR कोड वापरले जातात.
जेव्हा मोबाईल तसेच इंटरनेट युझर हा QR कोड स्कॅन करतात,तेव्हा नकळत त्यांच्या मोबाईल मध्ये मालवेअर इंस्टॉल होत असते.
जे त्यांची मोबाईल मधील सर्व वैयक्तिक माहिती जसे की बॅक डिटेल क्रेडिट कार्ड डिटेल्स इत्यादी चोरू शकते किंवा मोबाईल इंटरनेट वापरकर्त्याच्या डिव्हाईसला खराब करू शकते.
३) फ्राॅडलन्ट पेमेंट स्कॅम –
काही प्रकरणांमध्ये,फसव्या खात्यांमध्ये पेमेंट करण्यासाठी लोकांना फसवण्यासाठी QR कोडचा वापर करण्यात येत असतो.
उदाहरणार्थ, एखाद्या दुकानातील तसेच स्टोअरमधील बनावट उत्पादनावर QR कोड ठेवला जाऊ शकतो आणि जेव्हा लोक पेमेंट करण्यासाठी QR कोड स्कॅन करतात तेव्हा पैसे वैध विक्रेत्याऐवजी स्कॅमरकडे जाऊन लागतात.
मोबाईल तसेच इंटरनेट वापरकर्त्यानी कोणती काळजी घ्यायला हवी?
म्हणुन इंटरनेट मोबाईल वापरकर्त्यानी अशा क्यु आर कोड घोटाळ्यांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी नेहमी कोड स्कॅन करताना सावधगिरी बाळगणे आणि साइट किंवा माहिती अॅक्सेस केली जात असल्याची वैधता सत्यापित करणे खुप महत्वाचे आहे.
जर आपल्याला दिलेल्या क्युआर कोडच्या सुरक्षिततेबद्दल खात्री नसेल,तर अशा परिस्थितीत आपण QR कोड रीडरचा वापर करू शकतो.जो कुठलीही वेबसाइट उघडण्यापूर्वी तुमच्यासाठी तिची तपासणी करत असतो.
याचसोबत आपण आपली कुठलीही संवेदनशील गोपनीय माहिती,जसे की लॉगिन क्रेडेन्शियल क्रेडिट डिटेल्स किंवा बॅक खाते नंबर अशी आर्थिक माहिती कुठेही उघड न करण्याची देखील काळजी घेतली पाहिजे.
किमान तोपर्यंत जोपर्यंत आपल्याला पुर्णपणे खात्री होत नाही की सदर साइट फेक तसेच बनावट नाहीये.इथे आपली कुठलीही फसवणुक होणार नाही.अणि आपला डेटा देखील सेफ राहील.
क्यु आर कोड स्कॅमचा मुख्य हेतु काय असतो?
इंटरनेट युझरला काहीतरी आमिष दाखवून आपल्या वेबसाईटच्या पेजवर आणने अणि त्याची वैयक्तिक संवेदनशील माहिती डेटा बॅक डिटेल प्राप्त करणे.
मग त्या डिटेल्सचा वापर करून फसवलेल्या युझरच्या खात्यातुन पैसे चोरणे,त्याची प्राप्त केलेली सर्व माहिती डेटा वाईट तसेच चुकीच्या कामासाठी वापरणे.
हे फसवणुक करणारे क्युआर आर कोड मध्ये फसवे मालवेअर साॅपटवेअर इम्बेड करू शकतात.ज्याने क्यु आर कोड स्कॅन करणार्यां व्यक्तींचा संवेदनशील डेटा त्यांच्याकडे जाऊ शकतो.
क्यु आर कोड स्कॅमर कोणकोणत्या मार्गाने क्यु आर कोड स्कॅम करू शकतात?
क्यु आर कोड स्कॅमर हे मोबाईल युझरने त्यांचा क्यु आर कोड स्कॅन करावा यासाठी हे फसवणुकीचा धुर्त मार्ग देखील वापरू शकतात.
हे आपणास असे भासवतात जसे की हे एखाद्या पैशांच्या अडचणीत आहे अणि आपणास रक्कम परत देण्याचे वचन देतात.मग वापरकर्त्याने क्युआर कोड स्कॅन केला तर यांचे काम होऊन जाते.
क्यु आर कोड स्कॅमर हे मोबाईल वापरकर्त्याला एखादी वस्तू/सेवा खरेदीसाठी रक्कम पाठवण्याच्या बहाण्याने QR कोड स्कॅन करण्यास सांगु शकतात आणि त्याचे खाते क्षणात रिकामे करू शकतात.
क्यु आर कोड स्कॅमर हे मोबाईल वापरकर्त्यांना गुगलवर अपलोड केलेल्या फसव्या सेवा/गॅस/हेल्पडेस्क/रेस्टॉरंट नंबरवर कॉल करण्यास सांगत असतात
तसेच मोबाईल वापरकर्त्याच्या बँकेचा तपशील कॅप्चर करता यावा आणि आपल्या खात्यातील पैसे त्यांना काढता यावे म्हणून त्यांनी दिलेला QR कोड कोणत्या ना कोणत्या बहाण्याने युझरला स्कॅन करण्यास देखील सांगत असतात.
क्यु आर कोड स्कॅममुळे उदभवणारे संभाव्य धोके कोणते आहेत?
- आर्थिक नुकसान होते आपल्या अकाऊंट मधील सर्व पैसे क्षणात जाऊ शकतात.अणि आपण कंगाल होऊ शकतो.आपली ओळख देखील चोरी होऊ शकते.ज्याने आपला क्रेडिट स्कोअर देखील खराब होऊ शकतो.
- आपली प्राप्त केलेली वैयक्तिक माहिती डेटा बॅक डिटेल स्कॅमर कडुन कुठल्याही एखाद्या चुकीच्या कामासाठी वापरला जाऊ शकतो.ज्याने आपल्या सामाजिक प्रतिष्ठेला देखील हानी पोहोचण्याची शक्यता असते.
क्यु आर कोड स्कॅमरपासुन बचावासाठी उपाय –
- ज्यावर आपला विश्वास नाही असे क्युआर कोड स्कॅन करणे टाळावे.क्यु आर कोड द्वारे पेमेंट करण्यासाठी नेहमी गुगल पे फोन पे अशा सेफ अॅपचा वापर करावा.
- एक गोष्ट लक्षात ठेवायची की क्यु आर कोड हा फक्त आॅनलाईन पेमेंट करण्यासाठी वापरला जात असतो.
- आपल्या मोबाईल डिव्हाईस मध्ये कुठलेही मालवेअर प्रवेश करू नये म्हणून मोबाईल मध्ये अॅनटी व्हायरस साॅफ्टवेअर डाऊनलोड करून घ्यायचे आहे.
- काही कारणास्तव एखाद्या व्यक्तीने मदतीसाठी QR कोड स्कॅन करण्याची विनंती केल्यावर मदत नाकारायला आणि अनोळखी व्यक्तीला स्पष्टपणे नाही म्हणायला शिका.
- मेल/मेसेजेस/फ्लायर्स इ.मध्ये प्रदान केलेले ग्राहक सेवा किंवा सेवा केंद्रांचे संपर्क तपशील किंवा मोबाइल नंबर कधीही वापरू नये.
- गॅस बुकिंग,रेस्टॉरंट,बँका,ऑनलाइन फूड डिलिव्हरी,कस्टमर केअर इत्यादींकरीता गुगल सर्चमध्ये सापडलेला संपर्क क्रमांक कधीही वापरू नये,कारण हे असे नंबर चुकीचे अणि फसवेगिरी करणारे देखील असू शकतात.
- जर आपणास वास्तविक संपर्क तपशील हवा असेल तर त्यासाठी नेहमी केवळ अस्सल अणि जेन्युअन वेबसाइटला भेट द्यावी.