रक्षाबंधन निबंध अणि भाषण – Raksha Bandhan essay and speech in Marathi
रक्षाबंधन हा भारतातील अनेक महत्वाच्या सण उत्सवांपैकी एक आहे.रक्षाबंधन हा सण श्रावण महिन्यात येणारया महत्वाच्या सणांपैकी एक मानला जातो.
श्रावण महिन्यामध्ये पावसामुळे सगळीकडे हिरवेगार वातावरण झालेले असताना तसेच श्रावणाचे सौंदर्य चहुबाजुने पसरलेले असताना नारळी पौर्णिमेच्या दिवशी हा सण साजरा केला जात असतो.यंदा 2022 मध्ये रक्षाबंधन 11 आँगस्ट रोजी आहे.
रक्षाबंधन हा बहिण अणि भावाच्या पवित्र नात्याचा दिवस आहे.
या दिवशी बहिण आपल्या भावाला ओवाळते त्याच्या हातावर राखी बांधते भाऊ देखील बहिणीकडुन राखी बांधून घेतो अणि आपल्या बहिणीचे तो सदैव रक्षण करेल असे वचन देतो.बहिण राखी बांधत असताना आपल्या भावास दीर्घायुष्य लाभावे अशी देवाजवळ प्रार्थना करत असते.
ओवाळुन झाल्यानंतर बहिणीला भाऊ एखादी चांगली भेटवस्तु देतो.किंवा ताटात ओवाळणी म्हणुन पैसे ठेवत असतो.राखी हे बहिण भावाच्या अतुट अणि प्रेमाच्या नात्याचे प्रतिक मानले जाते.
हा दिवस बहिण अणि भाऊ या दोघांसाठी खुप महत्वाचा असतो.या दिवशी बहिण आपल्या भावाला हातात बांधण्यासाठी बाजारातुन छान डिझाईन असलेली राखी विकत घेते.रक्षाबंधनाच्या दिवशी परीधान करण्यासाठी स्वतासाठी नवीन कपडे खरेदी करते.त्याच्यासाठी गोडधोड खायला बनवते.
भाऊ देखील रक्षाबंधनासाठी नवीन कपडयांची खरेदी करतो.बहिणीसाठी बाजारातुन चांगली भेटवस्तु खरेदी करत असतो.
हा पवित्र दिवस हिंदु धर्मात मोठया आनंद अणि उत्साहात साजरा केला जातो.याचसोबत इतर धर्मात देखील हा दिवस मोठया उत्साहाने साजरा करण्यात येतो.असे म्हटले जाते की याने भावा बहिणीचे नाते अजुन बळकट होत असते.
रक्षाबंधनाची पौराणिक कथा –
पुराणात असे लिहिले गेले आहे की जेव्हा देवता अणि असुर यांच्यात घमासान युदध झाले तेव्हा राक्षसांचे पारडे युदधामध्ये जड पडु लागले.
युदधात पराभव होऊन इंद्रलोक गमावण्याच्या भीतीने इंद्रदेव बृहस्पतीकडे मदत मागण्यासाठी जातात.ही गोष्ट जेव्हा इंद्र देवाच्या पत्नीला ऐकु येते तेव्हा ती मंत्र मारून एक रेशीम पवित्र धागा तयार करते.अणि इंद्रदेवाच्या हातात बांधते.
अणि जेव्हा हा प्रकार घडला तो दिवस श्रावण महिन्यातील पौर्णिमेचा दिवस होता.सगळीकडे असे म्हटले जाऊ लागले की त्या धाग्यामुळेच इंद्राचा पराभव टळला.
हा पवित्र धागा आनंद,सामर्थ्य,विजयाचे प्रतिक मानला जाऊ लागला.त्यादिवसापासुन ह्या राखी बांधण्याच्या प्रथेस आरंभ झाला.