रक्षाबंधन राखी बांधण्याचा विधी,- Raksha Bandhan Shubh Muhurat 2022 In Marathi

रक्षाबंधन राखी बांधण्याचा विधी,- Raksha Bandhan Shubh Muhurat 2022 In Marathi

आपल्या खुप जणांना हा संभ्रम पडला आहे की 2022 मध्ये रक्षाबंधनचा सण अकरा आँगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे की बारा आँगस्टला.

अणि सगळयात महत्वाची गोष्ट म्हणजे रक्षाबंधनच्या दिवशी पुर्ण दिवसभर भद्राकाल राहणार आहे.जो राखी बांधण्यासाठी शुभ मानला जात नाही.

म्हणुन मग सुर्यास्ता नंतर रक्षाबंधन करावे की नाही?हे शुभ राहील की अशुभ असे देखील प्रश्न आपणास पडत आहे.

भावाला राखी बांधण्याची वेळ –

रक्षाबंधन 11 आँगस्ट रोजी 10 वाजुन 39 मिनिटांनी सुरू होणार आहे.अणि 12 आँगस्ट रोजी सकाळी 7 वाजून पाच मिनिटांनी समाप्त होणार आहे.

रक्षाबंधन कधी असणार आहे?

रक्षाबंधन 11 आँगस्ट 2022 रोजी आहे.अणि 11 आँगस्टलाच रक्षाबंधन साजरे देखील केले जाणार आहे.

कारण ह्या दिवशी त्रिमुहुर्त पौर्णिमा स्थिती असणार आहे.अणि शास्त्रात देखील सांगितले आहे की ज्या दिवशी त्रिमुहुर्त पौर्णिमा स्थिती असते तेव्हाच रक्षाबंधन साजरे केले जावे.पण याच दिवशी भद्राकाल संध्याकाळी ते रात्री 8.51 पर्यत असणार आहे.

म्हणून रात्री भद्रकालाची समाप्ती झाल्यानंतर ज्योतिष शास्त्रानुसार रक्षाबंधन सर्वत्र साजरा करण्यात येणार आहे.

किंवा अकरा आँगस्ट रोजी दिवसभरात भद्रकाल नसेल अशा शुभ मुहुर्तात देखील आपण आपल्या भावास राखी बांधुन घेऊ शकतात.

रक्षाबंधनच्या दिवशी भद्राकाल किती वाजेपासुन किती वाजेपर्यत असणार आहे?

11 आँगस्टला रक्षाबंधनच्या दिवशी भद्रकाल संध्याकाळ पासुन 5.17 ते 6.18 पर्यत असणार आहे.

See also  Influenza A H3n2 virus information in Marathi

मग पुन्हा संध्याकाळी 6 वाजुन अकरा मिनिटांपासुन ते रात्री आठ वाजुन एक्कावन्न मिनिटांपर्यत हा भद्रा मुहुर्त असणार आहे.यानंतर भद्राकाल संपलेला असणार आहे.

रक्षाबंधनच्या दिवशी राखी कधी बांधावी?भद्रा कालामध्ये राखी बांधने शुभ राहील का?

रक्षाबंधनच्या दिवशी भद्राकाल हा संध्याकाळी सुरू होणार आहे अणि रात्री आठ वाजुन एक्कावन्न मिनिटांनी हा संपणार आहे.

अशा परिस्थितीत खुप बहिणींना असा प्रश्न पडला आहे की भद्रकालात तर राखी बांधणे शुभ नाही मग आठ वाजुन एक्कावन्न मिनिटांनंतर म्हणजे सुर्यास्त झाल्यानंतर भावास राखी बांधली तर चालेल का नाही?

जर ज्योतिष शास्त्रानुसार पाहायला गेले तर राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त भद्राकाल सुरु होण्याच्या आधीचा अणि भद्राकाल संपल्यानंतरचा आपण बघितला तोच असणार आहे.दुसरा इतर कुठलाही शुभ मुहूर्त राखी बांधण्यासाठी दिसुन येत नाहीये.

ज्योतिष शास्त्रानुसार कधी राखी बांधायला हवी?

राखी बांधण्याचा योग्य मुहुर्त –

ज्योतिष शास्त्रानुसार सर्व बहिणींनी खालील दिलेल्या कालावधीतच म्हणजेच अकरा तारखेला अभिजित मुहुर्तात

दुपारी 12.06 ते 12.57 पर्यत राखी बांधायला हवी.

11 आँगस्ट संध्याकाळी अमृत काळ 6.55 ते 8.20 असा आहे.

12 आँगस्ट ब्रहम मुहुर्त 4.29 ते 5.17

किंवा 8 वाजुन एक्कावन्न मिनिटांनंतरच भद्राकाल समाप्तीनंतर सर्व बहिणींनी रक्षाबंधन साजरे करायला हवे अणि आपल्या भावास राखी बांधायला हवी.

कारण रात्री खुप उशिरापर्यत रक्षाबंधन साजरा करणे सुदधा अशुभ मानले जात आहे.

अणि जर आपणास 12 आँगस्टला रक्षाबंधन साजरा करायचे असेल तर रक्षाबंधन साजरा करण्यासाठी 12 आँगस्ट रोजी सकाळी 7 वाजुन पाच मिनिटांपर्यतचाच शुभ मुहूर्त कालावधी आपल्याकडे शिल्लक आहे.

भद्रकालात रक्षाबंधन साजरा करणे अशुभ,अनिष्ठ का मानले जाते?भद्राकालात राखी का बांधु नये?

भद्रकालाची वेळ शास्त्रानूसार खुप अशुभ मानली जाते अणि राखी ही कधीही शुभवेळेतच बांधली जावी असे हिंदु पंचांगांत देखील दिले आहे.म्हणुन भद्रकाळात राखी बांधली जात नाही.

See also  झिरो डेप इंशुरन्स म्हणजे काय zero dep insurance in car

भद्राला शनिदेवाची बहिण मानले जाते.असे मानले जाते की रावणाने देखील आपल्या बहिणीकडुन भद्राकालातच राखी बांधुन घेतली होती.ज्यामुळे रावणाचा अणि त्याच्या पुर्ण लंकेचा देखील नाश झाला.

तसेच भद्राकालात महादेव तांडव नृत्य करत असतात म्हणुन देखील हा काळ राखी बांधण्यासाठी शुभ मानला जात नाही.

शिवाय असे मानले जाते की शनिदेवाची बहिण भद्रा हिला तिच्या उग्र स्वभावामुळे ब्रहम देवाने शाप दिला होता की जो व्यक्ती भद्रकालात काही शुभ कार्य करेल त्याला त्यात आपल्या कुठल्याही कार्यात सिदधी यश मिळणार नाही.

प्रसिद्ध ज्योतिष अनिरुद्ध शर्मा यांचं मत

Comments are closed.