रयत शिक्षण संस्था सातारा मध्ये ५४ जागांसाठी भरती सुरू – Rayat shikshan sanstha recruitment 2023 in Marathi

रयत शिक्षण संस्था सातारा मध्ये ५४ जागांसाठी भरती सुरू | Rayat shikshan sanstha recruitment 2023 in Marathi

रयत शिक्षण संस्था सातारा तर्फे एक नोटीफिकेशन जाहीर करण्यात आले आहे ज्यात विविध पदाच्या एकुण ५४ जागांसाठी पदानुसार पात्र उमेदवारांची भरती केली जात आहे असे सांगितले आहे.

ह्या भरतीसाठी उमेदवारांना कुठलीही परीक्षा द्यावी लागणार नाही.फक्त मुलाखतीच्या आधारावर पात्र उमेदवारांची निवड केली जाणार आहे.सदर भरतीसाठी पुरूष तसेच महिला उमेदवार देखील अर्ज करू शकतात.

हया पदांसाठी उमेदवारांना १७ फेब्रुवारी २०२३ पर्यंत आपले अर्ज सादर करावयाचे आहे.

पदाचे नाव –

१) प्रिन्सीपल: एकुण जागा -१

शैक्षणिक पात्रता –

ज्या उमेदवारांचे बीए/बीएड झालेले आहे किंवा बीएससी बीएड/बी काॅम बीएड/एम ए बीएड/एम एस सी बीएड/एम काॅम बीएड डिएस एम इत्यादी मान्यताप्राप्त विद्यापीठातून झालेले असेल

ज्या उमेदवारांना सेकंडरी क्लासेस मध्ये शिकविण्याचा किमान आठ वर्षे इतका अनुभव असेल किंवा अॅडमिनिस्ट्रेशन इंग्लिश मेडियम स्कुल मध्ये काम करण्याचा तीन वर्षे इतका अनुभव आहे.

असे उमेदवार प्रिन्सीपल ह्या पदासाठी अर्ज करू शकतात.

२) को आॅर्डीनेटर -एकुण जागा -१

को आॅर्डीनेटर पदासाठी ज्या उमेदवारांचे मान्यताप्राप्त विद्यापीठातून बीए बीएड/बी एससी बीएड/बी काॅम बीएड/एम ए बीएड/एम एस सी बीएड/एम काॅम बीएड केलेले असेल असे सर्व उमेदवार आपला अर्ज सादर करू शकतात.

See also  फ्रंटऑफिस एक्झिक्युटिव्ह कसे बनायचे?How to become front office executive

तसेच इंग्लिश मेडियम स्कुल मध्ये काम करण्याचा पाच वर्षांचा किमान अनुभव असणे आवश्यक आहे.

३) पहिली ते सातवीसाठी टिचर -१३ जागा

पहिली ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी म्हणजेच टिचर पदासाठी डीएड/बीए बीएड/बी एस सी बीएड/बी काॅम बीएड/एम ए बीएड/एम एस सी बी एड/एम काॅम बीएड इत्यादी झालेले असणे आवश्यक आहे.

४) स्पोर्ट्स टिचर -१ जागा

स्पोर्ट्स टिचर पदासाठी उमेदवाराचे बीए बीपीएड/बी एस सी बीपीएड/बी काॅम बीपीएड इत्यादी झालेले असणे आवश्यक आहे.

५) कंप्युटर टिचर – १ जागा

कंप्युटर टिचर पदासाठी उमेदवाराचे बीएससी आयटी सीएस/ एम एस सी आयटी सीएस/बीसीए एमसीए इत्यादी शिक्षण झालेले असणे आवश्यक आहे.

६) एटीडी क्राफ्ट टिचर -२ जागा

एटीडी क्राफ्ट टिचर पदासाठी उमेदवाराचे एटीडी/जीडी आर्ट/बीएफ ए ए एम झालेले असणे आवश्यक आहे.

७) म्युझिक टीचर -१ जागा

म्युझिक टिचर पदासाठी उमेदवाराचे बीए एम संगीत विशारद झालेले असणे आवश्यक आहे.

८) प्री प्रायमरी नर्सरी टु सिनियर केजी-६ जागा

प्री प्रायमरी नर्सरी टु सिनियर केजी पदासाठी उमेदवाराचे एच एससी/बीए/बीएससी/बी काॅम/ अणि माॅटेसरी/ईसीसी/ईडी/पीटीसी झालेले असणे आवश्यक आहे.

अशा सर्व मिळुन एकुण ५४ जागांसाठी रयत शिक्षण संस्था सौ शकुंतला रामशेज ठाकुर विद्यालय सातारा तर्फे भरती केली जात आहे.

सर्व उमेदवारांना अर्ज फाॅम सदर शाळेतच उपलब्ध करून दिला जाणार आहे.

अर्ज करण्याची सुरूवात –

२/२/२०२३ पासुन शाळेच्या कार्यालयात सदर जागांसाठी अर्ज स्वीकार करायला सुरुवात देखील झालेली आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख –

सर्व उमेदवारांना १५/२/२०२३ संध्याकाळी दहा ते पाच वाजेपर्यंत आपले अर्ज शाळेच्या कार्यालयात जाऊन करायचा आहे.

उमेदवाराला अर्ज १७ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ईमेल द्वारे तसेच प्रत्यक्ष जाऊन देता येईल.

अर्ज फी –

१०० रू इतकी अर्ज फी असणार आहे.

See also  व्हॉईस ओव्हर करीयरच्या संधी - Voice Over Career Opportunities Marathi

अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक –

अधिक माहितीसाठी आपण sau.srtcbseulwe@ gmail.com वर किंवा ७७१०९९४८३१/८६६९३९२३७ ह्या क्रमांकावर संपर्क साधु शकतात.

सदर भरतीमध्ये सीबीएसई मध्ये शिकविण्याचा अनुभव असणारया अनुभवी शिक्षकांना विशेष प्राधान्य दिले जाणार आहे.

निवडलेल्या उमेदवारांना आपला कामाचा अनुभव अणि शैक्षणिक पात्रता नुसार वेतन प्राप्त होईल.

निवड प्रक्रिया मध्ये मॅनेजमेंट कमिटीने घेतलेला निर्णय हा अंतिम निर्णय असेल.

आधिक माहिती साठी येथे क्लिक करा – rayat