शेअर मार्केट गुंतवणुकीविषयी मार्गदर्शन – सेबी चा पुढाकार Saarthi App Information
अर्जुनाचे मार्गदर्शन करण्यासाठी त्याला योग्य दिशा दाखवण्यासाठी महाभारतमध्ये जसे भगवान श्रीकृष्ण त्याचे सारथी बनले होते.
तसेच शेअर मार्केटमधील नवीन गुंतवणुकदारांना गुंतवणुकीविषयी मार्गदर्शन करण्यासाठी त्यांना गुंतवणुकीबाबद अधिक सशक्त बनवण्यासाठी तसेच त्यांना कुठे गुंतवणूक करायची?कशी गुंतवणुक करायची?कधी आणि केव्हा गुंतवणुक करायची?
या सर्वांबाबद योग्य दिशा दाखवण्यासाठी नुकतेच काही दिवसांपुर्वी सेबीकडुन(security exchange board of indiaकडुन) नवीन गुंतवणुकदारांसाठी एक मोबाईल अँप्लीकेशन लाँच करण्यात आले आहे.ज्याचे नाव सारथी असे आहे.
ही अँप इंग्रजी आणि हिंदी या दोन्ही भाषेत उपलब्ध करून देण्यात आली आहे.या अँपचे अँड्राईड आय ओ एस व्हरझन आपण आपल्या मोबाईलमधील प्लेस्टोअर किंवा अँप स्टोअर वरून आपण डाऊनलोड करू शकतो.
प्ले स्टोअर वर सारथी नावाच्या खुप अँप आहेत म्हणून आपण सेबीचे सारथी अँपच डाऊनलोड करतो आहे याची आपण एकदा खात्री देखील करून घ्यावी.
सारथी अँप ओपन केल्यावर आपल्यासमोर पुढील तीन आँप्शन येत असतात.
● Register
● Login
● Enter as guest
यापैकी कुठल्याही एका आँप्शनला सिलेक्ट करुन आपण पुढे जाऊ शकतो.
या अँपवर रेजिस्टर करण्यासाठी आपल्याला आपले नाव,ईमेल आयडी,मोबाईल नंबर,पासवर्ड आणि पँन कार्ड नंबरची आवश्यकता असते(पँन कार्ड नंबर आँप्शन असल्याने तो टाकला नही तरी चालेल)
आणि लाँग इन करायला आपल्याला मोबाईल नंबर आणि पासवर्ड इंटर करावा लागतो.
- यात आपल्याला एकुण सहा आँप्शन दिले आहेत.
यात पहिल्या आँप्शनमध्ये आपण सिक्युरीटीज आणि मार्केट चेक करू शकतो तसेच शिकु शकतो.यात गुंतवणुकदारांना सिक्युरीटी मार्केट विषयी बेसिक महत्वाची देण्यात आली आहे. - दुसरया आँप्शनमध्ये आपण कशी गूंतवणुक करायची हे जाणुन घेऊ शकतो
- तिसरया आँप्शनमध्ये आपल्याला सिक्युरीटी मार्केट तसेच ब्रोकर एक्सचेंज विषयी काही तक्रार असेल तर आपण ती इथे सांगु देखील शकतो?
- चौथ्या आँप्शनमध्ये सेबीकडुन कोणकोणते resources आपल्याला provide केले जातात हे जाणुन घेऊ शकतो.
- पाचव्या आँप्शनचा वापर करून आपण सेबीविषयी अधिक माहीती जाणुन घेऊ शकतो.
- तसेच सहाव्या आँप्शनचा वापर सेबीला काँल करण्यासाठी करू शकतो.
SARTHI APP चे इतर कोणकोणते फायदे आहेत?
● या अँपदवारे गुंतवणुकदारांना kyc,process,trading आणि settlement, mutual fund इत्यादी विषयी माहीती तसेच मार्केट अपडेट प्राप्त होत राहणार आहे.
● या अँपदवारे गुंतवणुकदारांना मार्केटमधील चढ उताराची अपडेट प्राप्त होत राहील.