किटकनाशके फवारतानाची काळजी (safe spraying of pesticides).बद्दल लिहताना लक्षात येईल की गेल्या दोन वर्षापूर्वी किटकनाशके विषबाधे मुळे महाराष्ट्र त काही शेतकर्यांना, मजुरांना आपला जीव गमवावा लागला, कृषि विभातर्फे केलेल्या अभ्यासाअंतर्घत ह्या बाबी समोर आल्यात की किटकनाशके विषबाधे च एक प्रमुख कारण म्हणजे फावरणी करताना पुरेशी , किटकनाशके हातळताना (safe spraying of pesticides) आवश्यक असणारे सुरक्षितता न बाळगन ,पुरेशी काळजी न घेणे.
मानवी शरीराल अतिशय घातक अश्या ह्या रसायांनांच माहिती नसल्यामुळे थोड दुर्लक्ष होवून , विषबाधे चे प्रसंग ओढवू शकतात.
किटकनाशके, तणनाशके वापरतांना हे (safe spraying of pesticides.)लक्षात घेण आवश्यक आहे की
- श्वासाद्वारे – रासायनिक औषधांचे अत्यंत बारिक कण हवेबरोबर श्वासोच्छासासोबत शरीरात जातात.
- त्वचा आणि डोळ्याद्वारे – फवारणी करीत असतांना त्वचेच्या संपर्कामधून तथा डोळ्यांद्वारे शरीरात जातात.
- तोंडाद्वारे- फवारणी करतांना नकळत तोंडाद्वारे खातांना, बीडी पीतांना शरीरात जाऊ शकतात.
किटकनाशके वापरतांना सर्वसाधारणपणे घ्यावयाची काळजी-(safe spraying of pesticides.)
- वर्षभर फावरणी यंत्र ची अधून अमधून देखभाल करावी , गळके फवारणी यंत्र असल्यास ते तसे च न वापरता ते दुरुस्त करुन मगच वापरावे.
- किटकनाशके फवारणी यंत्रात भरतांना सांडू नये यासाठी नरसाळ्याचा (चाडीचा) वापर करावा.
- तणनाशके फवारणीसाठी वेगळा पंप वापरावा व तो पंप किटकनाशके वापरताना संरक्षक कपडे वापरावेत.
- फवारणीसाठी वापरलेले सर्व साहित्य पाण्याने स्वच्छ धुवुन ठेवावेत.
- झिजलेले, खराब झालेले नोझल्स बदलून घ्यावेत.
- किटकनाशकाला हुंगणे किंवा त्याचा वास घेणे टाळावे.
- फवारणीचे मिश्रण हाताने न ढवळता लांब दांड्याचा किंवा काठीचा वापर करावा.
- किटकनाशके पोटात जाण्याची शक्यता असल्याने फवारणीचे मिश्रण करतांना अथवा फवारणीच्या वेळी तंबाखु खाणे अथवा धुम्रपान करणे टाळावे.
- फवारणीचे काम पुर्ण झाल्यावर हात साबणाने स्वच्छ धुवुन खाणे-पिणे करावे.
- फवारणीचे वेळी लहान मुले, जनावरे, पाळीव प्राणी यांना त्या ठिकाणा पासून दुर ठेवावे
- उपाशीपोटी फवारणी न करता फवारणीपुर्वी न्याहारी करावी
- फवारणी करतांना वापरलेली भांडी इ.साहित्य नदी, नाला किंवा विहीरीजवळ धुवु नयेत, तर धुतांना वापरलेले पाणी त्यात विषारी अवशेष असल्याने पडीक जमिनीत टाकावेत अथवा मातीत गाडावे.
- किटकनाशकांच्या रिकाम्या बाटल्या वापरानंतर नष्ट करुन टाकाव्यात..
- फवारणी करतांना नोझल बंद पडल्यास ते स्वच्छ करण्यासाठी तोंड लावुन फुंकु नये अथवा हवा तोंडाने आत ओढु नये यासाठी सोयीस्कर तार, काडी किंवा टाचणी वापरावी.
- किटकनाशके फवारण्याचे काम दर दिवशी आठ तासापेक्षा जास्तवेळ करु नये
- . हे काम करणा-या प्रत्येक व्यक्तीने ठराविक कालावधीने डॉक्टराकडून स्वत:ला तपासून घ्यावे.
- किटकनाशके अंगावर पडू नये म्हणून वा-यांच्या विरुध्द दिशेने फवारणी करु नये.
- किटकनाशके मारलेल्या क्षेत्रावर गुरांना चरण्यास किमान दोन आठवडे जावू देऊ नये.
- जमिनीवर सांडलेले किटकनाशक हातंनी न पुसता व त्यावर पाणी न टाकता ती माती/चिखल यांच्या साह्याने शोषुन घ्यावेत व जमिनीत गाडुन टाकावीत.
- डब्यावरील मार्गदर्शक चिन्हाकडे काळजीपुर्वक लक्ष द्यावे.
- लाल रंगाचे चिन्ह/खुणा असलेली औषधी विषारी असुन त्यानंतर पिवळा, निळा व हिरवा असा क्रम लागतो.
विषबाधाची लक्षणे विषबाधा झाल्याची लक्षणे व उपाययोजना
- विषबाधा ही किटकनाशके/तणनाशके यांचा त्यांचेशी संपर्क अथवा पोटत गेल्यास होते.
- इतर आजार व विषबाधा यांच्या लक्षणात बरेचदा साम्य राहू शकते.
- अशक्तपणा व चक्कर येणे.
- त्वचेची जळजळ होणे, डाग पडणे, घाम येणे.
- डोळ्यांची जळजळ होणे, पाणी येणे, अंधुक दिसणे
- तोडातुन लाळ गळणे, तोंडाची आग होणे, उलटी येणे, मळमळणे, हगवण होणे, पोटात दुखणे.
- डोकेदुखी, अस्वस्थ होणे, स्नायुदुखी, जिभ लुळी पडणे, बेशुध्द होणे, धाप लागणे, छातीत दुखणे, खोकला येणे.
विषबाधेची शंका आल्यास खात्री करा.
- रोग्याच्या किटकनाशकांसह संपर्क आला होता काय ?
- नेमके कोणते किटकनाशके वापरले ?
- शरीरात किती गेले ? व ते केव्हा गेले ?
- डॉक्टरांसाठी वरिल माहिती महत्वाची आहे.
विषबाधेनंतर तातडीने करावयाचे प्रथमोपचार
- किटकनाशके/तणनाशके डोळ्यांत उडाल्यास, तात्काळ डोळे स्वच्छ पाण्याने ५ मिनीटापर्यंत पाण्याची धार सोडुन धुवावे.
- शरीरावर उडाले असल्यास १० मिनिटे साबणाने स्वच्छ धुवावे व दवाखान्यात न्यावे.
- श्वास सुरू आहे की नाही ते ललगेच पहावे , अन्यथा जिवावर बेतु नये ह्या करता तत्काळ कृत्रिम श्वासोपचार व्यवस्था करावी.
- विषबाधेनंतर रोगी जर संपुर्ण शुध्दीवर असेल तरच उलटी करण्यास प्रवृत्त करावे अन्यथा नाही .
- विषबाधीत व्यक्ती त्वरितपिण्यासाठी दूध तसेच विडी/सिगारेट व तंबाख देऊ नये.
- विषबाधीत व्यक्तीला थंडी वाजत असल्यास अंगावर पांघरूण द्यावे
- कीटकनाशकांच्या माहिती पत्रकासह डॉक्टरांकडे विषबाधीत व्यक्ती त्वरित दाखवावे किंवा आवश्यक असल्यास दवाखान्यात अॅडमिट करावे व डॉक्टरांच्या देखरेखीखाली च उपचार करावे.
- विषारी औषध कपड्यांवर उडाले असल्यास ते कपडे लगेच बदला व रोग्यास शक्य तितक्या लवकर दवाखान्यात पोहचवा.
अधिक माहिती साथी क्लिक करा_