सेल्स फनेल म्हणजे काय- Sales funnel information Marathi
आधुनिक काळात जुन्या मार्केटिंग स्किल्स या काही जास्त फायद्याच्या ठरत नाहीयेत मात्र त्यांच्यावर पर्याय म्हणून अनेक डिजिटल मार्केटिंग स्किल्स आणि टूल्स उपलब्ध आहेत. आधुनिक टूल्स आणि टेक्निक पैकीच एक म्हणजे सेल्स फनेल होय.
सेल्स फनेल तुमच्या व्यवसायाला अधिक फायद्याचे बनवायला मदत करेल. तुम्ही डिजिटल मार्केटिंग करायच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी सेल्स फनेल ही टेक्निक म्हणजे वरदानच असेल.
आज याच सेल्स फनेल विषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत. सेल्स फनेल म्हणजे काय? सेल्स फनेल मधील स्टेप्स आणि सेल्सच्या प्रकारांविषयी आज आपण जाणून घेऊयात.
सेल्स फनेल म्हणजे काय? What is Sales Funnel? In Marathi
सेल्स फनेल म्हणजे एक विक्री आणि विपणन क्षेत्रातील मूलभूत संकल्पना आहे. ज्यात फनेलचा वरचा भाग हा प्रत्येक व्यवसायच मुख्य उद्दिष्ट दर्शवते ज्यात जास्तीजास्त लोकांनी त्यांच्या उत्पादनं आणि सेवे बाबत चौकशी करावी, माहिती घ्यावी व खालील निमुळता होत जाणारा भाग हा माहिती घेणाऱ्या लोकांपैकी किती लोकं या विक्री प्रक्रिया म्हणजे सेल्स फनेल संकल्पनेतून हे ग्राहकांत परावर्तित झाले हे दर्शवतो.
सेल्स फनेल म्हणजे अशी विपणन तंत्र किंवा मार्केटिंग टेक्निक ज्यामध्ये तुमच्या वेबसाईटवर येणारे ग्राहक हे या फनेलच्या वरच्या बाजूला येतात आणि त्यातून काही लोक हे या फनेल मध्ये एन्ट्री घेतात किंवा बाकी उरलेले लोक हे फनेल मध्ये न जाता बाहेर येतात.
खालील मुद्द्या द्वारे आपण तेसमजावून घेऊ या.
- फनेल म्हणजे मराठी भाषेत नरसाळे. याच फनेल मध्ये आपण जेव्हा एखादी गोष्ट त्याच्या वरील भागात टाकतो ती पुढे त्याच्या दुसऱ्या बाजूने एकत्रित होऊन बाहेर येते. आता तुम्ही यात जर बघितले तर वरून टाकलेला प्रत्येक थेंब हा दुसऱ्या बाजूने बाहेर एकत्र येऊन पडतो.
- मात्र डिजिटल मार्केटिंग मधील सेल्स फनेल मध्ये ग्राहक हा वरून आत येऊन प्रत्येक स्टेज मधून जात असतो. यातून काही ग्राहक हे एखाद्या स्टेजला जाऊन हा फनेल मधून बाहेर पडतात. मात्र जास्तीत जास्त लोक हे शेवटी खरेदी करूनच सेल्स फनेलच्या बाहेर पडतात.
- सेल्स फनेलच्या मदतीने आपण आपल्या उत्पादनासाठी आपल्या वेबसाईटवर येणारे व्हिजिटर्स हे ग्राहकांमध्ये बदलू शकतो. डिजिटल मार्केटिंग क्षेत्रात सेल्स फनेलच्या मदतीने तुमचा शून्यातून सुरू झालेला व्यवसाय सहजपणे अगदी वेगळ्या उंचीवर पोहोचू शकतो.
- सेल्स फनेल विषयी एक सोपे उदाहरण देऊन समजवायचे झाल्यास समजा तुम्हाला एखादी वस्तू खरेदी करायची आहे तर मग तुम्ही त्याविषयी गुगल वर सर्च कराल. जेव्हा तुम्ही गुगल वर सर्च करून पुढे जाल तेव्हा तुम्हाला SEO केलेली त्या वस्तुविषयी एखादी वेबसाईट दिसेल. तुम्ही त्या साईटवर गेल्यानंतर तुम्हाला महत्वाची माहिती मिळेल.
- तुम्हाला यात आवड असेल तर तुम्ही इथून लगेच तुमची आवड दाखवत पुढच्या स्टेप वर जातात. तिथे तुम्हाला तुमची ही निवड कशी योग्य आहे याविषयी अधिक सांगितले जाते. मग तुम्ही त्या वस्तूला विकत घेण्याचा निर्णय घेता आणि शेवटच्या स्टेपला तुम्ही तुमचे खाते त्या साईटवर बनवून किंवा त्यांना तुमचा ई-मेल देऊन मग ती वस्तू खरेदी करून त्याचे पेमेंट देखील करता.
- इथे तुम्हाला प्रत्येक स्टेजला तुम्ही निवडलेली गोष्ट कशी चांगली आहे आणि त्याच्याशी संबंधित आणखी कोणत्या गोष्टी तुम्ही खरेदी करू शकता याविषयी सांगितले जाते. तुम्हाला प्रत्येक वेळी एका वेगळ्या स्टेप मधून जावे लागते आणि यातून तुम्ही ती वस्तू खरेदी करण्याच्या निर्णयाच्या अधिकाधिक जवळ जात असतात.
सेल्स फनेल काम कसे करते? सेल्स फनेलच्या पायऱ्या – Sales funnel information Marathi
सेल्स फनेल हे मुख्यतः 4 पायऱ्यांवर काम करते. या 4 वेगवेगळ्या स्टेप्स मधून व्हिजिटर्स हे ग्राहकाच्या रुपात बदलतात.
1 Awareness (जागरूकता)
आपल्याला आपल्या प्रोडक्ट किंवा सर्व्हिस विषयी ग्राहकांमध्ये जागरूकता निर्माण करायची आहे. यासाठी अनेक माध्यमाच्या मदतीने जाहिरात आपण करू शकतो. जेव्हा लोकांपर्यंत आपले उत्पादन विषयी माहिती पोहोचेल तेव्हाचे ते खरेदी करतील त्यामुळे यासाठी paid advertisement हा एक मार्ग आहे.
2 Interest (आवड)
एखादा त्या लिंक्स वर क्लीक करून जर तुमच्या साईटवर येत असेल आणि त्याला ती आवडत असेल तर त्याविषयी आपल्याकडे माहिती असायला हवी. असे लोक आपल्या साईटवर पुन्हा पुन्हा येत असतात त्यामुळे त्यांची आवड ओळखून त्यांचा डेटा तुमच्याकडे असायला हवा.
3 Decision (निर्णय)
या स्टेजला ग्राहक येतो तेव्हाच त्याचा खरेदी करण्याचा निर्णय जवळपास झालेला असतो. त्याला फक्त तुम्ही अधिकाधिक सुविधा किंवा सूट कशी देता येईल याकडे लक्ष द्यायचे असते. ग्राहक या स्टेजला येऊन निर्णय घेत असतो त्यामुळे इथे त्याला सकारात्मक निर्णय कसा घेता येईल यासाठी सेल्स फनेल मध्ये काम केलेले असते.
4 Action (क्रिया)
ग्राहक या स्टेज मध्ये निर्णय घेऊन पेमेंट करण्यासाठी आलेला असतो. त्याच्या पसंतीचे आणि सोयीस्कर असे पेमेंट ऑप्शन तिथे असतील तर व्हिजिटर म्हणून आलेला व्यक्ती तुमचा ग्राहक बनतो.
सेल्सचे प्रकार – Types of Sales – Sales funnel information Marathi
सेल्स चे मुख्यतः 2 प्रकार पडतात ते म्हणजे inside sales आणि outside sales.
- Inside Sales
Inside sale मध्ये ग्राहकाला वस्तू खरेदी करण्यासाठी एखादया शॉपिंग मॉल मध्ये किंवा दुकानात जावे लागते. म्हणजे तो सेल्स पर्सन असतो त्याला देखील ग्राहकाला त्याच्या दुकानापर्यंत घेऊन यावे लागते. आता inside sales हे जास्त प्रमाणात होत नाहीत कारण सर्व लोक ऑनलाइन शॉपिंग कडे वळले आहेत.
- याशिवाय एखाद्या होलसेल विक्रेत्याकडून दुकानदार किंवा एखाद्या कंपनीकडून दुसरी कंपणो जर वस्तू विकत घेत असेल किंवा विक्री करत असेल तर त्याचा समावेश देखील INSIDE SALE मध्ये होतो.
- Outside Sales
Outside sales मध्ये सेल्स पर्सन हा त्याच्या कंपनीच्या वस्तू या ग्राहकांपर्यंत जाऊन विकत असतो. आता outside sale कडे सर्व व्यवसाय वळले आहेत. Outside sales मध्ये तुमचे सर्व इ कॉमर्स स्टोअर्स आणि ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म येतात. यामध्ये व्यवसाय हा ग्राहकाच्या दरवाजा पर्यंत पोहोचतो आणि त्यामुळे ग्राहक आता याला जास्त पसंती देत आहेत.
- B2B Sales
B2B म्हणजे बिझनेस टू बिझनेस होय. यामध्ये एक व्यवसाय दुसऱ्या व्यवसायाला आपल्या सेवा किंवा वस्तू विक्री करता असतो. एखादा मोठा व्यवसाय असेल आणि त्याला ग्राहकांपर्यंत थेट पोहोचायला अडचण असेल तर ते B2B सेल्सचा वापर करतात.
- B2C Sales
B2C म्हणजेच बिझनेस टू कस्टमर होय. यामध्ये उत्पादन करणारा व्यवसाय आणि ग्राहक यांच्या मध्ये तिसरा कोणी व्यक्ती नसतो. तो व्यवसाय किंवा कंपनी त्यांची उत्पादने ही सरळ ग्राहकाला विकतात.
- Agency Sales
Agency sale मध्ये एक सेल agent हा अनेक कंपन्यांसाठी एक स्वतंत्र कंपनीचा व्यक्ती म्हणून काम करत असतो. Agency sales मध्ये कंपनी एका व्यक्तीला त्यांच्या सेल्स आणि सर्व्हिसेस साठी एक स्वतंत्र कंपनीचा व्यक्ती म्हणून निवडतात. हा व्यक्ती कंपनीचा आणि ग्राहकांच्या मधील एक दुवा असतो.
- सेल फनेल मध्ये आपण ते पूर्ण सेल्स फनेल जेव्हा एकाच कंपनीच्या उत्पादनांची विक्री करण्यासाठी बनवतो तेव्हा ते agency sale मध्ये मोडते.
- Consultative Sales
- Consultative Sale मध्ये सुरुवातीला ग्राहकांना त्यांच्या गरजा विचारल्या जातात. म्हणजे जेव्हा ग्राहक सेल्स फनेल मध्ये येतो तेव्हा त्याची गरज आणि त्याच्या अपेक्षा विचारून त्याला मग प्रोडक्ट दाखविले जाते. याचा फायदा असा होतो की ग्राहकांचा वेळ वाचतो आणि त्यांना हवे ते प्रोडक्ट लगेच पसंत करून खरेदी करता येते. Traditional सेल्स पेक्षा Consultative sales हे व्हिजिटर्सला जास्तीत जास्त वेळा ग्राहकात बदलतात.
- eCommerce Sales
ई कॉमर्स सेल्स विषयी बोलायचे झाले तर सगळ्यात सोपे म्हणजे तुम्ही बघता त्या फ्लिपकार्ट आणि अमेझॉन सारख्या वेबसाईट. E-commerce sales साठी आपण स्टेप बाय स्टेप checkout जे बनवतो त्यालाच सेल्स फनेल म्हणता येईल. ग्राहक वेबसाईटवर आल्यानंतर त्याला त्याच्या आवडीचा प्रोडक्ट आणि ऑफर असलेला प्रोडक्ट लवकर दिसेल आणि त्यानंतर ते प्रोडक्ट खरेदी करत असताना त्याला त्याच्याशी निगडित प्रोडक्टस सजेस्ट केले जातील.
- Direct Sales
तुम्ही जर B2C वाचले असेल तर त्यालाच direct sales असे देखील म्हणतात. कंपनी कडून उत्पादन घेतलेल्या वस्तू या मेलस, जाहिराती यांच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहोचविला जातात. यामध्ये मात्र तो व्यक्ती वस्तू घेईल की नाही यात थोडी जास्त शंका असते.
- Account Based Sales
अकाऊंट बेस्ड सेल्स मध्ये असे काही High Value Account निवडले जातात ज्यांच्याशी कंपनी किंवा सेलर्स हे संपर्क करतात. त्यांनतर त्यांना कंपनीच्या उत्पादनाविषयी माहिती देण्यात येते आणि वैशिष्ट्ये सांगून वस्तू विकत घ्यायला सांगितले जाते.
- त्या Account ला ग्राहकात बदलून मग त्याच्याशी long term relationship कशी बनविता येईल यासाठी कंपनी प्रयत्न करते. त्यामध्ये मग त्याला Premium सुविधा देऊन काही डिस्काउंट देऊन कंपनीशी जोडून ठेवले जाते. असा हा महत्वपूर्ण concept Sales funnel information Marathi लेख द्वारे आपल्याला नक्कीच बेसिक माहिती मिळाली असेल ही आशा आहे.