सतिष कौशिक यांच्याविषयी माहिती | Satish kaushik information in Marathi
एक प्रसिद्ध निर्माता,दिग्दर्शक तसेच विनोदी अभिनेता म्हणून आपणा सर्वांना परिचित असलेले प्रसिद्ध अभिनेते सतिष कौशिक यांचे वयाच्या ६७ व्या वर्षी गुरूवारी पहाटेच्या सुमारास हदय विकाराच्या झटक्यामुळे निधन झाले आहे.अनुपम खैर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंट वरून टविट करून ही दुखद बातमी दिली आहे.
Satish kaushik information in Marathi
आजच्या लेखात आपण सतिष कौशिक यांच्याविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत.
१) सतिश कौशिक कोण होते?
सतिष कौशिक हे एक प्रसिद्ध बाॅलिवुड अभिनेता,दिग्दर्शक तसेच चित्रपट निर्माता अणि पटकथा लेखक तसेच सतिष कौशिक हे एक विनोदी अभिनेता होते.
सतिष कौशिक यांना आपल्या काॅमेडीसाठी दोन ते तीन वेळा बेस्ट काॅमेडिअन हा फिल्म फेअर पुरस्कार देखील प्राप्त झाला आहे.
बाॅलिवुड अभिनेता गोविंदा सोबत अनेक चित्रपटांमध्ये विनोदी भुमिका साकारत त्यांनी रसिक प्रेक्षकांना खुप हसवले होते.
सतिष कौशिक हे अनुपम खैर यांचे फार जवळचे जिवलग मित्र होते.त्यांनीच सतिष कौशिक यांच्या दुखद निधनाची बातमी दिली आहे.
जानता हूँ “मृत्यु ही इस दुनिया का अंतिम सच है!” पर ये बात मैं जीते जी कभी अपने जिगरी दोस्त #Satish Kaushik के बारे में लिखूँगा, ये मैंने सपने में भी नहीं सोचा था।45 साल की दोस्ती पर ऐसे अचानक पूर्णविराम !! Life will NEVER be the same without you SATISH ! ओम् शांति! 💔💔💔
असे ट्विट आपल्या ट्विटर वरून अनुपम खैर यांनी केले आहे.
भारताच्या संविधानाने महिलांना दिलेले महत्वाचे अधिकार कोणकोणते आहेत?
२) सतिष कौशिक यांचा जन्म कधी अणि कोठे झाला?
सतिष कौशिक यांचा जन्म हरियाणा मधील महे़ंद्गगड येथे १३ एप्रिल १९५६ रोजी झाला होता.
३) सतिष कौशिक यांचे फिल्म करिअर –
सतिष कौशिक यांनी त्यांच्या करिअरचा आरंभ १९८३ मधील जाने भी दो यारो ह्या चित्रपटापासून केला होता.यानंतर देखील सतिष कौशिक यांनी जवळ जवळ शंभर सिनेमांमध्ये काम केले.
सतिष कौशिक यांनी डझनभर,प्रेम,तेरे नाम,तसेच रूप की राणी चोरो का राजा हम आपके दिल मे रहते है हमारा दिल आपके पास है मुझे कुछ कहना है अशा अनेक चित्रपटांमध्ये दिग्दर्शक म्हणून काम केले होते.
सतिष कौशिक यांनी मासुम ह्या चित्रपटामध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते.याचसोबत त्यांनी केलेली मिस्टर इंडिया चित्रपटातील कॅलेंडर कुक ह्या पात्राची भूमिका देखील फार गाजली होती.
सतिष कौशिक यांनी आतापर्यंत अनेक चित्रपटांचे दिग्दर्शक निर्माता म्हणून काम केले पण आजही त्यांना आपण सर्व जण त्यांच्या गोविंदा सोबत तसेच इतर चित्रपटांमध्ये केलेल्या काॅमेडी अभिनयामुळे अधिक ओळखतो.
गोविंदा सोबत ते साजन चले ससुराल चित्रपटात गोविंदाच्या मित्राची मुथु स्वामीची भुमिका साकारताना दिसुन आले होते.आपल्या साऊथ इंडियन शैलीमध्ये काॅमेडी करत त्यांनी प्रेक्षकांना खुप हसवले.
याचसोबत सतिष कौशिक हे क्योकी मै झुठ नही बोलता ह्या चित्रपटात नेहमी खोटे बोलणारया वकिलची भुमिका साकारणारया गोविंदाच्या मित्राच्या भुमिकेत ते आपणास पाहावयास मिळाले होते.
अक्षय कुमार सोबत मिस्टर अँड मिसेस खिलाडी चित्रपटात देखील त्यांनी अक्षर कुमारचा मामा असलेला ज्योतिष पंडित ही भुमिका साकारत प्रेक्षकांना हसवून त्यांचे भरपुर मनोरंजन केले होते.
हसीना मान जाएगी ह्या संजय दत्तच्या चित्रपटात त्यांनी कादर खान यांच्या पीए ची भुमिका साकारली होती.
देख तमाशा देख ह्या चित्रपटामध्ये त्यांनी मुथाशेठ अणि दिवाना मसताना चित्रपटामध्ये त्यांनी पप्पु पेजर हद कर दी आपने मध्ये त्यांनी प्रकाश चौधरी,आ अब लौट चले मध्ये चौरसिया ही भुमिका साकारली होती.
४) सतिष कौशिक यांचे शिक्षण –
सतिष कौशिक यांचे सुरूवातीचे शिक्षण दिल्ली येथे करोलबाग येथे झाले.यानंतर सतिष यांनी दिल्ली विद्यापीठातुन करोडीमल महाविद्यालयातुन त्यांचे पदवीचे शिक्षण पुर्ण केले होते.
यानंतर त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश प्राप्त केला येथून ते १९७८ मध्ये उत्तीर्ण झाले.मग त्यांनी फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया मध्ये आपल्या अभिनय क्षेत्रातील पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतला होता.
१९७९ मध्ये सतिष कौशिक यांनी मुंबई शहरात आपले अभिनेता बनण्याचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी पहिले पाऊल टाकले होते.
5) सतिष कौशिक यांचे कुटुंब –
सतिष कौशिक यांच्या पत्नीचे नाव शशी कौशिक असे आहे अणि त्यांच्या मुलींचे नाव शानु कौशिक अणि वंशिका कौशिक असे आहे.
Satish kaushik information in Marathi