Shark Tank India बिझनेस शो विषयी माहिती – Shark Tank India information in Marathi
आज एकविसाव्या शतकात आपल्या भारत देशाने इतर क्षेत्रांमध्ये प्रगती करण्यासोबत स्वयंरोजगाराच्या(Self Employed) क्षेत्रात देखील प्रगती करून यश प्राप्त करण्यास आज सुरूवात केलेली आपणास दिसुन येते आहे
भारतातील कित्येक युवा तरूण तरूणी आज जाँब करणे सोडुन स्वताचा व्यवसाय,उद्योग स्वयंरोजगार सुरू करू पाहत आहेत.
आणि सगळयात महत्वाची बाब म्हणजे ह्या क्षेत्रात पुरूष,तरूणच नव्हे तर तरूणी स्त्रिया देखील यश प्राप्त करताना आज आपणास दिसुन येत आहेत.
स्वयंरोजगाराच्या ह्या उपक्रमाचा सगळयात महत्वाचा फायदा हा होतो आहे की आज यामुळे आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेत आमुलाग्र वाढ होत आहे.
आणि स्वयंरोजगाराच्या ह्या उपक्रमातुन भारत देशाने भरपुर नफा देखील प्राप्त केलेला आहे.
आणि आज आपल्या देशाच्या ह्याच उदयोन्मुख अर्थव्यवस्थेस अधिक चालना प्राप्त व्हावी म्हणुन Sony Television ह्या चँनलवर 20 डिसेंबर रोजी शार्क टँक इंडिया नावाच्या शोचा आरंभ करण्यात आला होता.
आजच्या लेखात आपण ह्याच शार्क टँक इंडिया शो विषयी अधिक सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.
Shark Tank India म्हणजे काय?
Shark Tank India हा एक स्टार्ट अप रिअँलिटी शो आहे जो Sony Entertainment Television च्या वतीने भारतामधल्या नवोदित उद्योजक(Entrepreneur) यांच्या बिझनेस विषयी असलेल्या आयडीया आणि चालत असलेल्या व्यवसायांना प्रोत्साहन प्राप्त व्हावे यासाठी सुरू करण्यात आला आहे.
यात जे व्यक्ती व्यवसाय करण्यासाठी इच्छुक आहेत ते आपली व्यवसायाची कल्पणा इथे येऊन मांडत असतात आणि भविष्यात हीच बिझनेस आयडीया कशी मोठा नफा आपणास मिळवून देऊ शकते.हे सिदध करण्याचा प्रयत्न करत असतात.
आणि मग आपण इथे मांडलेल्या बिझनेस आयडीयाचे बिझनेस एक्सपर्ट जे बिझनेस क्षेत्रातील खुप तज्ञ आणि अनुभवी व्यक्ती आहे हे मुल्यांकन देखील करत असतात.आणि भविष्यात ही आयडीया किती नफादायी ठरू शकते हे बघत असतात.
आणि ह्याच बिझनेस एक्सपर्टला ह्या शोमध्ये शार्क म्हणुन संबोधतात.या शोमध्ये जेवढेही जज हे शार्क म्हणुन आपल्याला पाहायला मिळतात त्या सर्व व्यक्तींनी आपापल्या निवडलेल्या क्षेत्रात बिझनेस करून उच्च शिखर गाठले आहेत.
Shark Tank India ह्या शो चा Telecast कुठे होतो?आणि कसा होतो?
Friends Shark Tank India हा शो Sony Entertainment Television वर दाखविण्यात येत आहे.ह्या चँनलवर ह्या शोचा आरंभ करण्यात आला आहे.
हा शो सोनी इंटरटेन्मेंट टेलिव्हीझन ह्या चँनलवर 2021 पासुन येण्यास आरंभ झाला होता.20 डिसेंबरच्या दिवशी सोनी इंटरटेन्मेंट टेलिव्हीझन ह्या चँनलवर हा शो प्रथमत लाँच करण्यात आला होता.
Shark Tank India ह्या शो चे Anchor कोण आहे?
शार्क टँक इंडिया ह्या शो चे Anchor रणविजय सिंघा हे असलेले आपणास दिसुन येतात.रणविजय सिंघा यांनी यापुर्वी रोडीज नावाच्या एका फेमस शो मध्ये महत्वाची भुमिका देखील पार पाडली आहे.ते यात शोचे जज होते.
Shark Tank India ह्या शो मधील Judge Pannel मध्ये कोण कोण समाविष्ट आहे?
आपण सुरूवातीलाच जाणुन घेतले होते की शार्क टँक इंडिया मध्ये जे विविध नवोदित इंटरप्रिनर आपल्या बिझनेस आयडीया इथे मांडत असतात.
त्यांचे मुल्यांकन काही विविध उद्योगक्षेत्रातील तज्ञ आणि अनुभवी व्यक्तींकडुन केले जाते.ज्यांना ह्या शो मध्ये शार्क म्हणून संबोधण्यात आले आहे.
यात भारत पे चे फाऊंडर तसेच व्यवस्थापकीय संचालक अश्नीश ग्रोव्हर यांचा समावेश आहे.याचसोबत शुगर काँस्मँटिकच्या को फाऊंडर तसेच सीईओ असलेल्या विनिता सिंग आहेत.
लेन्सकार्टचे फाऊंडर तसेच सीईओ पीयुष बन्सल,इमक्युअर फार्मासिटीकलच्या कार्यकारी संचालक नमिता थापर यांचा देखील Shark Tank India ह्या शो मधील Judge Panel मध्ये समावेश आहे.
एवढेच नव्हे तर शादी डाँट काँम चे फाऊंडर तसेच सीईओ अनुपम मित्तल देखील ह्या जजच्या पँनलमध्ये आपणास दिसुन येतात.
यात गझल अलग हे देखील आपणास पाहायला मिळतात जे मामा अर्थचे फाऊंडर व चीफ देखील आहेत.तसेच अमन गुप्ता जे Tech Company बोटचे को फाऊंडर व मार्केटिंग अधिकारी म्हणुन ओळखले जातात.हे देखील ह्या जजच्या पँनलमध्ये आहेत.
Shark Tank India ह्या शो मधील सर्व Judges ची एकुण Networth किती आहे?
आधीच्या परिच्छेदात आपण शार्क टँक इंडिया ह्या शो मधील जजेसची भुमिका पार पडत असलेल्या उद्योग तज्ञांची नावे जाणून घेतली आता आपण ह्या सर्व उद्योजकांची(Entrepreneur) च्या नेटवर्थविषयी जाणुन घेणार आहोत.
1)विनिता सिंग (शुगर काँस्मँटिक को फाऊंडर,सीईओ)
Total Net Worth =100 कोटी आहे.
2) अश्नीश ग्रोव्हर(भारत पे फाऊंडर,मँनेजिंग डायरेक्टर)
Total Net Worth=700 कोटी + इतकी आहे.
3) गझल अलग (मामा अर्थ चीफ तसेच फाऊंडर)
Total Net Worth =148 कोटी इतकी आहे.
4) अनुपम मित्तल(शादी डाँट काँम चे फाऊंडर तसेच सीईओ)
Total.Net Worth =185 कोटी + आहे.
5) नमिता थापर(इमक्युअर फार्मासिटीकलच्या कार्यकारी संचालक)
Total Networth=600 कोटी + आहे.
6) अमन गुप्ता(Tech Company बोटचे को फाऊंडर व मार्केटिंग अधिकारी) -Total Net Worth =710 कोटी इतकी आहे.
The pitchers will get one more chance to pitch their business in front of the Sharks, in Gateway to the Shark Tank Special Episode, streaming on 11th Feb on #SonyLIV pic.twitter.com/9KfMwo3veJ
— Shark Tank India (@sharktankindia) February 9, 2022
नवीन उद्योजकांनी शार्क टँक इंडियाच्या शो मध्ये प्रवेश प्राप्त करण्यासाठी काय करायला हवे?
मित्रांनो जर आपल्याला देखील शार्क टँक इंडियाच्या शो मध्ये जायचे असेल आणि तिथे मंचावर जाऊन आपल्या बिझनेस आयडीया शार्कसमोर शेअर करायच्या असतील प्रस्तुत करायच्या असतील तर आपण देखील इथे जाऊ शकतो.
पण त्यासाठी आपण एखाद्या बिझनेस आयडीयावर आधीपासुन काम केलेले असायला हवे किंवा त्यात स्वताचा ब्ँण्ड तयार केलेला असावा.
असे असेल तर आपण सिजन सुरू होण्याच्या आधी शो मध्ये जाण्यासाठी आपल्या स्टार्ट अप तसेच बिझनेस आयडीयाची नोंद करू शकतो.
Shark Tank इंडिया मध्ये जाण्यासाठी कोणकोणत्या निकषांची पुर्तता करणे गरजेचे आहे?
शार्क टँक इंडियाच्या शो मध्ये जर आपले अँप्लीकेशन नाकारले जाऊ नये असे आपल्याला वाटत असेल तर आपण अर्ज भरण्यापुर्वी पुढील निकषांची पुर्तता करायला हवी.
1) आपण ज्या बिझनेस आयडीयाची नोंद शोसाठी करतो आहे त्यावर आपण आधीपासुन एक दोन वर्ष तरी किमान काम केलेले असायला हवे.
2) आपल्याकडे जे उत्पादन आहे ते आधीपासुन तयार असावे आणि त्याचा काही भाग आधी विक्री केला गेलेला असावा.
3) याचसोबत आपल्याला आपला एक प्रभावी शाँर्ट व्हिडिओ तयार करावा लागत असतो.
वरील सर्व प्रक्रियेनंतर आपले फायनली सिलेक्शन केले जात असते.त्यानंतर एखाद्या शहरात आपले आँडिशन घेतले जात असते जिथे आपल्याला आपली बिझनेस आयडीया शार्क टँक इंडियाच्या टीमसमोर सादर करावी लागत असते.
आपली आयडीया जर आँडिशनमध्ये पास झाली म्हणजेच शार्क टँक इंडियाच्या टीमला आवडली तर मग आपल्याला आपली बिझनेस आयडीया शार्क टँक इंडियाच्या व्यासपीठावर मांडण्याची परवानगी दिली जात असते.
Shark Tank India च्या शोमध्ये जाण्यासाठी आपले Registration कसे करावे?
जर आपल्यापैकी एखाद्या नवोदित उद्योजकाकडे एखादी चांगली वर्किग बिझनेस आयडीया असेल आणि त्यात त्याने चांगले यश देखील संपादित केले असेल तर त्या उद्योजकाला शार्क टँक इंडियाच्या शो मध्ये आपली बिझनेस आयडीया सादर करायला जाण्यासाठी नोंदणी करता येऊ शकते.
आपली नाव नोंदणी करण्यासाठी आपल्याला शार्क टँक इंडियाच्या आँफिशिअल वेबसाईटवर सर्वप्रथम जावे लागेल(Shark Tank Sonyliv.Com) आणि साईटवर जाऊन आपले रजिस्ट्रेशन करावे लागेल.
50 World’s largest companies – कोणती कंपनी कोणत्या देशाची – company belongs to which country |
Shark Tank – रजिस्ट्रेनशनची संपुर्ण प्रोसेस काय आहे.
● सर्वप्रथम आपल्याला ब्राऊझरमध्ये जाऊन शार्क टँक इंडियाचे Registration Portal Open करावे लागेल.
● यानंतर आपल्याला आपली Language Select करावी लागेल.आणि Next वर क्लीक करावे लागते.
● मग आपल्यासमोर शार्क टँक इंडियाचे आँधलाईन रेजिस्टेशन पेज ओपन होईल ज्यात Step Two मध्ये आपल्याला आपला मोबाईल नंबर Enter करावा लागत असतो.आणि Next Button वर क्लीक करावे लागते.
● यानंतर आपल्या मोबाईलवर एक ओटीपी सेंड केला जातो जो आपण Step 3 मध्ये तिथे इंटर करायचा असतो.
● Step 5 मध्ये आपल्यासमोर शार्क टँक इंडियाच्या शो ची माहीती अकरा वेगवेगळया पाँईण्टमध्ये दिली जात असते.जी आपण वाचुन नंतरच्या Start Option वर क्लीक करू शकतो.
● Step 6 मध्ये आपल्याला आपली Personal Detail Fill करावी लागते(Age,Gender,Dob,Marritial Status,Email Id Etc)
● Step 7 मध्ये आपल्याला आपल्या Business Idea विषयी माहीती भरायची असते.
● Step 8 मध्ये आपल्याला आपल्या Business Related Legal Information द्यावी लागते.(कंपनीची रचना,लिस्ट स्थिती इत्यादी)
● Step 9 मध्ये जर आपल्याला टेलिव्हीजन इंडस्ट्रीविषयी Previous Experience असेल तर तो देखील सांगावा लागतो.
● Step 10 मध्ये आपल्याला आपल्या Personal Life Related Questions विचारले जात असतात.या भाग देखील खुप महत्वपुर्ण असतो कारण यात आपण आपल्या विषयी जेवढया चांगल्या पदधतीने माहीती देऊ तेवढेच आपले सिलेक्शन होण्याचे चान्सेस अधिक वाढत असतात.
● मग Declaration वाचुन झाले की आपला फाँर्म फायनली सबमीट करायचा असतो.
Shark Tank FAQ विषयी वारंवार विचारले जाणारे महत्वाचे प्रश्न –
1) Shark Tank India चा शो चा Time काय असतो?
शार्क टँक इंडिया हा शो आपण सोनी इंटरटेन्मेंट टेलिव्हीझन ह्या चँनलवर सोमवार ते शुक्रवार या कालावधीत बघू शकतो.
हा शो सोनी इंटरटेन्मेंट टेलिव्हीझन ह्या चँनलवर रात्री नऊ वाजता सुरू होतो.याचसोबत आपण हा शो लाईव्ह देखील बघु शकतो यासाठी आपल्याला सोनी टेलिव्हीझनच्या सोनी लाईव्ह अँपवर जावे लागेल.
2) शार्क टँक इंडियाच्या शो मध्ये एकूण किती Judge आहेत?
शार्क टँक इंडियाच्या शो मध्ये एकुण सात जज आहेत.
3) शार्क टँक इंडियाच्या शो मधील सर्व जज कोणत्या क्षेत्रातील Expert आहेत?
शार्क टँक इंडियाच्या शो मधील सर्व जज Business क्षेत्रातील Expert आहेत.
फक्त ते कुठल्याही एका बिझनेसमधील नसुन आपापल्या विविध क्षेत्रातील Business Expert आहेत.
4) Shark Tank India ह्या Reality Show चे वैशिष्टय काय आहे?
शार्क टँक इंडिया जगातील दितीय क्रमांकाचा Business Reality Show आहे.हा शो विशेषकरून नवोदित उद्योजकांना व्यवसाय क्षेत्रात प्रेरित करण्यासाठी सुरू करण्यात आला आहे.जेणेकरून ते व्यवसाय क्षेत्रात उच्च शिखर गाठुन यशस्वी होतील.
ह्या शोने आत्तापर्यत चाळीस पेक्षा अधिक देशातील व्यवसायांना यशस्वी बनवण्यात यश देखील प्राप्त केले आहे.
5) Shark Tank India ह्या Business Reality Show ने आतापर्यत किती पुरस्कार प्राप्त केले आहेत?
Shark Tank India ह्या Business Reality Show ने आतापर्यत 30 पुरस्कार प्राप्त केले आहेत.