भारतातील टाॅप 10 आयटी कंपन्या । Top 10 IT Companies In India
आपल्या भारत देशाने संपूर्ण जगभरात स्वताची एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे.संपुर्ण जगात आपल्या भारत देशातील आयटी सेक्टरची रॅकिंग ही सुमारे ४८ इतकी आहे.
म्हणजे आयटी क्षेत्रात संपूर्ण जगभरात टाॅप पन्नास मध्ये आपल्या भारताचा नंबर लागतो.यावरून आपणास स्पष्टपणे दिसून येते की आयटी क्षेत्रात आपला भारत देश दिवसेंदिवस किती प्रगती करतो आहे.किती पुढे जातो आहे.
आजच्या लेखात आपण भारतातील आयटी क्षेत्रातील सर्वात मोठ्या टाॅप दहा कंपन्याविषयी माहीती जाणुन घेणार
आहोत.
१)रोलटा –
- रोलटा ह्या कंपनीचे नाव भारतातील सर्वोत्कृष्ट आयटी कंपन्यांमध्ये येते.हया कंपनीची स्थापना २९ जुन १९८९ साली केली गेली होती.
- रोलटा कंपनीचे मुख्य कार्यालय महाराष्ट्र राज्यातील मुंबई ह्या शहरात आहे.
- रोलटा कंपनीचे संस्थापक कमल के सिंह हे आहेत.रोलटा कंपनी आयटी क्षेत्रातील इतर कंपन्यांना आयटी सर्विसेस तसेच आयटी कंसल्टींग ह्या प्रमुख सेवा पुरविण्याचे काम करते.
- रोलटा कंपनीमध्ये सुमारे दीड ते दोन हजार इतके कर्मचारी सध्या कामाला आहेत.हया कंपनीचे नेटवर्थ ४ हजार ९६२ करोड इतके आहे.
भारतातील टाॅप १० आयटी कंपन्यांमध्ये ही कंपनी दहाव्या क्रमांकावर आहे.
२) ओरॅकल –
- ओरॅकल कार्पोरेशन ही ओरॅकल फायनान्सेस सर्विस साॅफ्टवेअर लिमिटेड ची सहाय्यक कंपनी आहे.
- ओरॅकल कंपनीकडुन बॅकिंग फायनान्स अणि कॅपिटल मार्केटिंग ह्या सेवा प्रदान केल्या जातात.ओरॅकल कंपनीचे मुख्यालय देखील महाराष्ट्र राज्यातील मुंबई ह्या शहरात आहे.
- ओरॅकल कंपनीमध्ये जवळपास आज ८ हजार कर्मचारी कामाला आहेत.ओरॅकल कंपनीची एकुण संपत्ती ४ हजार ७३५ करोड इतकी आहे.
भारतातील टाॅप १० आयटी कंपन्यांमध्ये ही कंपनी नवव्या क्रमांकावर आहे.
३) माइंड्री लिमिटेड-
- माइंड्री लिमिटेड कंपनी ही भारतातील मल्टी नॅशनल टेक्नॉलॉजी कंपनी आहे.
- माइंड्री ह्या कंपनीचा आरंभ १८ आॅगस्ट १९९९ साली करण्यात आला होता.
- ह्या कंपनीचे मुख्यालय भारतात बॅगलोर येथे आहे तसेच परदेशात युएस नयुजरसी येथे देखील ह्या कंपनीचे मुख्यालय आहे.
- ही कंपनी लारसन अॅण्ड टरबो ह्या समुहाचा एक भाग आहे.
- माईंड ट्री ह्या कंपनीमध्ये आज सुमारे २१ हजार कर्मचारी कामाला आहेत.हया कंपनीचे एकुण नेटवर्थ ५ हजार १५६ करोड इतकी आहे.
भारतातील टाॅप १० आयटी कंपन्यांमध्ये ही कंपनी आठव्या क्रमांकावर आहे.
४) लारसन अॅण्ड टुब्रो इन्फोटेक –
- लारसन अॅण्ड टुब्रो ही कंपनी डिजीटल तसेच प्रो औद्योगिक कंपनी आहे.आधी ह्या कंपनीचे नाव एल अँड टी इनफरमेशन टेक्नॉलॉजी असे होते.२००२ मध्ये हे नाव लारसन अॅण्ड टुब्रो इन्फोटेक असे ठेवले गेले.
- ह्या कंपनीचे मुख्यालय भारतात महाराष्ट्र राज्यातील मुंबई ह्या शहरात आहे.
- लारसन अॅण्ड टुब्रो इन्फोटेक ह्या कंपनीची स्थापना २३ डिसेंबर १९९६ साली करण्यात आली होती.आज जवळपास तीस पेक्षा अधिक देशांमध्ये आज ह्या कंपनीचे संचालन कार्यालय असलेले आपणास पाहावयास मिळते.
- लारसन अॅण्ड टुब्रो इन्फोटेक कंपनीमध्ये आज सुमारे ३१ हजार कर्मचारी कामाला आहेत.अणि ह्या कंपनीची एकुण संपत्ती ८ हजार ८३० करोड इतकी आहे.
भारतातील टाॅप १० आयटी कंपन्यांमध्ये ही कंपनी सातव्या क्रमांकावर आहे.
५) एम फेसेस –
- एम फेसेस ही कंपनी देखील भारतातील प्रमुख आयटी कंपन्यांपैकी एक आहे.ही कंपनी आयटी कंसल्टींग सर्विस देण्याचे काम करते.
- एम फेसेस ह्या कंपनीची स्थापना २०० साली करण्यात आली होती.हया कंपनीचे मुख्यालय भारतातील बॅगलोर ह्या शहरात आहे.
- एम फेसेस ह्या कंपनीत आज २२ हजार दोनशे एकोणीस कर्मचारी कामाला आहेत.हया कंपनीची नेटवर्थ १५ हजार ९१५ करोड इतकी आहे.
- भारतातील टाॅप १० आयटी कंपन्यांमध्ये ही कंपनी सहाव्या क्रमांकावर आहे.
६) टेक महिंद्रा लिमिटेड –
- टेक महिंद्रा ही आपल्या भारत देशातील मल्टी नॅशनल प्रो औद्योगिक कंपनी आहे.
- टेक महिंद्रा जीआयटी अणि बीपीओ ह्या सर्विस देण्याचे काम करते.
- टेक महिंद्रा लिमिटेड ह्या कंपनीचे मुख्यालय भारतातील महाराष्ट्र राज्यातील पुणे शहरात आहे.आज ह्या कंपनीचे ६० पेक्षा अधिक कार्यालय असलेले आपणास पाहावयास मिळतात.
- टेक महिंद्रा लिमिटेड ह्या कंपनीमध्ये एक लाखापेक्षा जास्त कर्मचारी कामाला आहेत.हया कंपनीची एकुण संपत्ती ३७ हजार ३६० करोड इतकी आहे.
भारतातील टाॅप १० आयटी कंपन्यांमध्ये ही कंपनी पाचव्या क्रमांकावर आहे.
भारतीय महिला स्वातंत्र्य सैनिक – List Of Women Freedom Fighter Of India In Marathi
७) विप्रो –
- विप्रो ही कंपनी भारतातील प्रमुख आयटी कंपन्यांपैकी एक आहे.
- विप्रो कंपनीची सुरुवात १९४९ मध्ये करण्यात आली होती.हया कंपनीची सुरुवात अजीम प्रेमजी यांच्या वडिलांनी केली होती.
- पण वडिलांच्या मृत्यूनंतर अझीम प्रेमजी यांनी ही कंपनी वेस्टन इंडिया फिजिटेबल प्रोडक्ट लिमिटेड म्हणून सुरू केली.
- सुरूवातीला ही कंपनी तेल धुलाई साबण टीन कंटेनरची कंपनी म्हणून ओळखली जात होती.मग १९८० मध्ये विप्रो कंपनीने आयटी क्षेत्रात प्रवेश केला
- मग पुढे ह्या कंपनीचे नाव बदलुन विप्रो प्रोडक्ट लिमिटेडच्या जागी विप्रो लिमिटेड असे करण्यात आले.
आज विप्रो कंपनीमध्ये एक लाख ७५ हजार पेक्षा अधिक कर्मचारी कामाला आहेत.हया कंपनीची संपत्ती ८१ हजार २७० करोड इतकी आहे.
भारतातील टाॅप १० आयटी कंपन्यांमध्ये ही कंपनी चौथ्या क्रमांकावर आहे.
८) एच सी एल टेक्नॉलॉजी-
- एच सी एल ह्या कंपनीचा भारतातील टॉप १० आयटी कंपन्यांमध्ये तिसरा क्रमांक लागतो.
- एच सी एल टेक्नॉलॉजी ह्या कंपनीची सुरुवात ११ आॅगस्ट १९७६ मध्ये करण्यात आली होती.
- शिवनादर यांनी ह्या कंपनीची सुरुवात केली होती.एच सी एल टेक्नॉलॉजी कंपनीकडुन आयटी सर्विसेस तसेच आयटी कंसल्टींग ह्या सर्विसेस दिल्या जातात.
- एच सी एल कंपनीला हिंदुस्थान कंप्युटर लिमिटेड असे देखील म्हटले जाते.एच सी एल टेक्नॉलॉजी ह्या कंपनीचे मुख्यालय उत्तर प्रदेश मधील नोएडा येथे आहे.
- एच सी एल टेक्नॉलॉजी कंपनीचे एकुण ३० पेक्षा अधिक देशांत कार्यालये आहे.हया कंपनीत सुमारे एक लाख ६० हजार इतके कर्मचारी कामाला आहेत.
ह्या कंपनीची एकुण नेटवर्थ ८४ हजार ९०५ करोड इतकी आहे.
९) इनफोसेस लिमिटेड –
- इन्फोसिस लिमिटेड ही भारतातील टाॅप टेन आयटी कंपन्यांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असलेली एक मल्टी नॅशनल आयटी सर्विसेस कंपनी आहे.
- इन्फोसिस लिमिटेड कंपनीचे मुख्यालय भारतातील बॅगलोर येथे आहे.
- इन्फोसिस कंपनीने भारतात नऊ विकास केंद्र स्थापित केली असुन संपूर्ण जगभरात ह्या कंपनीचे तीस कार्यालये आहेत.
- इन्फोसिस ह्या कंपनीची सुरुवात २ जुलै १९७१ मध्ये एन आर नारायण मुर्ती यांनी आपल्या सहा मित्रांसोबत मिळुन केली होती.
- कंपनी सुरू करायला पैसे नसल्याने नारायण नारायण मुर्ती यांनी आपल्या पत्नी सुधा मूर्ती यांच्याकडुन दहा हजार रूपये उसणे घेऊन हया कंपनीची सुरुवात केली होती.
आज इन्फोसिस ह्या कंपनीमध्ये दोन लाखांपेक्षा अधिक कर्मचारी कामाला आहेत.हया कंपनीची एकुण संपत्ती ९२ हजार ७६८ करोड इतकी आहे.
इन्फोसिस ही कंपनी भारतातील टाॅप आयटी कंपन्यांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे.
१०) टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस –
- टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस ही भारतातील आयटी क्षेत्रातील टाॅपची म्हणजे प्रथम क्रमांकावर असलेली कंपनी आहे.
- ही कंपनी साॅफ्टवेअर सर्विसेस देण्याचे तसेच कंसल्टींग करण्याचे काम करते.
- ह्या कंपनीचे संस्थापक रतन टाटा हे आहेत.हया कंपनीची सुरुवात १९६८ मध्ये केली गेली होती.
- टीसीएस ह्या कंपनीचे मुख्यालय भारतातील महाराष्ट्र राज्यातील मुंबई ह्या शहरात आहे.
- टीसीएस कंपनीमध्ये भारतातील इतर सर्व साॅफ्टवेअर कंपनींपेक्षा अधिक कर्मचारी कामाला आहेत.इथे सुमारे चार ते पाच लाख इतके कर्मचारी कामाला आहेत.
टीसीएस कंपनीची एकुण संपत्ती १.२१ हजार करोड इतकी आहे.