उल्हासनगर महापालिका मार्फत अतिरिक्त वकिल पदाच्या ३९ जागांसाठी भरती सुरू -Ulhasnagar Mahanagar Palika Recruitment In Marathi

उल्हासनगर महापालिका मार्फत अतिरिक्त वकिल पदाच्या ३९ जागांसाठी भरती सुरू Ulhasnagar Mahanagar Palika Recruitment In Marathi

उल्हासनगर महापालिका मध्ये वकिल पदाच्या ३९ जागांसाठी भरती सुरू करण्यात आली आहे.

या भरतीविषयी आॅफिशिअल नोटीफिकेशन देखील जारी करण्यात आले आहे.

जे उमेदवार पात्र अणि इच्छुक आहेत त्यांनी लवकरात लवकर खाली दिलेल्या अॅड्रेस वर आपला अर्ज आॅफलाईन पद्धतीने पाठवायचा आहे.

भरतीसाठी अर्ज पाठविण्याचा पत्ता –

विधी विभाग,तळमजला उल्हासनगर महापालिका उल्हासनगर -४२१००३

सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे या भरतीसाठी अर्ज करणारया उमेदवारांना कुठल्याही प्रकारची परीक्षा फी तसेच शुल्क भरावे लागणार नाहीये.

निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना उल्हासनगर ठाणे महाराष्ट्र येथे नोकरीची संधी प्राप्त होणार आहे.

भरती केल्या जात असलेल्या पदाचे नाव -अतिरीक्त वकिल

एकुण पदसंख्या -३९ जागा

  1. मा.सर्वोच्च न्यायालय दिल्ली एकुण जागा -३
  2. मा.उच्च न्यायालय मुंबई एकुण जागा -१०
  3. मा. औद्योगिक न्यायालय ठाणे एकुण जागा -२
  4. मा कामगार न्यायालय एकुण जागा -३
  5. मा न्यायाधीकरण आयोग एकुण जागा -३
  6. मा न्यायाधीकरणे एकुण जागा -३
  7. माननीय लवाद न्यायालय -३ जागा
  8. मा दिवाणी न्यायालय उल्हासनगर
  9. मा सत्र न्यायालय कल्याण
  10. मा जिल्हा न्यायालय ठाणे एकुण जागा -१२ जागा

अर्ज करण्याची सुरूवात –

सदर पदांसाठी अर्ज करायला सुरुवात १३ फेब्रुवारी २०२३ पासुन होणार आहे.

अर्ज करण्याची अंतिम तारीख –

सर्व पात्र अणि इच्छुक उमेदवारांनी सदर भरतीसाठी २४ फेब्रुवारी २०२३ च्या आत आपले अर्ज सादर करायचे आहे.

शैक्षणिक पात्रतेची अट –

  • अभियोक्ताने मान्यताप्राप्त विद्यापीठातून कायद्यातुन पदवी घेतली असल्याची डिग्री प्राप्त केलेली असावी.
  • अभियोक्ता हा वार काऊन्सिल आॅफ महाराष्ट्र अॅण्ड गोवा चा सनदधारक असणे आवश्यक आहे.
  • अभियोक्तास सात पेक्षा अधिक वर्षे स्वतंत्र न्यायालयीन कामकाज करण्याचा अनुभव असायला हवा.
  • अभियोक्तास फौजदारी अणि दिवाणी न्यायालयीन पद्धतीचे उत्तम नाॅलेज असणे आवश्यक आहे तसेच त्या कामकाजाचा अनुभव देखील असायला हवा.
  • अभियोक्ताला मराठी,हिंदी,इंग्रजी या तिन्ही भाषेंचे उत्तम नाॅलेज असणे आवश्यक आहे.
See also  नाशिक येथे 1500+ रिक्त पदांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन । Nashik Rojgar Melava 2023 In Marathi

अधिकृत संकेतस्थळ –

उल्हासनगर महापालिकेचे अधिकृत संकेतस्थळ Www.Umc.Gov.In हे आहे.

शैक्षणिक पात्रतेची अट –

पदानुसार शैक्षणिक पात्रतेच्या अटी काय ठेवण्यात आल्या आहेत हे नोटीफिकेशन मध्ये सविस्तर दिले आहे.तसेच वरील परिच्छेदात पण सांगितले आहे.

निवडप्रक्रिया –

  • सर्व पात्र उमेदवारांची निवड ही मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.
  • इच्छुक वकिल वकिलांची संस्था यांनी सर्व तपशील अणि महत्वाच्या कागदपत्रांसोबत कार्यालयीन वेळेत १३/२/२०२३ ते २४/२/२०२३ पर्यंत संध्याकाळी चार वाजेपर्यंत कार्यालयीन वेळेमध्ये विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
  • अपुर्ण कागदपत्रे अणि उशिरा प्राप्त झालेल्या कुठल्याही कागदपत्राचा विचार करण्यात येणार नाही.
  • न्यायालयीन कामकाजाकरीता ठरविण्यात आलेले दर अणि नियम व अटी तसेच अर्जाचा नमुना इत्यादी माहीती महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळ Www.Umc.Gov.In वर उमेदवारांसाठी उपलब्ध करून दिली आहे.
  • दिलेल्या अटी शर्ती अणि दरसुची यांची इच्छुक वकिल यांनी प्रिंट काढायची आहे.अणि आपल्याला सर्व अटी शर्ती मान्य आहे हे सांगण्यासाठी एक स्वाक्षरी करायची आहे अणि ती अर्जाला जोडायची आहे.कुठल्या न्यायालयासाठी उमेदवार अर्ज करीत आहे याचा त्याने सविस्तर उल्लेख देखील करायला हवा.
  • वकिलांच्या पॅनलची नियुक्ती या विषयी मा आयुक्त उल्हासनगर महापालिका यांचा निर्णय अंतिम निर्णय मानला जाईल.