उमेद अभियान – महिला कर्जाविषयी माहीती- Woman Loan Scheme Information In Marathi

Table of Contents

उमेद अभियान- महिला कर्जाविषयी माहीती- Woman Loan Scheme Information In Marathi

उमेद अभियानांतर्गत दिल्या जात असलेल्या महिला कर्जाविषयी माहीती Woman Loan Scheme Information In Marathi

ग्रामीण भागात राहत असणारया तसेच तळागाळातील प्रत्येक क्षेत्रातील गरीबातील गरीब कुटुंबाला स्वयंरोजगाराची प्राप्ती व्हावी.

त्यांचे दारिद्रय दुर व्हावे ते आर्थिक दृष्टया सक्षम व्हावे म्हणुन सरकार विविध ठोस उपक्रम आपल्यावतीने नेहमी राबवत असते.

आज आपण सरकारकडुन राबविल्या जात असलेल्या अशाच एका महत्वाच्या उपक्रमाविषयी माहीती जाणुन घेणार आहोत.ज्याचे नाव आहे अभियान.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्ती,उमेद अभियान काय आहे?

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमेद हा सरकारकडुन राबविला जात असलेला एक नवीन महत्वाचा उपक्रम तसेच अभियान आहे.

ज्या ग्रामीण भागात राहत असलेल्या स्त्रिया काही विशिष्ट हेतु उददिष्ट साध्य करण्याकरीता सर्व मिळुन विविध महिला गटादवारे एकत्र येत असतात अशा महिलांना ह्या उपक्रमातुन सरकारकडुन पाठबळ दिले जाणार आहे.

एखाद्या विशिष्ट बचत गटाला जेवढी आवश्यकता आहे तेवढे कर्ज बँकेकडुन दिले जावे अशी सोय यात खासकरून करण्यात आली आहे.

See also  Job Interview : आम्ही तुम्हाला कामावर का घ्यावे ? - Why should we hire you explained in Marathi    

सरकारकडुन उमेद अभियान का राबवले जात आहे?याचे उददिष्ट काय आहे?

ग्रामीण भागात राहत असलेल्या गरजु महिलांना देखील स्वताचा उद्योग व्यवसाय सुरू करता यावा.स्वताचा उद्योग व्यवसाय सुरू करून पुरूषांच्या बरोबरीने प्रगती करता यावी,महिलांचे उपजिविकेचे स्रोत अधिक बळकट व्हावे त्यांचे दारिद्रय दुर व्हावे यासाठी सरकार हे अभियान राबवत आहे.

याबाबत राज्य शासनाकडून परीपत्रक देखील २१ आँगस्ट रोजी जारी करण्यात आले आहे

ह्या परिपत्रकात असे नमुद केले आहे की सर्व बँकाकडुन महिला बचत गटांना कुठलेही तारण न घेता कमी व्याज दरात कर्ज प्रदान करण्यात यावे.

उमेद अभियानांतर्गत सरकार महिलांना किती कर्ज उपलब्ध करून देणार आहे?

उमेद अभियानंतर्गत सरकार ग्रामीण भागातील तसेच तळागाळातील गरजवंत महिलांना २० लाखापर्यतचे कर्ज प्रदान करणार आहे.

उमेद अभियानांतर्गत सरकार महिलांना जे कर्ज उपलब्ध करून देणार आहे त्यावर किती व्याज आकारले जाईल?

उमेद अभियानांतर्गत सरकार महिलांना जे कर्ज उपलब्ध करून देणार आहे त्यावर खुप कमी व्याज दराची आकारणी केली जाणार आहे.

उमेद अभियानांतर्गत सरकार महिलांना  त्याकर्जासाठी महिलांना तारण ठेवावे लागेल का?

नही उमेद अभियानांतर्गत सरकार महिलांना जे कर्ज उपलब्ध करून देणार आहे त्याकर्जासाठी महिलांना कुठल्याही प्रकारची वस्तु संपत्ती घराची जमिनीची कागदपत्रे मौल्यवान दागदागिने इत्यादी काहीही तारण ठेवावे लागणार नाहीये.

उमेद अभियानंतर्गत प्राप्त झालेल्या कर्जाच्या रक्कमेत महिला काय काय करू शकतात?

उमेद अभियानांतर्गत जे कर्ज महिलांना दिले जाईल त्या कर्जाच्या रक्कमेत महिला स्वताचा एखादा स्टार्ट अप म्हणजे छोटा मोठा उद्योग व्यवसाय सुरू करू शकणार आहे.

एवढेच नव्हे तर ही कर्जाची रक्कम महिला आपल्या वैयक्तिक खर्चासाठी देखील वापरू शकणार आहे.

उमेद अभियानांतर्गत कमी व्याजदरात प्राप्त होत असलेल्या कर्जाचा लाभ कोण कोण घेऊ शकणार आहे?

उमेद अभियानांतर्गत प्राप्त होत असलेल्या कमी व्याजदरातील कर्जाचा लाभ फक्त महिला बचत गटामधील सदस्य असलेल्या स्त्रियाच घेऊ शकणार आहे.

See also  JEE - जेईई मुख्य परीक्षा ऍडमिट कार्ड 2023 विषयी माहिती -JEE mains admit card 2023 in Marathi

सदर योजनेचा अभियानाचा लाभ घेण्यासाठी सरकारकडुन कोणते अटी नियम ठेवण्यात आले आहेत?

राज्य शासनाच्या आदेशाप्रमाणे अणि केंद्र सरकारने ठरवलेल्या धोरणाप्रमाणे ह्या योजनेचा लाभ त्याच बचत गटाला घेता येईल ज्याची जिल्हयातील ग्रामीण विकास यंत्रणेकडे नोंद असेल.

कोणत्या महिला बचत गटाला शुन्य टक्के व्याज दर आकारले जात असते?

ज्या महिला बचत गटाकडुन आपल्या घेतलेल्या कर्जाची वेळेवर अणि नियमितपणे परतफेड करण्यात येते.अशा महिला बचत गटाला सुमतीबाई सुकळीकर महिला सक्षमी करण योजने मार्फत व्याजावर अनुदान प्रदान करण्यात येते.अणि अशा बचत गटांना शुन्य टक्के व्याज दराची आकारणी करून कर्ज देखील देण्यात येत असते.

महिलांना सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणकोणती महत्वाची कागदपत्र लागणार आहेत?

● आधार कार्ड

● मोबाइल नंबर

● बँकेचे खाते पासबुक बँकेची इतर माहीती

● ज्या व्यवसायासाठी कर्ज घेत आहे त्या व्यवसाय विषयक आवश्यक कागदपत्रे

इत्यादी.

उमेद ह्या अभियानाची आँफिशिअल वेबसाइट कोणती आहे?

उमेद ह्या अभियानाची आँफिशिअल वेबसाइट Www.Umed.In ही आहे.