फक्त दहा रुपये किंमत असलेल्या उर्जा ग्लोबल लिमिटेड कंपनीच्या शेअर्सला इलाॅन मस्कच्या नावामुळे मिळाला एक दिवसात २० टक्के इतका परतावाUrja global share price
उर्जा ग्लोबल कडुन टेसला पाॅवर युएस ए नावाच्या कंपनीसोबत करार केला आहे.
हा करार भारतात टेसला पाॅवर ब्रँड अंतर्गत बॅटरीचे उत्पादन अणि पुरवठा व्हावा ह्या उद्दिष्टाने केला गेला आहे.ह्या करारामुळे उर्जा ग्लोबल ह्या स्माॅल कॅप कंपनीच्या स्टाॅकमध्ये वाढ होताना दिसुन आली आहे.
हयाला कारण असे की गुंतवणूक दारांना टेसला पाॅवर युएस ही कंपनी टेसला कंपनीचा जनक एलाॅन मस्क याची आहे असे वाटले होते.
म्हणुन उर्जा ग्लोबलने अशी घोषणा करताच की त्यांनी टेसला पाॅवर युएस सोबत करार केला आहे ह्या स्टाॅक मध्ये वाढ घडुन आली.अणि उर्जा ग्लोबलच्या शेअरची किंमत अप्पर सर्किटला जाऊन पोहोचली आहे.
अनेक गुंतवणूकदारांनी टेसला कार निर्माता इलाॅन मस्क याची कंपनी आहे असे समजुन टेसला पाॅवर युएस कंपनीचे १२.७० प्रती शेअर २० टक्के अधिक प्रमाणे ह्या शेअर्सची लगबगीने खरेदी देखील केली.
पण नंतर असे समोर आले आहे की टेसला पाॅवर युएस ह्या कंपनीचा इलाॅन मस्क यांच्या टेसला कंपनी सोबत कुठल्याही प्रकारचा संबंध नाहीये.
फक्त ह्या दोघे कंपन्यांच्या नावात साम्य असल्याने गुंतवणूक दारांचा हा गैरसमज झाला आहे.टेसला पावर युएस ही एक कंपनी आहे जी चारचाकी वाहनांच्या इन्व्हर्टर बॅटरी बनवण्याचे काम करते.
७ जुन २०२३ रोजी उर्जा ग्लोबल लिमिटेड ह्या कंपनीने टेसला पाॅवर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड सोबत एक करार केला आहे
उर्जा ग्लोबल लिमिटेड कंपनीचे स्टाॅक २०२२ पासुन डाऊन ट्रेंड मध्ये होते.मागील पाच वर्षांत ह्या शेअर्सने १७५ टक्के इतके रिटर्न दिले आहे.
२०२२ मध्ये जानेवारी मध्ये ह्या कंपनीच्या शेअर्सने ३५ रूपये इतका टप्पा गाठण्यात यश प्राप्त केले होते.यानंतर तो ५० टक्कयांपेक्षा अधिक घसरला अणि आता हे शेअर्स १२.७० वर ट्रेंड करत आहे.
९ जुन २०२३ रोजी हे शेअर्स २० टक्के इतके वधारताना पाहावयास मिळा