अमेरिकेतील आर्थिक संकटाचा फटका आता भारतातील आयटी कंपन्यांना बसणार us bank crisis effect in Marathi
मागील काही दिवसांत अमेरिकेतील सिलिकाॅन व्हॅली,सिगनेचर बॅक युरोपातील क्रेडिट सुईस बॅक अशा अनेक मोठमोठ्या बॅका ह्या आर्थिक संकटात सापडलेल्या आहेत.
अणि हेच परदेशात आलेले आर्थिक संकट आता भारतातील आयटी क्षेत्रासाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कारण भारतीय स्टार्ट अप कंपनींची सुमारे एक ते दोन अब्ज डॉलर इतकी रक्कम ही अमेरिकेतील बॅकेत अडकलेली असल्याचे वृत्त समोर आले आहे.
ह्यामुळे भारत देशातील जेवढयाही दिग्दज आयटी कंपन्या आहेत जसे की इन्फोसिस टीसीएस एच सी एल इत्यादी भारतातील अशा नामांकित दिग्दज कंपन्यांच्या चिंतेमध्ये वाढ होणार आहे.
जेपी मॉर्गन कडुन एक अहवाल प्रकाशित करण्यात आला होता त्यात अशी शक्यता वर्तवली जात आहे की भारतातील टिसीएस इन्फोसिस ह्या कंपनीचे अमेरिकेत सुरू असलेल्या आर्थिक संकटामुळे नुकसान होऊ शकते.
जेपी मॉर्गनच्या विश्लेषकांनी प्रकाशित केलेल्या अहवालात स्पष्टपणे सांगितले आहे की ज्या बॅका सध्या अमेरिकेत आर्थिक संकटाला तोंड देत आहे.
अशा काही बॅकेत भारतातील आयटी क्षेत्रातील नामांकित दिग्दज कंपन्या इन्फोसिस अणि टीसीएस यांचे अधिक एक्सपोजर आहे.
अशी शक्यता वर्तवली जात आहे की नुकत्याच डबघाईस निघालेल्या सिलिकॉन व्हॅली हया बॅकेत टिसीएस अणि इन्फोसिस या भारतातील आयटी क्षेत्रातील नामांकित दोन कंपनीचे दहा ते वीस बेस पाॅईट इतके एक्सपोजर आहेत.
आपल्या भारत देशातील आयटी कंपनींना आधीच युरोपातील सुरू असलेल्या आर्थिक वातावरणामुळे अनेक अडीअडचणींना तोंड द्यावे लागत होते.
अणि कोरोना महामारी आल्यामुळे कंपनींनी तंत्रज्ञानावर अधिक पैसे खर्च करणे देखील बंद केल्याचे दिसून येत आहे.कारण कोरोना महामारी आल्यामुळे मागणीमध्ये प्रचंड घट झाली होती.
अशातच अमेरिकेत सुरू असलेल्या आर्थिक संकटामुळे भारतातील आयटी क्षेत्रातील कंपन्यांना आर्थिक फटका बसला तर देशातील आयटी क्षेत्राची अवस्था अधिक बिकट होऊ शकते.
अणि येत्या तिमाही सहामाही मध्ये भारतीय आयटी कंपन्यांच्या महसुलावर याचा गंभीर परिणाम झालेला आपणास पाहावयास मिळु शकतो.
भारतातील आयटी क्षेत्रातील कंपन्यांना महसुलाची प्राप्ती ही विमा, वित्तीय सेवा अणि महसुल बॅकिंग अशा ह्या तीन क्षेत्रातुन अधिक प्रमाणात होते.
अमेरिके मधील बॅकेचा ह्या महसुलामध्ये सुमारे किमान तीन टक्के इतका वाटा आहे.
भारतातील आयटी कंपनींचे एक्सपोजर परदेशातील म्हणजेच युएस मधील बॅकेत सुमारे ६५ टक्के अणि यूरोप मध्ये २३ इतके आहे.
म्हणुन भारतातील कंपन्यांना आपल्या एक्स पोजर करीता विशेष तरतुदी कराव्या लागणार आहेत.
भारत देशातील जेवढयाही मोठमोठ्या आयटी कंपन्या आहेत त्यांना आपल्या उत्पन्नामधील ४० ते ४५ टक्के इतका महसुल हा विमा,वित्तीय सेवा महसुल बॅकिंग या तीन क्षेत्रांतुन येतो.
म्हणून परदेशातील बॅकेत सुरू असलेल्या आर्थिक संकटाची झळ भारतातील आयटी क्षेत्राला येत्या २०२३-२०२४ साला मध्ये लागु शकते.
तज्ञांनी असे सांगितले आहे की ह्या बॅकिंग संकटामुळे भारतातील आयटी क्षेत्राला २० ते २५ कोटी इतके नुकसान होऊ शकते.
कारण भारत देशातील सर्वात मोठ्या आयटी कंपन्या टीसीएस,इन्फोसिस,विप्रो, एचसीएल,यांचा सर्वाधिक व्यवसाय हा अमेरिकन वित्तीय संस्था सोबत चालतो.
भारतात आयटी क्षेत्रातील सर्वाधिक महसुल ह्या वर्षी बीएफ एस आय मधुन आला होता.ज्यात उत्तर अमेरिका देशाचा ५० ते ५५ टक्के इतका वाटा आहे.
विप्रो ह्या कंपनींचा ३० ते ३५ टक्के तर एचसीएल कंपनीचा २० टक्के इतका महसुल बीएफ एस आय मधुन येतो.