वंदे मेट्रो प्रकल्प-शंभर किलोमीटर आत येणारया दोन शहरांना मेट्रो सिटींना जोडणार -Vande Metro Project information in Marathi

Vande Metro Project

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी वंदे भारत ह्या प्रकल्पाला मिळालेल्या यशानंतर आता नवीन प्रकल्पाची सुरुवात करायला आरंभ केला आहे.

वंदे मेट्रो प्रकल्पाअंतर्गत शासन शंभर किलोमीटरच्या आत येणारया दोन महत्वाच्या शहरांना,महत्वाच्या मेट्रो सिटींना जोडण्याचे काम करणार आहे.

ह्या वर्षीच्या २०२३ च्या अखेरपर्यंत हा प्रोजेक्ट लाॅच देखील केला जाईल असे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले आहे.

रेल्वे मंत्री यांनी दिलेल्या माहितीनुसार ह्या वंदे मेट्रोची फ्रिक्वेन्सी दिवसातुन पाच ते सहा वेळा असणार आहे.

वंदे मेट्रो प्रकल्पाचे महत्व –

शंभर किलोमीटर आत येणारया दोन शहरांना मेट्रो सिटींना जोडणारी अशी कुठलीही रेल्वे सेवा अद्याप उपलब्ध झालेली नाहीये.

पण ह्या वंदे मेट्रो प्रकल्पामुळे आपणास ह्या सेवेचा लाभ घेण्याची संधी मिळणार आहे.

वंदे मेट्रो प्रकल्पाचे होणारे फायदे –

वंदे मेट्रोची जी सेवा शासनाने रेल्वेने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे ती प्रवाशींसाठी आरामदायक अणि सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला परवडेल अशी असणार आहे.

वंदे मेट्रो प्रकल्पामुळे लोकल ट्रेन पॅसेंजर ट्रेन इत्यादी वरचा भार ताण कमी होण्यास मदत होणार आहे.

दररोज ट्रेनने प्रवास करणारया शाळकरी महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच कामाला जाणारया नोकरदार वर्ग यांचा कामाला जाण्यासाठी प्रवास करण्याचा वेळ देखील याने वाचण्यास मदत होणार आहे.

याचसोबत प्रवासाचा वेळ कमी झाल्याने शहरांवरचा ताण देखील कमी होण्यास मदत होईल म्हणजे समजा एखादी व्यक्ती दोन शहरांत प्रवास करत असेल तर ती व्यक्ती प्रवासाचा वेळ वाचवण्यासाठी जिथे त्याला प्रवास करावा लागतो आहे तिथे राहण्यास प्राधान्य देईल.

ही सेमी हायस्पीड मेट्रो रेल्वे दिवसभरात एका शहरातून दुसऱ्या शहरात धावणार आहे.ही एक हायड्रोजन आधारीत स्वदेशी ट्रेन असणार आहे.

See also  इलाॅन मस्कने टविटरचा लोगो का बदलला? Why Elon Musk changed Twitter logo

भारताच्या इंजिनिअर्सकडुन ह्या ट्रेनची डिझाईन केली जात असल्याचे सांगितले जात आहे

ह्या मेट्रोचा वेग १२५ ते १३० किलोमीटर प्रति तास असेल असे सांगितले जाते आहे.

वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनला प्रवाशांकडून दिला जात असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पसंती ही लक्षात घेऊन शासनाने वंदे मेट्रो प्रकल्पाची सुरुवात देखील केली आहे.हा प्रकल्प ह्या वर्षीच्या अखेरपर्यंत म्हणजे डिसेंबर २०२३ पर्यंत लाॅच केला जाणार आहे.

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे असे मत आहे की वंदे मेट्रो प्रकल्पामुळे लोकल ट्रेनमध्ये होणारी गर्दी कमी होईल.