वैदिक हेरीटेज पोर्टल म्हणजे काय? Vedic heritage portal information in Marathi

वैदिक हेरीटेज पोर्टल म्हणजे काय?Vedic heritage portal information in Marathi

काही दिवसांपूर्वी गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्ली येथे एक पोर्टल लाॅच केले होते.ज्याचे नाव वैदिक हेरीटेज पोर्टल असे आहे.

गृहमंत्री अमित शहा यांनी लाॅच केलेल्या ह्या नवीन आॅनलाईन पोर्टलचे संचालन इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राकडून केले जाणार आहे.

हे वैदिक पोर्टल यासाठी लाॅच केले गेले आहे जेणेकरून वैदिक धर्मग्रंथांमधले जेवढे काही ज्ञान आहे

ते सर्वांना वैश्विक पातळीवर प्राप्त करता यावे उपलब्ध व्हावे वैदिक धर्मग्रंथांमधल्या ज्ञानाचा समस्त विश्वाच्या कल्याणासाठी उपयोग केला जाण्यासाठी हे वैदिक पोर्टल लाॅच करण्यात आले आहे.

असे देखील सांगितले जाते आहे की ह्या वैदिक पोर्टलच्या माध्यमातून जनसामान्यांना आपल्या प्राचीन वैदिक धर्म ग्रंथांची सर्व माहीती जाणुन घेता येणार आहे.

अणि जे संशोधक आहेत जे वैदिक धर्मावर संशोधन पर लेख लिहिण्यासाठी संशोधन करता आहे.त्यांना सुदधा ह्या पोर्टलमुळे प्राचीन वैदिक ज्ञान समजुन घेण्यासाठी खुप मदत होणार आहे.

ह्या वैदिक पोर्टलचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे आपणास वैदिक वारसाशी संबंधित सर्व माहीती एकाच ठिकाणी इथे उपलब्ध करून दिली जाते आहे.म्हणुन याचे नाव वैदिक पोर्टल असे ठेवले गेले आहे.

उदा, अमुर्त मौखिक परंपरा, हस्तलिखिते, प्रकाशने इत्यादी.

वैदिक हेरीटेज पोर्टल म्हणजे काय?

Vedic heritage portal information in Marathi

वैदिक हेरीटेज पोर्टल म्हणजे वैदिक वारसा पोर्टल असा अर्थ होत असतो.

यात आपणास सामवेद, अथर्ववेद,यजुर्वेद,त्रगवेद अशा सर्व जून्या वैदीक धर्मग्रंथांची माहीती प्राप्त होणार आहे.

ज्यांना वेदांविषयी माहीती जाणुन घ्यायची आहे की प्राचीन वेदग्रंथामध्ये काय लिहिलेले आहे काय दिलेले आहे ते सर्व वाचक अभ्यासक ह्या पोर्टलला भेट देऊ शकतात.

See also  Vitamin K - आरोग्यासाठी महत्त्व, गरज आणि स्रोत - Importance of vitamin k

ह्या वैदिक वारसा पोर्टलवर चारही वेदांची आॅडिओ तसेच व्हिडिओ रेकॉर्डिंग देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.यात चारही वेदांचे एकुण १८ हजार मंत्र दिले आहे.

आयजी एनसीएचा फुलफाॅम काय होतो IGNCA full form in Marathi

आयजी एनसीएचा फुलफाॅम indira gandhi national centre for arts असा होतो.

आयजी एनसीए म्हणजे काय?IGNCA meaning in Marathi

इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र हे एक स्वायत्त ट्रस्ट आहे.हे ट्रस्ट अमित शहा यांनी लाॅच केलेल्या ह्या नवीन पोर्टलचे संचालन करणार आहे.

आयजी एनसीए हया ट्रस्टची स्थापना ही १९ नोव्हेंबर १९८५ रोजी करण्यात आली होती.

आयजी एनसीए ह्या स्वायत्त ट्रस्टची नोंदणी अणि निर्मिती ही २४ मार्च १९८७ रोजी नवी दिल्ली शहरात करण्यात आली होती.आयजी एनसीए हे ट्रस्ट संस्कृती मंत्रालया अंतर्गत येते.

इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र हे एक असे केंद्र आहे जिथे सर्व प्रकारच्या कलांचा अभ्यास केला जातो.यात सर्व कलांचा अनुभव अणि अभ्यास दोघांचा समावेश असलेला आपणास दिसून येतो.

आयजी एनसीए कडुन ग्रेटर इंडिया नावाच्या एका महत्वाच्या प्रकल्पावर देखील काम केले जाते आहे.हया प्रकल्पा अंतर्गत आयजी एनसीए इतर देशांसोबत भारत देशाच्या संबंधांचे संकलन देखील करीत आहे.

वैदिक हेरीटेज पोर्टलची लिंक –

https://vedicheritage.gov.in/