वेदोक्त प्रकरण म्हणजे काय?
एके काळी ज्या वेदोक्त प्रकरणाचा छत्रपती शाहु महाराज यांना सामना करावा लागला होता त्याच वेदोक्त प्रकरणाला संयोगिताराजे यांना देखील सामोरे जावे लागले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे आहे की राम राम नवमीच्या दिवशी छत्रपती संभाजी राजे यांच्या पत्नी संयोगिताराजे ह्या नाशिक येथील काळाराम मंदिरात दर्शनासाठी गेल्या होत्या.
मंदिरांमध्ये पुजा हवन करीत असताना महंतांनी संयोगिता राजे यांना वेदोक्त मंत्र म्हणयास स्पष्टपणे नकार दिला.अणि पुराणोक्त मंत्र म्हणयास सांगितले.
यावर आक्षेप घेत संयोगिताराजे यांनी सोशल मिडिया वर त्यांच्यासोबत मंदिरात झालेला हा प्रकार पोस्ट द्वारे शेअर केला तेव्हापासून सगळीकडे एकच चर्चा सुरू झाली आहे हे वेदोक्त प्रकरण म्हणजे काय?
अणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे याआधी शाहु महाराज यांना देखील ह्या वेदोक्त प्रकरणास सामोरे जावे लागले होते.
म्हणुन आजच्या लेखात आपण वेदोक्त प्रकरण म्हणजे काय या वेदोक्त प्रकरणास शाहु महाराज यांना का सामोरे जावे लागले हेच सविस्तरपणे जाणुन घेणार आहोत.
वेदोक्त प्रकरण म्हणजे काय?संयोगिताराजे यांना वेदोक्त मंत्र म्हणयास नकार का देण्यात आला?
अनेक महंत त्रषी यांचे असे मत आहे की वेदोक्त मंत्राचा जप करण्याचा सर्वसामान्य व्यक्तीस कुठलाही हक्क नाही.म्हणुन महंतांकडुन ब्राहमण,क्षत्रिय,वैश्य यांना वगळता इतर कोणालाही वेदोक्त मंत्र म्हणण्यास मनाई केली जाते.
हेच कारण आहे ज्यामुळे संयोगिताराजे यांना देखील वेदोक्त मंत्राचा जप करण्यास महंतांकडुन मनाई करण्यात आली.अणि पुराणोक्त मंत्रांचा जप करा असे सांगण्यात आले होते.
आर्यामध्ये जे तीन गट पडत असतात त्यामधुन प्रतिष्ठेच्या क्रमाने फक्त ब्राम्हण,वैश्य,क्षत्रिय हेच वेदोक्त मंत्राचा जप करण्यासाठी पात्र आहेत असे अनादिकालापासून मानण्यात आले आहे.
जे शुद्र वर्णीय आहेत त्यांना वेदोक्त मंत्राचे पठन करण्याचा वेदोक्त मंत्रादवारे होम हवन संस्कार करण्याचा कुठलाही अधिकार नाही.असे अनादी काळापासून मानले जाण्याची परंपरा आहे.
ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांनी वेदविद्यालयातुन वेदांचा वेदशास्त्रांचा सखोल अभ्यास केलेला असतो.शिक्षा ग्रहण केलेली असते म्हणून त्यांनीच वेदांचा जप करावा असे देखील जुन्या काळापासून मानले जाते.
पुराणोक्त मंत्र कशाला म्हणतात?
पुराणोक्त मंत्र म्हणजे असे काही मंत्र ज्यांची रचना निर्मिती ही पुराणामधुन वर्णिलेली आहे.हा मंत्र संस्कृत भाषेतीलच असतो.
वेदोक्त प्रकरणाच्या वादास प्रारंभ कसा अणि कुठून झाला?शाहु महाराज यांना वेदोक्त मंत्र जपण्यास का मनाई करण्यात आली होती?यावर शाहु महाराज यांनी कोणते पाऊल उचलले?
एकेकाळी शाहु महाराज यांना देखील वेदोक्त मंत्राचा जप करण्यास मनाई करण्यात आली होती ज्या विरूद्ध शाहु महाराजांनी आवाज देखील उठवला होता.
१८९९ चा काळ होता शाहु महाराज पंचगंगेवर रोजच्या प्रमाणे अंघोळीला गेले होते.
एकेदिवशी शाहु महाराज पंचगंगेवर अंघोळीला/स्नान करण्यास गेले असताना राजाराम शास्त्री भागवत यांनी शाहु महाराज यांना एक गोष्ट निदर्शनास आणून दिली.
ती म्हणजे नारायण भट नामक व्यक्ती अंघोळ करताना म्हणजेच स्नान करताना वेदोक्त मंत्राचा जप न करता पुराणोक्त मंत्रांचा जप करत आहे.
यावर शाहु महाराज यांनी नारायण भट यांना वेदोक्त मंत्राचा जप करण्यास सांगितले असता नारायण भट म्हणाले की मी शुद्र आहे.म्हणुन वेदोक्त मंत्राचा जप करण्यास मी पात्र ठरत नाही.
इथुनच खरया अर्थाने वेदोक्त प्रकरणास आरंभ झाला.अणि शाहु महाराज यांनी ह्या भेदभावाविरूदध जातीभेदाच्या विरूद्ध आवाज उठविण्यासाठी पाऊले उचलण्यास सुरुवात केली.
यानंतर शाहु महाराज यांनी एक अध्यादेश काढला ज्यात असे दिले होते की राजकारणात केल्या जात असलेल्या सर्व दैनंदिन तसेच नैमित्तिक स्वरूप असलेल्या धार्मिक क्रिया ह्या पुराणोक्त विधीनुसार न करता वेदोक्त विधीनुसारच केल्या जाव्यात.
जातीय भेद/उच्च नीच्च शुद्ध अशुद्ध हा भेदभाव संपुष्टात आणण्यासाठी शाहु महाराज यांनी घेतलेला एक सर्वात मोठा ऐतिहासिक निर्णय होता.
महाराजांच्या ह्या आदेशावर अनेक लोकांनी आक्षेप घेतले टिका टिप्पणी देखील केली पण शाहु महाराज आपल्या निर्णयावर अखेरपर्यंत ठाम राहिले.
वेदोक्त प्रकरण पुन्हा चर्चेत येण्याचे कारण काय आहे?
एकेकाळी जो वेदोक्त प्रकरणाचा सामना शाहु महाराज यांना करावा लागला होता तोच अनुभव संयोगिताराजे यांना काळाराम मंदिरात आला असे संयोगिताराजे म्हणाल्या आहेत.म्हणुन हे प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे.
संयोगिताराजे यांनी सोशल मिडिया वर पोस्ट शेअर करत काय सांगितले?
शाहु महाराज यांनी ज्या जुन्या मानसिकतेत विचारांमध्ये परिवर्तन घडवुन आणण्यासाठी आवाज उठविला होता
गेल्या शंभर वर्षांमध्ये अजुनही ह्या जुन्या मानसिकतेत विचारांमध्ये पाहिजे तसे परिवर्तन घडुन आले नाहीये.
अजुनही शाहु महाराजांच्या विचारांना खोलवर रूजवण्याची आवश्यकता आहे.
संयोगिताराजे यांनी घेतलेल्या आरोपावर मंदिरातील महंतांनी काय उत्तर दिले आहे?
न्युज चॅनलवर मुलाखत देताना मंदिरातील पुजारी यांनी असे सांगितले आहे की छत्रपती घराण्याचा अपमान होईल असे कुठलेही वक्तव्य मी केलेले नाहीये.
मंदिरात आलेल्या संयोगिताराजे यांनी पुजा करताना सांगितले की आम्ही छत्रपती घराण्यातील आहोत आमचे पुजन वेदानुसार करा.यावर मी पूर्ण आदराने त्यांचा सन्मान राखत त्यांना बोललो की प्रभु रामचंद्रांना कुठल्याही यजमानांचे अभिषेक पुजन केल्यावर पुरूष सोक्तानेच अभिषेक पुजन केले जाते.
शुक्ल यजुर्वेद मधील २१ व्या अणि त्रगवेदाच्या दहाव्या मंडलात अधयायामध्ये दिलेली मंत्र रचना आहे.त्यानुसारच आम्ही पुजा करत असतो.
यानंतर पुजा अभिषेक झाल्यानंतर प्रसाद दिल्यानंतर ताईसाहेबांनी मला दक्षिणा दिली मी ताईसाहेब यांना त्यांच्या गाडीपर्यत मोठ्या आदराने सोडायला देखील गेलो होतो.
थोडक्यात छत्रपती घराण्याचा अपमान होईल असे कुठलेही वक्तव्य मी केलेले नाही असे उत्तर मंदिरातील महंतांनी दिले आहे.