मंगल पांडे कोण होते?भारतीय स्वातंत्र्य लढ्यात मंगल पांडे यांनी दिलेले अमुल्य योगदान
आज ८ एप्रिल म्हणजेच भारतीय स्वातंत्र्य सेनानी मंगल पांडे यांची पुण्यतिथी आहे.
मंगल पांडे हे भारतातील एक थोर स्वातंत्र्यसेनानी होते.ज्यांनी १९५७ मधील भारतीय स्वातंत्र्य लढयात आपले फार मोलाचे योगदान दिले होते.
मंगल पांडे हे ईस्ट इंडिया कंपनीच्या ३४ व्या बंगाल इंनफ्रनट्रीचे सैनिक होते.ब्रिटीश शासनाने त्यांना ब्रिटिश शासना विरूद्ध आवाज उठविण्यासाठी बंडखोर म्हणून घोषित केले होते.
मंगल पांडे यांनी दाताने काडतुस चावण्यास नकार दिला होता ज्याचे परिणाम स्वरुप त्यांना त्यांच्या ह्या बंडखोरी साठी ब्रिटिश शासनाने अटक देखील केली होती.
अणि १८५७ मध्ये आजच्याच दिवशी ८ एप्रिल रोजी त्यांना फासावर लटकवण्यात आले होते.मंगल पांडे यांना भारतामध्ये १८५७ मधील स्वातंत्र्य लढ्यातील मुख्य नायक म्हणून संबोधले जाते.
मंगल पांडे यांनी भारतीय स्वातंत्र्यलढयात आपली जी महत्वाची भुमिका पार पाडली त्यासाठी भारत सरकारच्या वतीने त्यांचा सन्मान देखील करण्यात आला होता.१९८४ मध्ये त्यांच्या सन्मानार्थ टपाल तिकीट जारी करण्यात आले होते.
आजच्या लेखात आपण मंगल पांडे कोण होते त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात काय योगदान दिले हेच आपण जाणुन घेणार आहोत.
मंगल पांडे कोण होते?
मंगल पांडे हे भारतातील स्वातंत्र्य लढ्यात आपली मोलाची भुमिका पार पाडणारे एक महान आद्य क्रांतीकारक होते.
मंगल पांडे यांचा जन्म उत्तर प्रदेश मधील नगवा फैजाबाद येथे हिंदू धर्मातील एका ब्राम्हण परिवारात झाला होता.
मंगल पांडे फक्त वय वर्ष अठरा असताना ईस्ट इंडिया कंपनीच्या बंगाल इंनफ्रनट्री मध्ये सैनिक पदावर भरती झाले होते.
ईस्ट इंडिया कंपनीच्या सैनिकांसाठी १८५० मध्ये एक असे इनफिल्ड रायफल आणण्यात आले जिच्या काडतुसात गाय म्हैस बैल डुक्कर ह्या जनावरांची चरबी लावली गेली होती.
हे काडतुस वापरण्या अगोदर सैनिकांना याच्यावरील चरबी तोंडाने काढावी लागायची.
हा प्रकार मंगल पांडे यांच्या लक्षात आला अणि मंगल पांडे यांनी गायी म्हशी डुकराची चरबी यापासुन तयार करण्यात आलेले हे काडतुस दाताने चावायला नकार दिला अणि ब्रिटिशांविरुद्ध बंड पुकारले.
झाले असे की त्याकाळी ब्रिटीश सैन्यात अनेक भारतातील हिंदु देखील भरती झाले होते ज्यात मंगल पांडे यांच्या सोबत अनेक भारतीय हिंदु व्यक्तींचा समावेश होता.
काडतुस दाताने चावण्यास विरोधाचे कारण काय होते?
मंगल पांडे हे जातीने ब्राह्मण होते अणि सैन्यातील भरती झालेले सर्व भारतीय व्यक्ती हिंदु अणि मुस्लिम धर्मातील असल्याने गायीच्या बैलांच्या डुकराच्या चरबीपासुन बनवलेल्या काडतुसाला दात लावायला सर्व भारतीय सैनिकांचा विरोध होता.
सर्व हिंदु सैनिकांचे असे म्हणने होते की हिंदू धर्मात गायीला बैलाला अत्यंत पुजनीय मानले जाते पुजले जाते असे मानण्यात येते की गायीच्या उदरात ३३ कोटी देव वास करतात
म्हणून हिंदु धर्मात गाय म्हैस यांची हत्या केली जात नाही किंवा त्यांचे मांस देखील खाण्यात येत नाही.त्यांची पुजा केली जाते.अणि इंग्रजांनी दाताने चावायला दिलेले हे काडतुस जर आम्ही चावले तर आमचा धर्म भ्रष्ट होईल.असे मत सर्व हिंदुचे होते.
दुसरीकडे सैन्यात मुस्लिम देखील समाविष्ट होते ह्या मुस्लिमांना डुक्कर हे निषिद्ध होते पण डुकराच्या चरबीपासुन बनवलेल्या काडतुसाला त्यांना तोंड लावावा लागत होते अणि हे मुस्लिम सैनिकांना मान्य नव्हते.
थोडक्यात ब्रिटीश सरकार हिंदु अणि मुस्लिम यांचा धर्म भ्रष्ट करण्यासाठी असे निदर्शनास आले ज्यामुळे सर्व सैनिकांनी ही काडतुसे वापरण्यास नकार दिला ज्यात मंगल पांडे देखील समाविष्ट होते.
काडतुसे वापरण्यास नकार देताना इंग्रजां विरूद्ध बंड पुकारताना ब्रिटीशांच्या अन्याया विरूद्ध आवाज उठविण्यासाठी मंगल पांडे यांनी एका इंग्रज अधिकारीची गोळी घालुन हत्या देखील केली.
याचे परिणाम स्वरुप त्यांना ब्रिटीश सैन्यातुन काढुन टाकण्यात आले.याला निषेध व्यक्त करत मंगल पांडे यांनी ब्रिटिशांविरुद्ध इतर सैनिकांसोबत मिळुन कारवाया करण्यास सुरुवात केली.
ज्याचे परिणाम स्वरुप त्यांना अटक देखील करण्यात आली होती.कोर्टात जेव्हा मंगल पांडे यांच्यावर खटला दाखल करण्यात आला तिथे मंगल पांडे यांनी न घाबरता आपण इंग्रज अधिकारीची हत्या केली अशी कबुली दिली.
म्हणून मंगल पांडे यांना १८ एप्रिल रोजी फाशी देण्याचा निर्णय कोर्टाने घेतला.
पण इंग्रजांच्या मनात भीती होती की मंगल पांडे यांना फाशीची शिक्षा सुनावली गेली आहे हे कळताच ही बातमी संपुर्ण भारतात वारयासारखी पसरली अणि जनतेने यास विरोध केला तर आपणास भारत देश सोडण्याची वेळ येईल म्हणून मंगल पांडे यांना १८ एप्रिल ऐवजी ८ एप्रिल रोजीच फासावर लटकविण्यात आले होते.
अशा पद्धतीने आपल्या धाडस अणि दृढ संकल्पामुळे मंगल पांडे यांना फाशीची शिक्षा सुनावली गेली.
असे म्हटले जाते की इथूनच इंग्रजांविषयी भारतात असंतोष निर्माण झाला अणि भारतात इंग्रज सत्तेविरुद्ध आवाज उठविण्यासाठी सुरुवात झाली.ब्रिटीश सत्तेविरुद्ध वातावरण निर्माण होऊ लागले.
म्हणुन मंगल पांडे यांना १८५७ मधील केलेल्या ह्या त्यांच्या बंडामुळे स्वातंत्र्य लढ्यातील मुख्य नायक म्हणून ओळखले जाते.