जीवनसत्वे – Vitamin Foods list in Marathi
सर्व सजीवांच्या योग्य वाढीसाठी आणि उत्तम आरोग्यासाठी कर्बोदके, मेद, प्रथिने गरजेची असतात. या कार्बनी पदार्थांव्यतिरिक्त काही विशिष्ट कार्बनी संयुगांची अगदी लहान प्रमाणात आवश्यकता असते. या संयुगांची कमतरता निर्माण झाल्यास सजीवांची वाढ खुंटते. तसेच त्यांना काही आजार व विकार उद्भवतात.
अशा कार्बनी संयुगांना जीवनसत्त्वे म्हणतात. अन्नातील विशिष्ट घटकांच्या कमतरते मुळे विकार उत्पन्न होतो, हे बेरीबेरी विकारासंबंधी झालेल्या संशोधनातून (१८९३ – ९७) क्रिस्तीआन आइकमान या वैज्ञानिकाच्या लक्षात आले. या संशोधनासाठी त्यांना नोबेल पुढे पुरस्कार देवून गौरवीण्यात आले.
१९१२ मध्ये कॅसिमिर फून्क या वैज्ञानिकाने या संयुगांना व्हिटॅमिन्स हे नाव दिले.
शरीराला जीवनसत्त्वे ही अल्प प्रमाणात पण आवश्यक असतात ,शरीरातील चयापचय प्राक्रियांमध्ये विकरांबरोबर जीवनसत्त्वे सहविकर व गतिवर्धक म्हणून भाग घेतात.
वनस्पतीत बहुतेक सर्व जीवनसत्त्वांची अथवा त्यांच्या पूर्वगामी संयुगांची स्वय-निर्मिती होते. परंतु सर्व प्राण्यांना जीवनसत्त्वांसाठी आपल्या रोजच्या आहारातील अन्नघटकांवर अवलंबून राहावे लागते. अन्नघटकांप्रमाणे जीवनसत्त्वांचे पचन होत नाही तर ती जठर आणि लहान आतडयात शोषली जातात. त्यानंतर ती आवश्यकतेनुसार शरीराच्या भागांत नंतर शोषली जातात.
जीवनसत्त्वांचे स्निग्ध पदार्थात विरघळणारी मेदविद्राव्य व पाण्यात विरघळणारी जलविद्राव्य असे प्रकार केले आहेत
जीवनसत्वे कार्य व कमतरता – Vitamin Foods list in Marathi
- अ, ड, ई, के – मेदविद्राव्य आणि
- ब, क ही – जलविद्राव्य जीवनसत्त्वे आहेत.
जीवनसत्त्व “अ”
चे फायदे–डोळ्यांचे आरोग्य उत्तम ठेवण्यास मदत,जीवनसत्त्व अ कमी असल्यास रातांधळेपणा हा आजार होऊ शकतो.
जीवनसत्त्व “ब”
आपल्या शरितातील रक्तातीतील आवश्यक घटक निर्माण करण्यास मदत करते, जीवनसत्त्व ब कमी असल्यास बेराबेरी त्रास होतो जसे, तोंडात फोड,पायना त्रास होणे आणि पायाची लाही होणे
ज्याला इंग्रजीत wheat bran म्हणतात त्या हातसडीच्या तांदूळाच्या वरच्या भागात ब जीवनसत्त्व जास्त असते. कुठलीही भाजी आणि आपल्या रोजच्या जेवणात ब विटामीन जास्त प्रमाणात असते.तांदुळ, डाळींना जास्त घासून व पुन्हा धुवू नये त्यामुळे बरेच जीवनसत्त्वे निघून जातात शक्यतोवर साली सकट डाळी चा स्वयंपाकात उपयोग करावा.
जीवनसत्त्व “क”
कमी असल्यास केस गळणे व हिरड्या ना सूज किंवा रक्त येते ,हिरड्यांतून रक्त तसेच संधीवताच त्रास होतो. जीवनसत्त्व “क” मुळे जखम लवकर सुधारण्यास मदत होते तसेच रोजच्या आहारातील जास्त लोह शोषून घेण्यास मदत करते . अंबिवलेले पदार्थ उदा. ढोकळा, इडली इ.मध्ये विटामिन सी मोट्या प्रमाणात असते.
जीवनसत्त्व “ड”
व कॅल्शियमचे कमी असल्यास लहान मुलांना चे पाय ढिले पडतात किंवा वाकतात, लहान मुलांमध्ये आपणास छातीतली हाडे दिसतात, हाडात गाठी होणे हा मुडदूस ‘ड’ जीवनसत्त्व शरीरात कमी असल्याने होतो.
तसेच शरीरातील हाडे आणि दाताचा मजबुत ठेवण्याकरता ड जीवनसत्त्वे आवश्यक असते
,
Vitamin Foods list in Marathi
व्हिटॅमिन नाव | अन्न पदार्थ |
---|---|
व्हिटॅमिन A – | दही दूध,अंडी, चीझ, मासे,बटाटा, गंगाफळ, आंबे, ब्रोकोली, काजू,अक्रोळ आणि डाळी |
व्हिटॅमिन B – | |
व्हिटॅमिन थायमिन -B1 | तांदूळ,भाजीपाला,ताजे फळ,वाटाणा, अंडी,लिव्हर,यीस्ट आणि सूर्यफूल बिया. |
व्हिटॅमिन रायबोफ्लेवीन-B2 | मटण, डाळी, हिरवा भाजीपाला, बदाम,मशरूम, सोयाबीन,दूध,दही, ब्रोकोली,पालक |
व्हिटॅमिन नायसीन-B3 | सुकामेवा, कॉफी, सुकलेले टोमॅटो,तांदूळ आणि गव्हाचा चा |
व्हिटॅमिन एडेनीन-B4 | मिरच्या, लवंग, आलं,स्ट्राबेरी, शुद्ध मध ,ताजेभाजीपला आणि फळ |
व्हिटॅमिन पॅनटोथेटिक-B5 | मांस, चिकन, लिव्हर, ब्रोकोली , |
व्हिटॅमिन कॅडोपायरीडॅक्सिन -B6 | मांस.मटण अंडे ,दूध, कडधान्य,मिरच्या,लसूण, बटाटा,केळ, चीझ,तांदूळ,मनुके, कांदा, टोफू |
व्हिटॅमिन बायोटिन- B7- | कच्च अंड्यातील पिवळा भाग, शेंगदाणे, निंबवर्गीय फळे,हिरवा भाजीपाला, मांस,मटण, मासे,अक्रोळ,,सोयाबीन,डाळी, गव्हाची अंकुर आणि ब्राऊन राईस |
व्हिटॅमिन फॉलिक ऍसिड – B9 | डाळी,निंबवर्गीय फळ,यीस्ट,गडद हिरवेगार भाजीपाला, मोड आलेले धान्य,बीट्स,मका , ब्रोकोली अंडी, चीझ, मासे |
व्हिटॅमिन क्यायनोकोबालमीन-B12 | मांस,लिव्हर,मासे,अंडी, चीझ,,दूध, गाईचे दूध |
व्हिटॅमिन C क | निंबवर्गीय फळ, मीरच्या, पपया,पेरू स्ट्राबेरी, आंबा, द्राक्षे, ,अननस,टरबूज, ब्रोकोली, कॅबेज,कोबी,पालक, फुलगोबी,सूर्यफूल,टोमॅटो आणि बटाटा |
व्हिटॅमिन D ड | दूध, कडधान्य, संत्रा रस,मशरूम, कॉड लिव्हर ऑइल, आणि चीझ |
व्हिटॅमिन E ई | गहू जर्म ऑइल, सोयाबीन तेल, मका तेल, तीळतेल,सूर्यफूल तेल, भाजलेले, बदाम, पाम नई सूर्यफूल तेल, पालक,किवी फळ,ब्रोकोली, गंगाफळ रताळे, पपई, आंबा, ,लालमीरची, टोमॅटो आणि लेटुस |
नक्की वाचा – समतोल आहार म्हणजे काय ?
English names – Vitamin Foods list in Marathi
VITAMINS CHEMICAL NAMES
- Vitamin A Retinol
- Vitamin B1 Thiamine
- Vitamin B2 Riboflavin
- Vitamin B3 Niacin
- Vitamin B5 Pantothenic acid
- Vitamin B7 Biotin
- Vitamin B9 Folic Acid
- Vitamin B12 Cobalamin
- Vitamin C Ascorbic acid
- Vitamin D Calciferol
- Vitamin E Tocopherol
- Vitamin K Phylloquinone
- Antipellagra vitamin – Vitamin B3
- purevitamin – Vitamin C
- Anti ricketic vitamin – Vitamin D
- Sunslight Vitamin – Vitamin D
- Infertility Vitamin – Vitamin E
- beautiful Vitamin – Vitamin E
- Coagulation vitamin – Vitamin K
वाचा –
Comments are closed.