विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना विषयी माहिती -Vitthal Rukmini varkari vima yojana

विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र – Vitthal Rukmini varkari vima yojana

वारकरी बांधवांसाठी नुकतीच एक महत्वाच्या योजनेची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली आहे.

जे वारकरी पंढरपूर मधील आषाढी वारी मध्ये समाविष्ट झाले आहेत अशा सर्व वारकरी बंधुं करीता सरकारने विठ्ठल रूक्मिनी वारकरी विमा छत्र योजना सुरू केली आहे.

ह्या योजनेअंतर्गत शासन पंढरपूर मधील आषाढी वारीत सहभागी झालेल्या सर्व वारकरी बांधवांना विमा संरक्षण देणार आहे.

याबाबत अधिकृत घोषणा देखील एकनाथ शिंदे अणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडून करण्यात आली आहे.

काय आहे विठ्ठल रूक्मिनी वारकरी विमा छत्र योजना?

Vitthal Rukmini varkari vima yojana – विठ्ठल रूक्मिनी वारकरी विमा छत्र योजना विषयी माहिती

विठ्ठल रूक्मिनी वारकरी विमा छत्र योजनेअंतर्गत ज्या वारकरींचा वारी दरम्यान दुर्दैवाने मृत्यू होईल अशा वारकरी बांधवांच्या परीवारास पाच लाख रुपये इतके अनुदान प्रदान करण्यात येणार आहे.

अणि समजा एखाद्या वारकरी बांधवांला वारी दरम्यान अपंगत्व तसेच विकलांगता आली तर त्याला एक लाख रुपये इतके आर्थिक मदत केली जाणार आहे.

ज्या वारकरी बांधवांना वारी दरम्यान अंशत अपंगत्व आले त्यांना ५० हजार रुपये देण्यात येणार आहे.

वारी दरम्यान एखादा वारकरी आजारी पडला तर त्याच्या आजारावर उपचार करण्यासाठी शासन ३५ हजार रुपये देणार आहे.

विठ्ठल रूक्मिनी वारकरी विमा छत्र योजनेचा मुख्य हेतु काय आहे?

वारीच्या कालावधी दरम्यान जे काही अपघात तसेच दुर्घटना वारकरी बांधवांसोबत घडुन येत असतात.ज्यात वारकरी बांधव गंभीर जखमी होतात त्यांना अपंगत्व विकलांगता येते किंवा काही वेळा त्यांचा ह्या दुर्घटनेत मृत्यू देखील होतो.

अशा वारकरी बांधवांच्या परीवारास आर्थिक साहाय्य प्रदान करण्यासाठी शासनाने ही विठ्ठल रूक्मिनी वारकरी विमा छत्र योजना सुरू केली आहे.

See also  आंबा पिकावरील कीड - Mango pest management.

विठ्ठल रूक्मिनी वारकरी विमा छत्र योजनेचे फायदे कोणकोणते आहेत?

शासनाच्या ह्या योजनेमुळे लाखो वारकरी बांधवांना शासनाकडुन मोफत विमा संरक्षण प्राप्त होणार आहे.

वारीच्या दरम्यान ज्या वारकरींचा मृत्यू होतो किंवा त्यांना कायमस्वरूपी अपंगत्व विकलांगता येते अशा वारकरी बांधवांच्या परीवारास एक आर्थिक मदत ह्या योजनेमुळे प्राप्त होणार आहे.

पण वारीच्या ३० दिवसांकरीता फक्त हे विमा संरक्षण दिले जाणार आहे.ही योजना राबविण्याचे काम मदत पुनर्वसन विभाग करेल.

२९ जुन २०२३ रोजी आषाढी एकादशी आहे.त्यामुळे विठुरायाच्या दर्शनासाठी महाराष्ट्र राज्यातील कानाकोपऱ्यातून भक्तजण जाताना दिसुन येत आहेत.

अनेक भाविक पायपीट करत दूर अंतरावरून विठुरायाच्या दर्शनासाठी विशेषतः येत असतात.पण प्रवासा दरम्यान काही वारकरी बांधवांना दुखापत होते किंवा एखाद्या दुर्घटनेत अपघातात ते गंभीर जखमी होतात.काही जणांचा तर मृत्यू देखील होतो.

अशा वारकरी बांधवांना अणि त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक साहाय्य प्रदान करण्यासाठी शासनाने ही महत्वाची घोषणा केली आहे.