बजेट ओळख – अंदाजपत्रक कश्याला म्हणतात ? – What is Budget
देशाचे बजेट आणि अर्थ संकल्प याविषयी जेव्हा आपण ऐकत असतो तेव्हा बजेट आणि अर्थसंकल्प हे आपणास फार किचकट डोक्यावरून जाणारे विषय वाटत असतात.
निर्मला सीतारमन ज्या भारताच्या अर्थमंत्री आहेत त्यांच्याकडुन 1 फेब्रुवारी रोजी 2021-2022 ह्या वर्षीचा अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे.
मागील दोन तीन वर्षांपासुन कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जो लाँकडाऊन लावण्यात आला होता.सर्व काम धंदे उद्योग व्यवसाय बंद ठेवण्यात आले होते त्याचा परिणाम आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर देखील झाला आहे.
ज्यामुळे शुन्याच्या खाली गेलेला भारतातील अर्थव्यवस्थेच्या प्रगतीचा दर तसेच कमी झालेले रोजगार उद्योगधंदे ह्या सर्व बाबी लक्षात घेता ह्या वर्षीचा जो अर्थसंकल्प मांडण्यात येईल तो खुपच महत्वपुर्ण ठरणार आहे.
म्हणुन आजच्या लेखात आपण बजेट म्हणजे काय?बजेट कसे तयार केले जाते?बजेटमध्ये कोणकोणत्या बाबी असतात?आणि सरकारला उत्पन्न कुठून प्राप्त होत असते इत्यादी सर्व महत्वाच्या बाबींविषयी सविस्तरपणे जाणुन घेणार आहोत.
Budget म्हणजे काय?
बजेट म्हणजे आपल्या देशाकडे ह्या वर्षी अंदाजे किती पैसे जमले आहेत?आणि ह्या जमा झालेल्या पैशांमध्ये किती पैसे खर्च करायचे आहे आणि कुठे खर्च करायचे आहे याविषयीचे एक डाँक्युमेंट असते.
ब्रिटीश कालावधीपासुन प्रत्येक वर्षी 28 फेब्रूवारी ह्या तारखेला देशाचे बजेट सादर केले जात असते.आणि त्याअगोदर रेल्वेमंत्री हे बजट अलग सादर करीत असतात.
पण गेल्या काही वर्षापासुन देशाचे बजेट नेहमी 1 फेब्रुवारी रोजी सादर केले जात आहे.ज्यात रेल्वेचे बजेट देखील समाविष्ट आहे.
Budget शब्दाचा इतिहास
आपण या अर्थसंकल्पास बजेट च का म्हणतो या मागे ही एक इतिहास आहे.
घरात, ऑफिस किंवा सगळीकडे लोक बजेट शब्द अगदी सहज वापरताना दिसतात याचा सहसा ताळमेळ या अर्थाने वापर होतो. ऑफिस मध्ये फर्निचर किंवा काही खरेदी, घरात काही विकत घेणे असो, बजेट एक परवलीचा शब्द झाला आहे. रोज व्यवहारात बजेट शब्दाचा याचा वापर आपण करत असतो
अस ही मानलं जातं कि 1733 मध्ये इंग्लंडचे तेव्हाचे अर्थ मंत्री सर रॉबर्ट व्हॉलपोल यांनी बजेट सादर करण्यसाठी संसदेत येताना एक चामड्याची पिशवी सोबत आणली होती. त्यानंतर बजेट हा शब्द प्रचिलीत झाला.
Bougette फ्रेंच शब्द व Bouge म्हणजे चामड्याची पिशवी
आणि लाल रंगाची बॅग सोबत आणून बजेट मांडण्याची परंपरा सुरू झाली ती 1860 मध्ये
तेव्हाचे इंग्लंड चे बजेट प्रमुख विलियम ईव्हर्ट ग्लाडस्टोन यांनी बजेट पेपर लाल बॅगेत व राणीचा सोन्याचा हॉलोग्राम सोबत आणून ही प्रथा सुरू केली.
Budget कसे तयार केले जात असते?
- देशाचे अर्थ खाते,निती आयोग,विविध मंत्रालये मिळुन अर्थसंकल्पावर काम केले जात असते.
- अर्थ खात्यामधील आर्थिक कार्य विभाग म्हणजेच डिपार्टमेंट आँफ इकोनाँमिक अफेअर मधील बजेट डिव्हीजन कडुन हा अर्थसंकल्प सादर केला जात असतो.
- विविध मंत्रालय,राज्ये,केंद्रशासित प्रदेश,संरक्षण विभागामधली विविध खाती आणि स्वायत्त संस्था हे सर्व मिळुन आपल्या सर्व मागण्या किंवा खर्चाचा एकुण अंदाज बजेट डिव्हीजनकडे सादर करत असतात.
- आणि मग त्याचक्षणी विविध समिती,शेतकरी,उद्योजक,अर्थतज्ञ यांच्याशी सल्ला मसलत केली जाते.मग टँक्सविषयी निर्णय घेतला जात असतो.
- आणि मग वरील सर्व फंडची तरतुद टँक्सविषयी बाबींवर पंतप्रधानांनी शिक्कामोर्तब केल्यावर देशाचा अर्थसंकल्प नक्की ठरवला जात असतो.
- प्रत्येक वर्षी साखरेचा गोड शिरा बनवून नाँर्थ ब्लाँक मध्ये बजेटच्या छपाईचा आरंभ केला जातो.पण ह्या वर्षी अर्थ संकल्पाच्या प्रती न छापता सर्व बजेटचे पेपर आँनलाईन तयार केले जाणार आहे.
- आत्तापर्यत ब्रिटीश परंपरेचे पालन करत अर्थमंत्री लाल ब्रिफकेसमध्ये अर्थसंकल्प घेऊन येताना आपणास दिसुन यायचे.निर्मला सीतारमन हे जेव्हापासुन देशाचे अर्थमंत्री झाले तेव्हापासुन त्यांनी भारतीय परंपरेमधला बही खाता हा चोपडी समान प्रकार आणण्यास प्रारंभ केला.
- Budget मध्ये काय काय दिलेले असते?
अर्थमंत्रींकडुन बजेटविषयी भाषण देत असताना त्याचे दोन विभाग केले जात असतात.
- पहिल्या भागात आपल्या देशाची सध्याची आर्थिक स्थिती काय आहे?सध्याचा जीडीपी किती आहे?शासनाकडे अंदाजे किती महसुल गोळा होऊ शकतो?हे अर्थमंत्रींकडुन प्रथम विभागात सांगितले जात असते.
- आणि येणारया नव्या आर्थिक वर्षात विविध क्षेत्रांसाठी केली जाणारी योजनांची तरतुद केली जात असते.नवनवीन योजना सादर केल्या जात असतात.ज्यात शेती,आरोग्य,शिक्षण,बँकिंग,फायनान्स इत्यादी क्षेत्रांचा समावेश असतो.
- ह्या वर्षीचा सरकारचा निर्गुंतवणुकीचा हेतु काय आहे?वित्तीय तुट अंदाजे किती असु शकते?शासनाकडुन किती कर्ज घेतले जाईल हे देखील ह्या पहिल्या विभागात सांगितले जात असते.
- भाषणाच्या दितीय भागात डायरेक्ट आणि इंडायरेक्ट टँक्सचा समावेश असतो.इन्कम टँक्स स्लँबमध्ये करण्यात आलेले चेंजेस,काँर्पोरेट कर,कँपिटल गेनटँक्सेस,कस्टम्ज आणि एक्साईज डयुटी इत्यादींविषयी घोषणा यात केली जात असते.
- पण यात जीएसटीचा सहभाग नसतो.जीएसटी काऊंसिलकडुन याबाबद निर्णय घेतले जात असतात.या विभागानंतर एक अँनेक्सचर असते ज्यामध्ये शासनाच्या एक्सट्रा बजेटरी रिसोर्सविषयी माहीती दिलेली असते.
याचबरोबर काही महत्वाचे कागदपत्र देखील बजेट संगे सादर केली जात असतात.पण सगळयात महत्वाची बाब म्हणजे भाषणात सर्व गोष्टी वाचुन दाखविल्या जात नसतात.
सर्व गोष्टींविषयी तपशीलवार वर्णन हे आँनलाईन जो अर्थसंकल्प सादर केला जातो त्यात दिलेले असते.
यामध्ये जे बजेट ग्लान्स नावाची कागदपत्रे असतात त्यात आर्थिक वर्षाचे उददिष्ट दिले जात असते.ज्यात कर महसुलाचा,बिगर कर महसुलाचा कँपिटल एक्सपेंडेचरचा इत्यादींचा समावेश असतो.
याव्यतीरीक्त यात वित्तीय तुट नाँमिनल क्रास जीडीपी इत्यादी प्रमुख हेंतुचा तपशील दिलेला असतो.केंद्राकडून राज्य केंद्रशासित प्रदेशांस काही महत्वपुर्ण योजनांसाठी निधी दिला जात असतो त्याचे देखील तपशीलवार वर्णन यात केले जात असते.
कोणत्या बाबतीत किती खर्च केला जाणार आहे हे expenditure budget मध्ये दिलेले असते.
शासनाला उत्पन्न कुठुन प्राप्त होत असते?
शासनाला उत्पन्न कुठुन कुठुन प्राप्त होत असते हे अर्थसंकल्पात रिसीप्ट बजेटमध्ये दिले जात असते.
शासनाला उत्पन्न हे पुढील मार्गानी प्राप्त होत असते:
● Income tax
● Corporate tax
● GST
● Excise duty
● Disinvestment
● रिझर्व बँकेकडुन मिळणारा फंड
● Passport fee,visa fee
● Road आणि pole वरील toll
● Government companies मधील नफ्याचा भाग
● Radio tv license
● Royalties charge license fees
● Specialization
● Electricity phone gas मधील हिस्सा
● राज्य सरकारला दिलेल्या कर्जावरील इंटररेस्ट
बजेटविषयी केले जाणारे भाषण हे सर्व प्रोसेसचा आरंभ असतो यानंतर कारण फायनान्स बिल मांडुन झाल्यावर ते लोकसभेत मंजुर देखील होणे गरजेचे असते.मग ते राज्यसभेमध्ये जात असते.मग त्यावर चर्चा केली जात असते.
जगातील 15 बेस्ट पर्सनल फायनान्स पुस्तके – आर्थिक सक्षमता – Top 10 Best Personal Finance Book
Comments are closed.