Bulk posting म्हणजे काय?- what is Bulk posting in Marathi

Bulk posting म्हणजे काय?- what is Bulk posting in Marathi

ही एक सर्विस आहे जी बँकेच्या कामकाजात वापरली जात असते.ह्या सर्विसचा सुविधेचा वापर करून आपण जे काम करायला आपणास एक दोन तास लागु शकतात ते काम आपण ह्या बल्क पोस्टिंगच्या साहाय्याने काही मिनिटात पुर्ण करू शकतो.

जेव्हा आपण नेट बँकिंग दवारे तसेच प्रत्यक्ष बँकेत जाऊन एखाद्याच्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करत असतो.तेव्हा आपल्याला थोडा कालावधी लागत असतो.

पण जेव्हा आपणास चार किंवा पाचपेक्षाही अधिक व्यक्तींच्या खात्यात एकाचवेळी पैसे ट्रान्सफर करायचे असतील अणि आपल्याकडे जास्त वेळ नसतो तेव्हा अशा वेळी आपण बल्क पोस्टिंग ह्या बँकिंग सर्विसचा वापर करत असतो.

Bulk posting चे उदाहरण :

उदा,समजा आपली एखादी कंपनी आहे अणि त्या कंपनीत हजार वर्कस कामाला आहेत.अणि आपल्याला दर महिन्याला ह्या वर्कसला पेमेंट द्यावे लागत असेल अशा परिस्थिती मध्ये आपण जर प्रत्येकाला एकेक करून पेमेंट पाठवले तर यात आपला खुपच वेळ वाया जाईल.अणि खर्च देखील अधिक होईल.

पण याच ठिकाणी आपण बल्क पोस्टिंग ह्या सर्विसचा वापर केला तर आपण एकाचवेळी दरमहा सर्व हजार वर्कसला त्यांचे पेमेंट करू शकतो.याने आपल्या किंमती अणि मौल्यवान वेळेची देखील बचत होत असते.

Bulk posting चे फायदे कोणकोणते आहेत?

● बल्क पोस्टिंगच्या साहाय्याने आपण एकाचवेळी अनेक व्यक्तींच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करू शकतो.

● यात एकाच वेळी अनेक लोकांना झटक्यात पैसे पाठवता येत असल्याने आपल्या वेळेची उर्जेची देखील बचत होत असते.

See also  फायनान्शिअल लिटरेसी म्हणजे काय? - Financial literacy meaning in Marathi

● यात एकाच वेळी अनेक जणांना पैसे पाठविता येत असल्याने आपल्याला बँकेस पुन्हा पुन्हा सर्विस चार्ज देण्याची आवश्यकता देखील भासत नसते.म्हणजे आपले पैसे सुदधा वाचतात.

● ज्या ज्या व्यक्तींना आपणास पैसे पाठवायचे असतात त्यांना एकाचवेळी वेळेवर पैसे पाठविणे सोपे होत असते.

Bulk posting चा वापर प्रामुख्याने कुठे केला जात असतो?

बल्क पोस्टिंगचा वापर आँफिस तसेच कंपनीमध्ये दरमहा एकाच वेळी सर्व कर्मचारींचा पगार एकत्र देण्यासाठी अधिक प्रमाणात केला जात असतो.

सर्व सरकारी योजनेच्या लाभार्थी व्यक्तींच्या खात्यात एकाचवेळी पैसे ट्रान्सफर करण्यासाठी सुदधा बल्क पोस्टिंगचा वापर केला जातो.

SBI bulk posting म्हणजे काय?

जेव्हा एसबी आय बँकेचा खातेधारक आपल्या एसबी आय खात्यावरून एकाच वेळी अनेक व्यक्तींना पैसे ट्रान्सफर करत असतो.तेव्हा त्यास एसबी आय बल्क पोस्टिंग असे म्हटले जाते.

आपण कोणत्या दोन पदधतीने बल्क पोस्टिंग करू शकतो?

आपण आँनलाईन पदधतीने नेटबँकिंगदवारे तसेच थेट बँकेत जाऊन आँफलाईन पदधतीने अनेक व्यक्तींच्या खात्यात एकाचवेळी पैसे ट्रान्सफर करण्यासाठी बल्क पोस्टिंग करू शकतो.

आँनलाईन बल्क पोस्टिंग कशी केली जाते?

● सगळयात पहिले आपण आपल्या इंटरनेट बँकिंगचा आयडी पासवर्ड इंटर करून आपल्या नेटबँकिंगवर लाँग इन करायचे.

● आपल्या नेट बँकिंगच्या खात्यावर लाँग इन केल्यावर आपणास एक ट्रान्सफरचे आँप्शन दिसुन येईल त्यावर क्लिक करायचे.

● ट्रान्सफरच्या आँप्शनवर क्लीक केल्यावर आपणास बल्क पोस्टिंगचे आँप्शन दिसुन येईल.यात आपण आपल्याला जेवढया व्यक्तींना एकाचवेळी पैसे पाठवायचे आहे त्या सर्व व्यक्तींची बँक डिटेल भरायची आहे.

● यानंतर आपल्याला विचारले जाईल की आपल्याला एकच महिन्यापुरता ह्या सर्व व्यक्तींच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करायचे आहे की दर महिन्याला त्यांच्या खात्यावर पैसे ट्रान्सफर करायचे आहे.यातले आपल्याला हवे ते आँप्शन आपण आपल्या गरजेनुसार निवडु शकतो.

● जर आपण पर मंथ हे आँप्शन सिलेक्ट केले तर दरमहा आपल्याला त्या सर्व व्यक्तींना पैसे ट्रान्सफर करावे लागत नसतात कारण दर महिन्याला एका ठाराविक तारखेला हे पैसे आपल्या खात्यातुन त्या व्यक्तींना अँटोमँटीकली पाठवले जात असतात.फक्त यात आपल्याला किती पैसे दरमहा पाठवायचे ते सेट करून ठेवावे लागते.

See also  शेअर मार्केट सर्वोत्तम माहीती देणारे बेस्ट युटयुब चँनल्स - Best YouTube Channel For Share Market, Stock Market

आँफलाईन पदधतीने बल्क पोस्टिंग कशी केली जाते?

आँफलाईन पदधतीने बल्क पोस्टिंग करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला ज्या व्यक्तींना पैसे पाठवायचे आहे त्या सर्वांची एक यादी तयार करावी लागेल.

ह्या यादीत आपल्याला कोणाला किती पैसे पाठवायचे आहे?कोणत्या खात्यावर पैसे पाठवायचे आहे?ही सर्व बँक डिटेल टाकावी लागेल.

अणि ही बनवलेली यादी बँकेच्या मँनेजरकडे द्यावी लागेल.तसेच सोबत जेवढेही अमाऊंट पेमेंटचे होईल तेवढया अमाऊंटचा एक चेक बँक मँनेजरकडे द्यावा लागेल.

यानंतर आपणास पुन्हा बँकेत जाण्याची आवश्यकता नसते दरमहा बँक आपल्या खात्यातुन आपण यादीत नाव अकाऊंट डिटेल तसेच अमाऊंट दिलेल्या व्यक्तींच्या खात्यावर परस्पर पैसे जमा करून देत असते.