Public Relations म्हणजे काय ? जनसंपर्क संकल्पना – What Is Public Relations Marathi information

Public Relations म्हणजे काय ? – What Is Public Relations Marathi information

जनसंपर्क संकल्पना –

जनमाणसात, जनसामान्यासमोर असलेली कंपनीची , संस्थे ची प्रतिमा काय आहे यावर कंपन्यांच्या मूल्य 63% पर्यंत अवलंबून असते अस संशोधनातून समोर आले आहे .

जेव्हा एखादी दुर्दैवी घटना घडते तेव्हा त्या कंपनीची प्रतिष्ठा साहजिकच कमी होते तेव्हा त्याचा वाईट परिणाम तितकाच मर्यादित न राहता कंपनीच्या संपूर्ण कॉर्पोरेट अस्तित्वावर होतो आणि त्यामुळे संपूर्ण कंपनीवर ही होतो.

जनमाणसात असलेली प्रतिमा ही काही चार आठ दिवसात तयार होत नाही, तर  उत्तम प्रतिमा आणि  प्रतिष्ठा करण्यासाठी सुमारे 3 ते 7 वर्षे लागू शकतात , म्हणूनच कोणतीही कंपनी लोकांशी उत्तम संबंध राखण्यासाठी एक विचारबद्ध , सुसूत्रीत आणि उत्तम नियोजन असलेल्या जनसंपर्क धोरणात गुंतवणूक करण खूप महत्वाच समजतात.

जनसंपर्क म्हणजे काय आहे? What Is Public Relations? –

Public Relations म्हणजे कंपनी व संस्था किंवा व्यक्ति कडून लोकांशी सुसंवाद स्थापित करून दोघामध्ये हितकारक नात निर्माण करणे. 

जनसंपर्क ही एक विचारबद्ध , धोरणात्मरित्या  उत्तम सुसंवाद स्थापित होण्याकरता केलेली एक नियोजनबद्ध प्रक्रिया  असते ज्यात कंपन्या, व्यक्ती आणि संस्था, विविध प्रकाशन माध्यमांचा वापर करून लोकांशी सलोख्याचे  संबंध निर्माण करण्याचे प्रयत्न करतात.

थोडक्यात Public Relations full form

कंपनी ने नेमलेला जनसंपर्क अधिकारी लोकांशी  संवाद साधण्या करता एक प्लान तयार करतो आणि विविध प्रिंट आणि इलेकट्रोंनिक माध्यमाचं वापर ती माहिती लोकापर्यंत पोहचवून  लोका सोबत एक सकरात्मक व सक्षम नात सुस्थापित केल जाते ,कंपनीची , व्यक्तीची , संस्थे ची  प्रतिमा उंचावली जाते. 

See also  केवायसी म्हणजे काय? - KYC meaning in Marathi

एकूण काय तर , जनसंपर्कमध्ये ,संस्था ,कंपनी  किंवा  व्यक्ति  त्याच्या ब्रँड बाबत असलेली उत्तम , अनुकूल व उच्च प्रतिष्ठा  कायम टिकवून ठेवण्या करता त्यांचा बाबतची योग्य माहिती प्रकाशन व प्रसार करत लोकांपर्यंत पोहोचविण्याची प्रक्रिया पार पडतात.

जनसंपर्क – Public Relations प्रक्रिया नेमकी कशी असते ? ,जनसंपर्क खालील गोष्टी वर भर दिला जातो

  • लोकाकरता , ग्राहकांकरता , प्रेक्षकाकरता माहिती कशी निर्माण करावी
  • यात कोणत्या माहिती वर भर दिला जातो
  • माहिती लोकांना कशी सादर करावी
  • माहिती कोणत्या माध्यमात प्रसारित करावी
  • कोणत्या माध्यमांचा वापर करावा, सहसा फ्री असल्या माध्यमांचा जास्त वापर केला जातो

जनसंपर्क – Public Relations याचा  मुख्य उद्धिष्ट काय असते?

  1. मुख्य उद्देश हा कंपनी च्या ब्रँड च मुल्य वाढवणे ,लोकां मध्ये ब्रँड बद्दल सकारात्मकता निर्माण करणे.
  2. लोकां सोबत , संभाव्य ग्राहकांसोबत उत्तम संबंध निर्माण करणे.
  3. काही संस्था बाबतीत संबंधित लोक म्हणजे पालक,प्रेक्षक, वाचक, गुंतवणूकदार, ,कर्मचारी वा इतर भागधारक असू शकतात. अश्या रीतीने संस्थेची  एक प्रामाणिक , महत्वाचे व यशस्वी इमेज लोकांसमोर निर्माण करणे .

जनसंपर्क – Public Relations कार्ये

  • वाचकांनी लक्षात घ्यावं की जाहिरातीं आणि जनसंपर्क हे भिन्न प्रकार  असतात .
  • जनसंपर्क संस्था या जाहिराती द्वारे माहिती प्रसारित करत नाहीत, ते पत्रकारांसाठी आर्टिकल लिहित नाहीत किंवा पैसे देवून प्रमोशन करत नाहीत.
  • जनसंपर्कांत मुख्यत  मुख्य भर हा नियतकालिके , वर्तमानपत्रे, बातम्या चॅनेल, संकेतस्थळ किंवा  ब्लॉग्ज आणि टीव्ही प्रोग्राम द्वारे संपादकीय लेख , माहिती वापरुन ब्रँडची प्रसिद्धी करणे यावर दिला जातो .
  • खुल्या किंवा विनामूल्य माध्यमं वापरण्याचे काही फायदे असतात कारण या माध्यमांवरील माहिती कडे लोक संशयाने पाहत नाहीत .सहज विश्वास ठेवतात.

जनसंपर्क अधिकारी आणि जनसंपर्क संस्थेचे कार्य कोणती असतात –यात खालील बाबी  समाविष्ट असतात :

  • आपल्या ब्रँडबद्दल लोकांचे मत, विचार आणि दृष्टीकोन जाणून घेणे, मतेमतांतरे घेणे , त्या माहितीच विश्लेषण करून मोफत सोशल , इतर माध्यमाचा वापर करून लोकांवर प्रभाव पाडणे .
  • ब्रँडच्या प्रत्येक येवू घातलेल्या उत्पादन , सेवा करता जाहिराती करण्या करता कंटेंट निर्माण करून त्याची माहिती लोकांना देणे.
  • वृत्तपत्र व न्यूज चॅनेल करता प्रेस नोट्स लिहिणे आणि वितरण करणे .
  • लोका पर्यंत पोहचण्या करता विशेष सार्वजनिक कार्यक्रमांचे नियोजन आणि अंमलबजावणी. करणे
  • कंपनीच्या संकेत स्थळा साथी कंटेंट , इन्फोग्राफिक्स तयार करणे.
  • काही नकारात्मकता ,संकट किंवा वाईट परिस्थितचा मुकाबला करण्याकरता जनसंपर्क धोरण तयार करणे.
  • ब्रँडची सोशल मीडिया असलेले अकाऊंट सांभाळणे ,हाताळणे आणि सोशल मीडिया लोकांना प्रतिसाद देणे.
  • कंपनीत असलेल्या नोकर वर्गाच कंपनी धोरणा बाबत समुपदेशन करणे. संस्थेची जबाबदारी च त्यांना महत्व पाठवून देणे.
  • संस्थेच्या वतीने सरकारशी वेळोवेळी संपर्क करून कायदे व नियमा बाबत चर्चा करून त्यांची अमलबजावणी करणे.
  • गुंतवणूकदारांचे हितांच सरक्षण करणे.
See also  प्रयोगशाळेत वापरल्या जाणार्‍या महत्वाच्या उपकरणांची यादी - Laboratory Equipment List And Their Use

जनसंपर्क – Public Relations संबंधांचे प्रकार

जनसंपर्क विभाग कार्यांनुसार साधारण जनसंपर्क 7 प्रकारांमध्ये विभागले जाऊ शकतात.

  1. माध्यम संपर्क –

मीडिया रिलेशनशिप: मीडिया संस्थांशी चांगले संबंध स्थापित करणे आणि त्यांना माहिती , बातम्या देत राहणे.

  1. गुंतवणूकदारां सोबत संपर्क संबंध-

गुंतवणूकदारांचे हितसंबध पाहणे ,कंपनीचे आर्थिक अहवाल सादर करणे , आणि गुंतवणूकदार, विश्लेषक आणि माध्यमांच्या प्रश्नांना  सामोरे जाने , तक्रारी बाबत माहिती घेवून , अडचणी सोडवणे

  1. सरकारी संपर्क संबंध-

संस्थेचे , सरकार समोर कंपनीची प्रतिनिधित्व करून  सामाजिक बांधिलकी जपण , विविध विषयांवर ब्रँडचे प्रतिनिधित्व करणे जसे की   ब्रॅंड ची  जबाबदारी, योग्य ,प्रामाणिक  व वाजवी स्पर्धा ठेवणे , ग्राहक संरक्षण पावलं उचलणे , कर्मचारीची काळजी घेणे इत्यादी धोरणांच्या पूर्ततेसंदर्भात सरकारला

  1. विविध गट आणि समिति जनसंपर्क –

ब्रँडच सामाजिक क्षेत्रात जसे की , आरोग्य , पर्यावरण,  संरक्षण आणि या क्षेत्रात  नाव लौकिक वाढवणे .

  1. अंतर्गत सुसंबंध-

संस्थे च्या , कर्मचारी वारवार संपुदेशन करणे , त्यांना आपलया जबाबदर्‍या लक्षात आणून देणे , प्रशिक्षण देणे , नवीन सेवा व उत्पादन बाजारात आणताना कर्मचार्‍यांना त्यांची जबाबदारी बाबत प्रशिक्षण देणे , आपसात सहकार्य करणे

  1. ग्राहक संपर्क –

बाजारा बाबत सखोल अभ्यास करून संभाव्य  ग्राहकांच्या सोबत संबंध हाताळणे आणि ग्राहकांना योग्य सेवा , उत्पादन माहिती देणे

  1. मार्केट संशोधन द्वारे ग्राहकांच्या आवडी नावडी ,मते दृष्टीकोन आणि  उपलब्ध  माध्यमांचा वापर ग्राहकांवर सकारात्मक  प्रभाव पाडणे

Digital Marketing  म्हणजे काय? आणि 8 प्रकार. What

उदाहरण – Public Relations example

  • समजा एकाद्या नावाजलेल्या बँके बाबत , त्याच्या शेअर्स बाबत काही नकारात्मक बातमी प्रकाशित झाली
  • आणि त्या बँकेच्या गुंतवणूकदारामध्ये किंवा ठेवीदारांना मध्ये भीती , राग , रोष पसरला तर
  • अश्या वेळी त्या बँकेच्या Public Relation टीम लोकासमोर ब प्रसिद्धी माध्यमासमोर येवून , बँकेच्या आर्थिक स्थितीबाबत निवेदन देतात व लोकांमधला संभ्रम , गैरसमज दूर करतात.