शेडनेट म्हणजे काय? what is shed net and uses

शेडनेट म्हणजे काय? what is shed net and uses

शेडनेट- shed net म्हणजे अस छोट शेड (बांबू किंवा वासे वापरुन) किंवा हाऊस तयार करणे ज्यात ऊन, पाऊस वादळ पासून काही प्रमणात पिकांच संरक्षण केले जाते , पिका सभोवातलाच तापमान, आद्र्ता, किडरोग प्रभावीतीत्या नियंत्रण करून उच्च दर्जाची पीकउत्पादनं घेतली जातात . ह्याचा उपयोग  हंगामी तसेच बिगर हंगामी पिकाची लागवड करण्यात होतो.

शेडनेट- shed net विविध प्रकारचे बाजारात  उपलब्द असतात

उदाहरन – 50% शेडनेट म्हणजे – फक्त 50% प्रकाश हा शेडनेट मधील पिकावर पर्यन्त पोहचेल आणि 50% तीव्रता कमी होईल. समजा 15% असेल तर 15% प्रकाश कमी होईल व 85% प्रकाश पिकापर्यंत पोहचेल.

शेडनेट चे फायदे – shed net and its uses and benefits

  • कुठलही सीझन असो, शेड हाऊस शेती नेहमी फायदेशीर ठरते
  • हिवाळ्यात दव, धुके तसे अति थंडी, शीतलहरी  पासून  आणि उन्हाळ्यात अति उच्च तापमांनापसून पिकच सरक्षण होते.
  • रोज आणि किडींचा प्रमाण लक्षणीय रित्या कमी होते.
  • फुलझाडे, झाडाची पाने, औषधी वनस्पती, भाज्या आणि मसाल्यांच्या लागवडीस मदत करते.
  • विविध फळ आणि भाजीपाला कृषी उत्पादनांची गुणवत्ता वाढण्यास मदत होते .
  • रोपणाची मर कमी होते
  • जमिनीच , मातीच संवर्धन होवून गांडूळउत्पादनासाठी अनुकूल वातावरण तयार होण्यास मदत होते
  • किटनाशक ,रोग नाशकचा कमी प्रमाणात उपयोग करून प्रभावी रित्या नियंत्रण मिळवता येते.
  • पाणी कमी प्रमाणात लागते आणि बचत होते.
  • हायड्रोफोनिक्स किंवा एरोफोनिक्स ह्या आधुनिक तंत्रज्ञान  वापर करून  शेड नेट मध्ये उत्पन्न घेता येते.
  • शेडनेट चा वापर- रोपवाटिका, मत्स्य शेती,गांडूळ शेती,ग्रीनहाऊस,टेरेस व किचन गार्डन आणि हवा रोधक 
See also  महाराष्ट्र भुषण पुरस्कार म्हणजे काय ? -Maharashtra Bhushan award

महाराष्ट्र सरकारची शेडनेट करता योजना

what is shed net and uses
????????????????????????????????????

नाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प – शेडनेट

हवामानबदलमुळे होत असलेल्या परिस्थिति शी जुळवून घेण्याकरता , शेतकर्‍यांना सक्षम करण्याकरता महाराष्टा शासन ने जागतिक बँकेचा सहकार्याने ह्या योजनेचा प्रकल्प सुरू केला आहे , ह्यात प्रामुख्याने हंगामी व बिगर हंगामी पिके घेण्यासाठी, उच्च मुल्यांकित भाजीपाला पिके व फुलांच्या उत्पादनासाठी करण्यात येतो. शेडनेट गृहांमध्ये तापमान, आर्द्रता व कार्बन डायऑक्साइड च्या प्रमाणात काही प्रमाणात नियंत्रण ठेवता येते.    .

योजनेत कोण सहभागी होऊ शकतात –

  • ७५ टक्के अर्थसहाय्य – प्रकल्प गावातील अल्प/अत्यल्प भूधारक शेतकरी आणि भूमिहीन कुटुंबे
  • ६५ टक्के अर्थसहाय्य – २ ते ५  हेक्टर पर्यंत जमीन धारणा असलेल्या शेतकऱ्यांना। 

आवश्यक कागदपत्रे -7/12 व 8 अ- क्षेत्र मर्यादा –    

एका लाभार्थ्यास शेडनेटसाठी (राउंड टाईप) कमीत कमी ५०० चौ. मीटर व जास्तीत जास्त ४००० चौ. मीटर क्षेत्र मर्यादा पर्यंत व (फ्लॅट टाईप) साठी कमीत कमी १००० चौ. मीटर व जास्तीत जास्त ४००० चौ. मीटर क्षेत्र मर्यादा पर्यंत लाभ घेता येईल.

यापूर्वी कोणताही शासकीय योजने अंतर्गत लाभ घेतला असल्यास सर्व योजना मिळून प्रति लाभार्थी जास्तीत जास्त ४००० चौ. मीटर क्षेत्र मर्यादा पर्यंतच लाभ अनुज्ञेय  राहील.

या बाबीचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना या बाबीचे तांत्रिक प्रक्षिशण अनुदान अदायगी पूर्वी घेणे बंधनकारक राहील. सदर प्रशिक्षणाची सोय राष्ट्रीय काढणी पश्चात तंत्रज्ञान प्रशीक्षण संस्था, तळेगाव दाभाडे, तालुका वडगाव मावळ, जिल्हा पुणे येथे आहे.

सादर प्रशिक्षणासाठी आवश्यक शुल्काची पूर्ण रक्कम नानाजी देशमुख  कृषि संजीवनी प्रकल्प मार्फत अदा करणेत येईल.                                 

अर्ज कुठे करावा – इच्छुक शेतकऱ्यांनी  https//dbt.mahapocra.gov.in या संकेत स्थळावर ऑनलाईन नोंदणी व अर्ज करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी.                               

खर्चाचे मापदंड -शेडनेट हाऊस मध्ये फ्लॅट टाईप व राउंड टाईप असे दोन प्रकार आहे. सर्वसाधारण क्षेत्रासाठी रु. ७१०/- प्रति चौ मीटर व डोंगराळ क्षेत्रासाठी रु. ८१६ प्रति चौ मीटर याप्रमाणे खर्चाचा मापदंड आहे.

See also  बीपीओ म्हणजे काय?बीपीओ कंपनीचे प्रकार कोणते आहेत?बीपीओ कंपनी कोणते काम करते?कर्मचारी BPP वेतन किती दिले जाते? - What is BPO , types of BOP

राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत शेडनेट हाऊस उभारणी करणे

           राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत शेडनेट हाऊस उभारणी करणे

  • सदर योजनेचा  लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी हॉर्टनेट (http://www.hortnet.gov.in)  या ऑनलाईन संकेतस्थळावर नोंदणी करावी.
    • ऑनलाईन  नोंदणी करतांना आवश्यक असणारे कागदपत्रे
      • .   ७/१२
      • .-  ८ अ
      • .   आधार कार्डाची छायांकित प्रत
      • .   आधार संलग्न बँक खात्याच्या पासबुकच्या प्रथम पानाची छायांकित प्रत
      • .   जातीचा प्रमाणपत्र (अनु.जाती/ अनुजमाती शेतकऱ्यांसाठी)
      • .   पासपोर्ट फोटो
  • शेतकऱ्यांनी  हॉर्टनेट प्रणालीवर अर्ज नोंदणी केल्यानंतर  तालुका कृषी अधिकारी कार्यालय येथे वरिल कागद पत्रांसह अर्ज सादर करावा
  • शेडनेटचे प्रकार (आकारमान )  फ्लॅट टाईप उंची ४ मीटर  अनुदान
  • मर्यादा (प्रकल्प खर्चाच्या ५० टक्के)

(१००० चौ. मी आकारमानासाठी  ३१२५२०  रुपये).,

(२००० चौ. मी आकारमानासाठी  ५३६५७६ रुपये).,                                                                                             

(३००० चौ. मी आकारमानासाठी  ७४६३२०  रुपये).,

(४००० चौ. मी आकारमानासाठी  ९४००००  रुपये)., 

मार्गदर्शक सूचना  -अधिक माहिती साठी कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक मंडळ कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी यांच्याशी सम्पर्क साधावा

अधिक माहिती साठि- http://krishi.maharashtra.gov.in/Site/Home/Index.aspx

Comments are closed.