टायटॅनिक जहाज का बुडाले याचे संशोधनातुन समोर आलेली काही महत्वाची रहस्ये
असे सांगितले जाते की टायटॅनिक हे त्याकाळात सर्वात उच्च प्रशिक्षित अभियंता तसेच प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आलेले
विशाल जहाज समुद्रात तरंगत असलेल्या एका ब्लाॅकला आइसबर्गला म्हणजेच खंडाला धडक दिल्याने अवघ्या दोन तासात बुडाले होते पण संशोधनातुन याचे एक वेगळेच उत्तर समोर आले आहे.
संशोधनातुन असे समोर आले आहे की टायटॅनिक हे जहाज आइसबर्गला धडक दिल्याने बुडाले नव्हते तर याच्या बेस मध्ये आग लागल्याने हे जहाज बुडाले होते.
हे जहाज समुद्रात उतरवण्याआधीच आधीच याच्या बेसलेव्हलला आग लागली होती असे संशोधनातून समोर आले आहे.
टायटॅनिक हे जहाज बुडाल्यानंतर एका पत्रकाराने ह्या जहाजाचा फोटो बघितला ज्यात त्यांना असे निदर्शनास आले की टायटॅनिक जहाज समुद्रात टक्कर लागुन नव्हे तर त्याच्या बेसला लेव्हलला आग लागल्याने बुडाले होते.
अणि टायटॅनिक जहाजाच्या बेसला लागलेली आग इतकी भीषण अणि भयंकर होती की ज्यापासून टायटॅनिक जहाज तयार करण्यात आले होते.ते मेटलच ह्या आगीमुळे पुर्णपणे डॅमेज झाले होते.
अणि जेव्हा टायटॅनिक जहाज हे समुद्रात तरंगत असलेल्या ब्लाॅकला आइसबर्गला धडकले सहयोगाने टायटॅनिक जहाजाच्या बेस लेवहलच्या ह्या डॅमेज भागालाच ह्या आइस बरगची टक्कर लागली होती ज्यामुळे हे जहाज अवघ्या दोन तासात समुद्रात बुडाले होते.
याचसोबत असे देखील सांगितले जाते की टायटॅनिक जहाज बनविण्याच्या प्रकल्पात मध्ये जे अधिकारी समाविष्ट होते त्यांना आगेची घटना आधीपासूनच माहीती होती.पण अधिकारी वर्गाला ह्या आगेविषयी तेव्हा माहीती झाले जेव्हा ह्या जहाजाची सर्व तिकिट विकली गेली होती.
अणि त्यादिवशी चालत असलेल्या इतर शिपला देखील कॅन्सल करण्यात आले होते म्हणून टायटॅनिक जहाज न चालल्याने कंपनीला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागणार होते म्हणून हे नुकसान टाळण्यासाठी अधिकारी वर्गाने याची कुठेही वाच्यता केली नाही अणि प्रवाशींना देखील याबाबत कळु दिले नाही असे सांगितले जाते.
हा आग लागलेला काळा डाग देखील अधिकारी वर्गाने प्रवाशींपासुन लपविला असल्याचे सांगितले जाते.
टायटॅनिक जहाज समुद्रात बुडण्याची सांगितली जाणारी इतर कारणे –
असे सांगितले जाते की टायटॅनिक जहाज यावर तैनात असलेल्या प्रत्येक अधिकारी कडे व्हायनाकुलर होते प्रत्येक जहाजावर ह्या व्हायनाकुलर दवारे लक्ष ठेवले जात असते.
अणि समजा काही संकट येणार आहे असे ह्या व्हायनाकुलर दवारे अधिकारींच्या लक्षात आले की ते लगेच शीपच्या कॅप्टनला कळवित असतात.पण टायटॅनिक वर असे काहीच झाले नाही.
टायटॅनिक वर व्हायनाकुलर होते पण हे एका लाॅकर मध्ये ठेवले होते.अणि ह्या लाॅकरची चावी डेव्हिड पलेअर नामक व्यक्ती कडे होती.
असे सांगितले जाते की टायटॅनिक जहाज निघण्याच्या आधी डेव्हिड पलेअर यांच्या जागी एका नवीन अधिकारीची नियुक्ती जहाजावर करण्यात आली होती अणि ही लाॅकरची चावी नवीन अधिकारीकडे सोपवायला डेव्हिड पलेअर विसरले होते.
ज्यामुळे व्हायनाकुलर दवारे अधिकारींना आजुबाजुच्या परिस्थितीचा अंदाज घेता आला नाही त्यावर लक्ष ठेवता आले नाही
असे म्हटले जाते की त्यारात्री जर बोटी वरच्या अधिकारी कडे व्हायनाकुलर असते तर त्यांना हे समोर येणारे आइसबर्ग दिसुन गेले असते अणि हा होणारा अपघात टळला देखील असता.
याचसोबत टायटॅनिक जहाजावर प्रवास करणारया प्रवाशींसाठी किमान साठ लाईफ बोटची गरज होती.पण टायटॅनिक जहाज यावर फक्त ४८ लाईफ बोटची निर्मिती केली ज्यात देखील २० लाईफ बोट टायटॅनिक मध्ये शिफ्ट केले गेले.
प्रत्येक जहाजावर एक ड्रिल केली जाते ज्यामध्ये प्रवाशींना लाईफ बोट वापरायला शिकवले जाते
अणि बोट वरील स्टाफला जहाजातील प्रवाशींना संकटकाळात वाचविण्यासाठी लाईफ बोट मध्ये बसवून उतरवायला शिकविण्यात येते.
ही ड्रील टायटॅनिक जहाज समुद्रात बुडाले त्याच दिवशी होणार होती पण कॅप्टनने ही ड्रील कॅन्सल केल्याने ही ड्रील घडुनच आली नाही.
टायटॅनिक जहाज समुद्रात बुडाले तेव्हा लाईफबोटला पाण्यात उतरवायला जास्त वेळ लागला हा कालावधी अर्धा तास इतका होता ज्यामुळे ही बोट बुडाली अणि यात अनेक जण मारले गेले.
याचसोबत प्रत्येक लाईफबोट मध्ये ३५ सीट होते तरी देखील पहिल्या लाईफ बोट मध्ये २७ लोकांनाच बसविण्यात आले होते.
याचसोबत त्या रात्री पाण्याचे टेंपरेचर -२ डिग्री सेल्सिअस इतके होते.हे देखील टायटॅनिक जहाज समुद्रात बुडण्याचे कारण मानले जाते.