अमेरिकेतील पहिली रिपब्लिकन बॅक अयशस्वी का ठरली?जेपी मॉर्गन कडुन रिपब्लिकन बॅकेचे अधिग्रहण का करण्यात आले आहे?Why First Republic Bank failed in Marathi
अमेरिकेतील अजुन एका बॅकेला नुकतेच ताळे लागले आहे.याआधी अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली ग्लोबल सिगनेचर अशा अनेक मोठमोठ्या दिग्दज बॅकाना ताळे लागल्याचे आपण पाहिले होते.
पण आता अमेरिकेतील पहिली रिपब्लिकन बॅकेला देखील ताळे लागल्याची बातमी नुकतीच समोर आली आहे.अमेरिकन नियामकांनी हे ताळे लावले असल्याचे सांगितले जात आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे आहे की जेपी मॉर्गन कडून हया न्युयाॅर्क शहरामधील फस्ट रिपब्लिकन बॅकेची संपत्ती बोली लावून खरेदी करण्यात आली आहे.
आता ह्या फस्ट रिपब्लिकन बॅकेच्या सर्व शाखा आपणास आता जेपी मॉर्गन चेस ह्या नावाने उघडल्या जाणार असताना दिसुन येणार असल्याचे सांगितले जात आहे.
ह्या घटनेमुळे अमेरिका देशातील बॅकिंग संकटामध्ये अजुन एक महत्वाची भर पडली आहे.गेल्या काही महिन्यांपासून रोखीच्या तुटवडयाच्या समस्येचा सामना ही कंपनी करत होती.
दोन महिन्यांपेक्षा कमी कालावधीत अपयशी ठरणारी ही तिसरी युएस बॅक ठरली आहे.
California department of financial protection and innovation ने सांगितल्यानुसार फस्ट रिपब्लिकन बॅकेची सर्व विमा नसलेल्या ठेवी अणि काही मालमत्तेचे अधिग्रहण जेपी मॉर्गन कडुन केले जाणार आहे.
याचसोबत फस्ट रिपब्लिकन बॅकेच्या जेवढ्याही आठ राज्यातील ८० ते ८५ शाखा आहेत त्या जेपी मॉर्गन चेस बॅक ह्या नावाने ओपन करण्यात येणार आहे.
रिपब्लिकन बॅक ही श्रीमंत व्यक्तींच्या गरजा भागवणारी अमेरिका न्युयाॅर्क शहरामधील सर्वात मोठी बॅक म्हणून ओळखली जाणारी बॅक तसेच वित्तीय संस्था आहे.
मार्च महिन्या दरम्यान ह्या फस्ट रिपब्लिकन बॅकेला आर्थिक संकटातुन बाहेर काढण्यासाठी सुमारे अकरा ते बारा बॅकानी मदत केली होती.पण अखेरीस ह्या बॅकेला आर्थिक संकटातुन बाहेर पडता न आल्याने आर्थिक संकटातून वाचविण्यास यश प्राप्त न झाल्याने शेवटी ताळे लागले आहे.
जेव्हा अमेरिकेतील प्रसिद्ध बॅका सिलिकॉन व्हॅली अणि सिगनेचर ह्या बंद पडल्या होत्या तेव्हा देखील फस्ट रिपब्लिकन बॅक ही आर्थिक संघर्ष करताना दिसुन आली होती.
त्यामुळे सिलिकॉन व्हॅली अणि सिगनेचर ह्या दोन्ही बॅके प्रमाणे ह्या फस्ट रिपब्लिकन बॅकेला देखील ताळे लागते की काय ही भीती अनेक ठेवीदार तसेच गुंतवणूक दारांच्या मनात होतीच.
अखेरीस ठेवीदारांची गुंतवणूक दारांची भीती खरी ठरली आहे.अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली अणि सिगनेचर बॅके नंतर ताळा लावण्यात आलेली ही तिसरी अमेरिकन बॅक तसेच वित्तीय संस्था आहे.
शेवटी वितीय आर्थिक संकटात सापडलेल्या ह्या बॅकेला जेपी मॉर्गन चेस ह्या कंपनीने विकत घेतले आहे.
असे सांगितले जात आहे की जेपी मॉर्गन चेस बॅक ही फस्ट रिपब्लिकन बॅकेची तसेच नॅशनल असोसिएशनची देखील डिपाॅझिटरी बनणार आहे.सर्व ठेवीदारांना आपल्या खात्यावर पुर्णपणे अॅक्सेस देखील प्रदान करण्यात येणार आहे.