महिला समानता दिवस का साजरा केला जातो ह्या दिवसाचे महत्त्व काय आहे?women’s equality day in Marathi
आज स्त्रिया प्रत्येक वेगवेगळ्या क्षेत्रात आपला ठसा उमटवताना आपणास दिसून येत आहे.एवढेच नव्हे पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रात काम करत आहे.
आज महिला पुरूषांच्या तुलनेत कुठल्याही बाबतीत कमी नाहीये त्यामुळे पुरूषांना जे हक्क अधिकार समाजात दिले जातात तसेच हक्क अधिकार महिलांना देखील दिले जावे ह्या उद्देशाने दरवर्षी २६ आॅगस्ट रोजी महिला समानता दिवस साजरा केला जातो.
आपल्या देशात पुर्वी पासुन पुरूष प्रधान संस्कृती होती त्यामुळे महिलांना पुरूष प्रधान संस्कृती मध्ये आपल्या हक्क अणि अधिकारांपासुन वंचित राहावे लागले होते.
कित्येक महिलांना आपल्या अधिकारासाठी आपले कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी लढा द्यावा लागला होता.पण आज तशी परिस्थिती नाहीये आज महिलांना प्रत्येक क्षेत्रात पुरूषांच्या बरोबरीने स्थान देण्यात आले आहे.
आज महिला पुरूषांच्या बरोबरीने मोठमोठ्या कंपन्या चालविताना दिसुन येत आहे.मोठमोठया अधिकारी पदावर विराजमान झालेल्या दिसुन येत आहे.
थोडक्यात सांगायचे म्हटले तर आज पुरूषांप्रमाणेच महिलांचा देखील आपल्या देशाच्या विकासामध्ये मोलाचा वाटा आहे.
महिला समानता दिवस इतिहास –
महिला समानता दिवस हा सर्वप्रथम अमेरिका ह्या देशात साजरा करण्यात आला होता.
१८५३ मध्ये अमेरिकेतील महिलांच्या हक्काकरीता एक चळवळ सुरू करण्यात आली होती.ज्याचे महिलांना देखील पुरूषांच्या बरोबरीने समान हक्क देण्यात यावे हे होते.
यात विवाहित महिलांकडुन मालमत्तेवर हक्क प्राप्त करण्यासाठी चळवळ करण्यात आली.
पहिल्या महायुद्धाच्या वेळी महिलांचा सहभाग बघता संपुर्ण जगभरातुन ह्या महिला चळवळीला पाठिंबा प्राप्त होऊ लागला होता.ज्यामुळे १९२० मध्ये ह्या महिलांना आपले हक्क प्रदान करण्यात आले.
अमेरिका ह्या देशात महिलांना मतदान करण्याचा अधिकार नव्हता तो देखील त्यांना २६ आॅगस्ट १९२० रोजी ५० वर्षे लढा दिल्यानंतर दिला गेला.महिलांना २६ आॅगस्ट रोजी समानतेचा हक्क मिळाला होता म्हणून २६ आॅगस्ट हा दिवस अमेरिका ह्या देशात साजरा केला जाऊ लागला.
यानंतर हळुहळु अमेरिका सोबत इतर देशांत देखील हा दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली.मग पुढे जाऊन सर्व देशात आंतरराष्ट्रीय पातळीवर हा दिवस साजरा केला जाऊ लागला.
२०२३ ची महिला समानता दिवसाची थीम –
दरवर्षी महिला समानता हा दिवस एक नवीन थीमच्या साहाय्याने साजरा केला जातो ह्या वर्षी हा दिवस embrance equality समानता स्वीकारा ह्या थीमसोबत साजरा केला जाणार आहे.
महिला समानता दिवसाचे महत्त्व –
आज जरी स्त्री पुरुष समानता आहे असे म्हटले जाते तरी काही बाबतीत आजही महिलांना पुरूषांच्या बरोबरीने अधिकार देण्यात आले नाहीये.
आज महिला पुरूषांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रात काम करताना दिसुन येत आहे एवढेच नव्हे तर पुरूषांपेक्षा अधिक सरस पद्धतीने वेगवेगळ्या क्षेत्रात आपली भूमिका बजावत आहे.
म्हणून स्त्री पुरुष भेदभाव न करता महिलांना देखील प्रत्येक क्षेत्रात पुरूषांच्या बरोबरीने अधिकार हक्क देण्यात यावे हे सांगणारा हा दिवस आहे.