जगातील पहिल्या शंभर टक्के इथेनॉल वर चालणारया कारचे फायदे तसेच वैशिष्ट्य काय आहेत? World first ethanol car benefits and features

तयारी स्पर्धा परीक्षेची व्हाट्सअप ग्रुप Join Group

जगातील पहिल्या शंभर टक्के इथेनॉल वर चालणारया कारचे फायदे – World first ethanol car benefits and features

भारतात नुकतेच जगातील पहिली शंभर टक्के इथेनॉल वर चालणारी कार लाॅच करण्यात आली आहे.आता लवकरच भारत देशातील रस्त्यांवर शंभर टक्के इथेनॉल वर चालणारी कार धावताना दिसुन येणार आहे.

जगातील पहिली शंभर टक्के इथेनॉल वर चालणारी कार केंद्रीय रस्ते वाहतूक अणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते २९ आॅगस्ट २०२३ रोजी लाॅच करण्यात आली आहे.

इथेनॉल वर चालणारी कार केंद्रीय रस्ते वाहतूक अणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते २९ आॅगस्ट २०२३ रोजी लाॅच करण्यात आली आहे.

टोयोटा ह्या कंपनीद्वारे निर्माण करण्यात आलेल्या ह्या इलेक्ट्रॉनिक फ्लेक्स इंधन वाहनाचे नाव टोयोटो इनोव्हा बीएस व्ही आय स्टेज आय आय,असे आहे.

ह्या जगातील पहिल्या शंभर टक्के इथेनॉल वर चालणारया कार मुळे देशातील पर्यावरणास अणि शेतकरयांना देखील अधिक फायदा होईल.

कारण इथेनॉल हे एक असे इंधन आहे जे शेतकरी शेतात पिकवत असलेल्या उस तसेच मका यांसारख्या पिकापासून प्राप्त होते.

शंभर टक्के इथेनॉल वर चालणारया कारचे फायदे –

World first ethanol car benefits and features
World first ethanol car benefits and features

ह्या कारमध्ये १.८ लिटर पेट्रोल हायब्रीड इंजिन आहे.हे २० ते १०० टक्के इतक्या इथेनॉल वर देखील धावेल.

आपल्या भारत देशात विपुल प्रमाणात उसाचे उत्पादन होत असल्याने इथेनॉलचे उत्पादन विपुल प्रमाणात करता येईल.

इथेनॉल हे इंधन शेतीमधील उस मका ह्या उत्पादनापासून निर्माण केले जात असल्याने याचा अधिकतम लाभ शेतकरी वर्गास घेता येईल.

शंभर टक्के इथेनॉल वर चालणारया ह्या कारमुळे देशातील वाहनांच्या आवाजामुळे त्यातुन निघणारया धुरामुळे जे प्रदुषण होते ते प्रदुषण देखील कमी होण्यास मदत होईल.

See also  मोबाइलफोन स्टोरेज स्पेस कमी झाला ? How to Clean mobile Marathi

हयाने भारताला पेट्रोलियम आयातीसाठी करावा लागणारा खर्च देखील कमी होण्यास मदत होईल.

काय आहे ह्या इथेनॉल वर चालणारया कारचे प्रमुख वैशिष्ट्य –

ही कार शंभर टक्के इथेनॉल वर चालणारी कार आहे.इथेनॉल हे एक असे इंधन आहे ज्याची निर्मिती शेतात पिकवल्या जात असलेल्या ऊसापासून केली जाते.

ही शंभर टक्के इथेनॉल वर चालणारी कार जगातील प्रथम बीएस सिक्स फेज टु इलेक्ट्रीफाईड फ्लेक्स इंधन कार असल्याचे सांगितले जात आहे.

ही कार इथेनॉल सोबत हायब्रीड सिस्टम वर ४० टक्के वीज निर्मिती करण्यात सक्षम आहे.

ही जगातील प्रथम कार असेल जी इथेलाॅन, पेट्रोल, अणि इलेक्ट्रिकवर देखील देशातील रस्त्यावर धावताना दिसुन येईल.ही कार पेट्रोल ऐवजी पुर्णतः इथेनॉल वर देखील रस्त्यांवर धावु शकते.

ही कार इलेक्ट्रिक उर्जा निर्माण करून ईव्ही मोडवर देखील वापरता येईल.

ही जगातील प्रथम विद्युतीकृत फ्लेक्स इंधन कार असेल.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा