भारत देशातील १२ प्रमुख जागतिक वारसा स्थळांची माहिती World Heritage site India information in Marathi

तयारी स्पर्धा परीक्षेची व्हाट्सअप ग्रुप Join Group

भारत देशातील १२ प्रमुख जागतिक वारसा स्थळांची माहिती world heritage site india information in Marathi

आज आपण युनेस्कोने सुचिबदध केलेली भारत देशातील प्रमुख जागतिक वारसा स्थळे यांची थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.

आपल्या भारत देशात आतापर्यंत एकुण ४० जागतिक वारसा स्थळे असल्याची नोंद युनेसकोने केली आहे ज्यात ३२ हे सांस्कृतिक आहेत ७ नैसर्गिक सौंदर्य असलेली जागतिक वारसा स्थळे आहेत तर एक मिश्र वारसा स्थळ आहे.

आजच्या लेखात आपण भारतातील काही अशा प्रसिद्ध जागतिक वारसा स्थळांविषयी माहीती जाणुन घेणार आहोत ज्याला भेट देण्यासाठी भारतातीलच नव्हे तर जगभरातील पर्यटक भारतात येत असतात.

१)राणी की वाव –

राणी की वाव हे गुजरात राज्यातील पाटण शहरात असलेले जागतिक वारसा स्थळ आहे.बावडी किंवा वाव ह्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या अनेक विहीरी इथे आपणास दिसून येतात.

ह्या विहिरींमध्ये पाण्यापर्यंत पोहचण्यासाठी आपणास पायरया दिलेल्या आहेत.इसवी सन १०६३ मध्ये राणी उदयमती हिने ह्या वाव बांधल्या असल्याचे सांगितले जाते.

इथे आपणास भगवान विष्णू यांच्या ५०० पेक्षा अधिक मुर्ती पाहायला मिळतात.

२२ जुन २०१४ मध्ये राणी की वाव ह्या ठिकाणाला जागतिक वारसा स्थळ म्हणून युनेस्कोने सुचिबदध केलेल्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट होण्याचा दर्जा देण्यात आला होता.

२) खजुराहो –

खजुराहो हे भारत देशातील मध्य प्रदेश मध्ये असलेले ठिकाण आहे.प्राचीन काळात ह्या ठिकाणाला खजुर ह्या नावाने संबोधले जात होते.

हे एक भारतातील प्राचीन मंदिर आहे जे इसवी सन ९५० ते १०५० मध्ये बांधण्यात आले आहे.इथे आपणास हिंदु अणि जैन वास्तुकलेचा संग्रह दिसुन येतो.

इसवी सन १९८६ मध्ये खजुराहो मंदिरास युनेस्कोने सुचिबदध केलेल्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले होते.

३) पडडकल –

पडककल हे ठिकाण कर्नाटक मधील बागल ह्या जिल्ह्यात आहे.हे ठिकाण ऐतिहासिक मंदिरांसाठी जगप्रसिद्ध मानले जाते.

See also  जागतिक वाळवंटीकरण आणि दुष्काळ विरोधी दिवस विषयी माहीती - World Day to Combat Desertification and Drought in Marathi

दरवर्षी जानेवारी ते फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये इथे चालुक्य महोत्सव भरवला जातो.हा महोत्सव बघण्यासाठी लांबुन लांबुन ह्या ठिकाणाला भेट देण्यासाठी पर्यटक येत असतात.येथील मंदिरे हे द्राविड अणि स्थापत्य शैलीत बांधण्यात आली आहेत.

१९८७ मध्ये पडककल ह्या स्थळाला युनेस्कोने सुचिबदध केलेल्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले होते.

४) हंपी –

हंपी हे स्थळ कर्नाटक मधील तुंगभद्रा नदीच्या काठावर वसलेले आहे.इथे साधारणत ५०० पेक्षा अधिक पुरातन वास्तू असलेल्या आपणास पाहायला मिळतात.

हे जगातील सर्वात संपन्न शहर एकेकाळी विजयनगर साम्राज्याची राजधानी म्हणून ओळखले जात होते.विरुपाक्ष हे हंपी मंदिरांपैकी प्रमुख मंदिर म्हणून ओळखले जाते.हे मंदिर महादेवाला समर्पित करण्यात आलेले मंदिर आहे.

१९८६ मध्ये ह्या ठिकाणाला युनेस्कोने सुचिबदध केलेल्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले होते.

५) बौदधगया –

बौदधगया हे ठिकाण बिहार राज्यामधल्या गया जिल्ह्यात आहे.हे ठिकाण महाबोधी मंदिर म्हणून संपूर्ण भारतात विख्यात आहे.इथे भेट देण्यासाठी जगभरातील लोक येतात.

असे सांगितले जाते की ह्या ठिकाणी असलेल्या बौधी नावाच्या वृक्षाखाली बसून गौतम बुद्ध यांना ज्ञानाची प्राप्ती झाली होती.

बौदध धर्मात बौदधगया सोबत लुंबिनी,सारनाथ कुशिनगर यांना पवित्र स्थळ म्हणून ओळखले जाते.

२००२ मध्ये ह्या महाबोधी मंदिरास युनेस्कोने सुचिबदध केलेल्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले होते.

६) भीमबेटका –

हे एक ऐतिहासिक ठिकाण आहे जे मध्य प्रदेश राज्यातील रायसेन जिल्ह्यात आहे.आदील संस्कृतीचे अवशेष इथे ह्या ऐतिहासिक स्थळावर आपणास पाहायला मिळतात.

एक लाख वर्षांपूर्वी इथे मानवाचे वास्तव्य असल्याचे येथे सांगितले जाते.२००३ मध्ये ह्या ठिकाणाला युनेस्कोने सुचिबदध केलेल्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले होते

७) महाबलिपुरम –

दक्षिण भारतात असलेले एक ऐतिहासिक तसेच प्राचीन केंद्र म्हणून हे ठिकाण ओळखले जाते.

पुराणात प्रसिद्ध असलेल्या बलीराजावरून ह्या ठिकाणाला महाबलिपुरम असे नाव दिले गेले आहे.येथील अखंड दगडात खोदलेल्या मंदिरांनाच येथील प्रमुख वैशिष्ट्य म्हणुन ओळखले जाते.

See also  Rice Transplanter यांत्रिक पद्धतीने भात लागवड:

१९८४ मध्ये महाबलिपुरम येथील लेणींना युनेस्कोने सुचिबदध केलेले जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आले होते.

८) अजिंठा लेणी –

अजिंठा लेणी महाराष्ट्र राज्यातील औरंगाबाद जिल्ह्यातील आहे.औरंगाबादपासुन साधारणत शंभर किलोमीटर इतक्या अंतरावर ह्या लेण्या आपणास पाहावयास मिळतात.

भारतातील सर्वाधिक भेट दिल्या जात असलेल्या ऐतिहासिक लेणी असलेल्या पर्यटन स्थळांपैकी अजिंठा लेणी एक आहे.

बौद्ध धम्माशी संबंधित उत्कृष्ट चित्र असलेल्या बौदध लेणी इथे आपणास पाहावयास मिळतात.

१९८३ मध्ये ह्या अजिंठा लेणींना युनेस्कोने सुचिबदध केलेल्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले होते.

९) कोणार्क सूर्य मंदीर –

कोणार्क सूर्य मंदीर हे भारतातील एक ऐतिहासिक सुर्यमंदिर म्हणून ओळखले जाते.हया मंदिराला ब्लँक पागोडा असे देखील म्हटले जाते.

हे मंदिर उडिसा राज्यात कोणार्क नावाच्या गावात स्थित आहे.ह्या ठिकाणी जोडलेला बारा चाकांचा सुर्यरथ अणि यास जोडलेली घोडे ही ह्या मंदिराची स्थापत्य कल्पणा आहे.

१९८४ मध्ये युनेस्कोने सुचिबदध केलेल्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत कोणार्क सूर्य मंदीराचा समावेश करण्यात आला होता.

१०) ताजमहाल –

ताजमहाल ही प्रेमाचे प्रतीक म्हणून ओळखली जाणारी ऐतिहासिक वास्तू उत्तर प्रदेश मधील आग्रा येथे आहे.

मुगलबादशहा शहाजहान याने आपल्या प्रिय पत्नीच्या मुमताजच्या स्मरणार्थ हा ताजमहाल बांधला होता.जगातील सात आश्चर्यात ह्या ताजमहलचा देखील समावेश होतो.

दरवर्षी जगभरातील लोक ह्या प्रेमाचे प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ताजमहलला भेट देण्यासाठी येत असतात.

१९८३ मध्ये युनेस्कोने सुचिबदध केलेल्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत ताजमहालचा समावेश करण्यात आला होता.

११) आग्रा येथील भुईकोट किल्ला –

आग्रा येथील भुईकोट किल्ला याला देखील जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आले आहे.हा ऐतिहासिक किल्ला ताजमहल पासुन अडीच ते तीन किलोमीटर इतक्या अंतरावर आहे.

इतिहासकार ह्या किल्ल्याचा उल्लेख चार भिंतीत घेरलेली प्रसाद महलनगरी असा देखील करतात.

See also  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांना देण्यात आला सुरीनाम देशातील हा सर्वोच्च नागरी पुरस्कार _Suriname's highest distinction, "Grand Order of the Chain of the Yellow Star

१२) वेरूळ लेणी –

औरंगाबाद जिल्ह्यापासुन साधारणत ३० ते ४० किलोमीटर इतक्या अंतरावर ही ऐतिहासिक कोरीव लेणी आहे.ही लेणी युनेस्कोने सुचिबदध केलेल्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत १९८३ मध्ये समाविष्ट करण्यात आली होती.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा