झिरो शॅडो डे म्हणजे काय?zero shadow day information in Marathi
झिरो शॅडो याचा अर्थ मराठीत शुन्य सावली असा होत असतो.
ही स्थिती आपल्या पृथ्वीवर घडणारी एक वैशिष्ट्यपूर्ण घटना प्रसंग म्हणुन ओळखली जाते.ही स्थिती खगोलीय स्थिती मुळे घडुन येत असते.
झिरो शॅडो डे हा एक असा दिवस असतो.ज्यादिवशी आपल्याला दुपारच्या वेळेस आपली सावली दिसुन येत नसते.वर्षातुन तब्बल दोनदा ही परिस्थिती पृथ्वीवर उदभवत असते.
हीच पृथ्वीवरील घडुन येणारी खगोलीय स्थिती पाहायला बंगळुरू तसेच चेन्नई सारख्या ठिकाणी झिरो शॅडो डेचे पालन केले जात असते.
ह्या दिवशी बंगळुरू तसेच चेन्नई मधील शालेय विज्ञानाचे विद्यार्थी हा दिवस साजरा करत असतात.
कसा साजरा केला जातो हा झिरो शॅडो डे?
ह्या दिवशी विज्ञानाचे विद्यार्थी सुर्याचे त्यातुन निर्माण होत असलेल्या सावलीचे फोटो काढत असतात.अणि हा खगोलीय दृष्ट्या खास घटना प्रसंग आपल्या आठवणीसाठी कॅमेरयात कैद करीत असतात.
काय होते ह्या दिवशी?
ह्या झिरो शॅडो डेच्या शुन्य सावली दिनाच्या दिवशी सुर्य आपल्या डोक्याच्या एकदम वर येत असल्याने आपणास आपली सावली दिसेनाशी होते.यालाच बिनासावलीचा दिवस असे देखील म्हटले जाते.
वर्षातील खुप ठाराविक एक दोन दिवस आहे जेव्हा हा शुन्य सावलीचा अनुभव आपणास येत असतो.
२०२३ मध्ये कुठे असणार आहे झिरो शॅडो डे?
२०२३ मध्ये बंगलोर येथे झिरो शॅडो डे शुन्य सावली दिन साजरा केला जाणार आहे.
कधी आहे हा झिरो शॅडो डे?
२5 एप्रिल २०२३ रोजी बंगलोर मध्ये १२ वाजुन १७ मिनिटांनी झिरो शॅडो डे शुन्य सावली दिन साजरा केला जाणार आहे.
ही घटना फक्त काही सेकंदासाठी घडुन येत असते पण याचा परिणाम आपणास दीड ते दोन मिनिटे जाणवत अनुभवत असतो.
असे म्हटले जाते की ह्या दिवशी सुर्य आपल्या डोक्याच्या एकदम वर आलेल्या असल्याने आपली सावली पायाखाली येते ज्यामुळे आपणास आपली सावली ह्या कालावधीत उन्हामध्ये दिसुन येत नाही.