वार्षिक माहिती विवरणपत्र (AIS)/करदात्यांची माहिती सारांश (TIS) मध्ये उपलब्ध माहिती पाहण्यासाठी प्राप्तिकर विभागाने करदात्यांच्या सोयीसाठी ‘AIS for Taxpayers’ नावाचे मोबाइल App सुरू केले आहे.
करदात्यांसाठी AIS हे प्राप्तिकर विभागाकडून मोफत उपलब्ध करून दिलेले मोबाइल application आहे.हे मोबाईल application गुगल प्ले आणि अॅप स्टोअरवर उपलब्ध आहे.
या अॅपचा उद्देश करदात्याला AIS/TIS चे तपशीलवार वर्णन प्रदान करणे आहे जे करदात्याशी संबंधित विविध स्त्रोतांकडून गोळा केलेली माहिती प्रदर्शित करते.
AIS/TIS मध्ये उपलब्ध असलेले त्यांचे TDS/TCS, व्याज,लाभांश,शेअर व्यवहार,कर देयके,आयकर परतावा, इतर माहिती (GST डेटा, परदेशी रेमिटन्स इ.) संबंधित माहिती पाहण्यासाठी करदाते हे मोबाइल app वापरू शकतात.
App मध्ये करदात्याला प्रदर्शित माहितीवर फीडबॅक देण्याचा पर्याय आणि सुविधा देखील आहे.
हे मोबाइल app वापरण्यासाठी, करदात्याने त्याचा/तिचा पॅन क्रमांक देऊन app नोंदणी करणे आवश्यक आहे.
आणि ई-फायलिंग पोर्टलवर नोंदणीकृत मोबाइल क्रमांक आणि ई-मेलवर पाठवलेल्या ओटीपीसह प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे.
एकदा ऑथेंटिकेशन झाले की,या मोबाईल App च्या सुविधांचा लाभ घेण्यासाठी करदाते फक्त 4 अंकी पिन टाकू शकतात.
आयकर विभागाने करदात्यांना सुलभतेने सुविधा प्रदान करण्याच्या दिशेने घेतलेला हा आणखी एक पुढाकार आहे.