कलौजी म्हणजे काय? – कलौजीचे फायदे – Kalonji meaning in Marathi

कलौजी म्हणजे काय? kalonji meaning in Marathi

आपल्या स्वयंपाक घरामध्ये असे अनेक घटक पदार्थ असतात ज्यांचा वापर आपण वेगवेगळे व्यंजन बनविण्यासाठी,अन्नपदार्थांच्या व्यंजनांच्या चवित वाढ करण्यासाठी करत असतोच.

सोबत औषध म्हणून देखील त्याचा वापर आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात करत असतो.

आजच्या लेखात आपण अशाच एका महत्वपूर्ण औषध म्हणून उपयोग केल्या जाणाऱ्या धान्य पदार्थ विषयी काळे बियाणे म्हणजेच कलौजी विषयी अधिक सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.

कलौजी म्हणजे काय?

कलौजीला आपण काळे बियाणे असे देखील म्हणतो.इंग्रजी भाषेत याला नायजेलिया सतिवा तसेच ब्लॅक क्युमिन असे म्हटले जाते.

कलौजिला काळे बीज किंवा काळे जिरे असे सुदधा म्हणतात.

कलौजी हे एक प्रकारचे रणकुलैसी कुळामधील औषधी रोपटे आहे.अणि ह्या औषधी रोपटयाच्या बिजास कलौजी असे संबोधिले जाते.

कलौजी हे धान्य तसेच बियाणे आहे ज्याचा वापर स्त्रिया किचनमध्ये मसाला म्हणून करीत असतात.

कलौजी हे रोपटे भारतात सर्वत्र पाहायला मिळतात.हया कलौजीच्या रोपटयाची बीजे काळया रंगाची असतात.

कलौजी ही दिसायला तिळाच्या दाण्या प्रमाणे तसेच अंडाकृती आकाराची असते.कलौजी हे एक असे धान्य आहे जे आपणास कुठल्याही दुकानात आपणास सहजरीत्या मिळुन जाते.

प्राचीन काळापासून कलौजीचा वापर हा विविध रोगांवर उपचार करण्यासाठी औषध म्हणून केला जात आहे.हर्बल उपचारासाठी देखील याचा अधिक प्रमाणात वापर केला जातो.

कलौजीचे फायदे कोणकोणते आहेत?

● जर आपण कलौजीचे नियमितपणे सेवन केले तर आपल्या शरीरास लोह तसेच खनिज प्राप्त होते.

● कलौजीमध्ये व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन ई, कॅल्शियम मॅग्नेशियम फॉस्फरस तांबे जस्त इत्यादी विपुल प्रमाणात असते.

See also  नारळी पौर्णिमा निबंध - Narali Purnima Essay In Marathi

● कलौजीचा वापर दैनंदिन जीवनात स्वयंपाक करताना भाजीमध्ये सुदधा केला जातो.

● कलौजीचा वापर आपण घरगुती स्वरूपाचे लोणचे बनवायला सुदधा करू शकतो.

● ज्यांना केस गळण्याची समस्या असेल त्यांनी त्या व्यक्तींनी कलौजीच्या तेलाचा रस आपल्या डोक्याला लावावा याने आपले केसगळणे थांबते.

● ज्या व्यक्तींना जास्त गोड पदार्थ खाल्ल्याने मधुमेहाची समस्या जाणवत असेल अशा व्यक्तींसाठी कलौजी फार फायदेशीर आहे.मधुमेहाची समस्या असलेल्या रूग्णांनी जर कलौजीचे तेल पिले तर त्यांचा मधुमेह देखील चांगला होऊ शकतो.अणि त्यांच्या शरीरात वाढलेले साखरेचे प्रमाण देखील नियंत्रणात येते.

● कलौजीमुळे कातडीचे आजार देखील बरे होत असतात.कलौजीच्या तेलाने जर आपण मालिश केली तर आपल्याला असलेले कातडीचे अनेक आजार देखील बरे होत असतात.

● कलौजी चेहरयासाठी देखील खुप फायदेशीर आहे.कलौजीचे चुर्ण आपल्या चेहऱ्यावर लावल्याने आपल्या चेहऱ्यावर असणारे सर्व डाग व्रण पुळया नाहीसे होत असतात.

● ज्यांचा कान दुखत असेल किंवा कानाला जखम सूज वगैरे झाली असेल त्यांनी आपल्या कानात कलौजीचे तेल किंचित प्रमाणात गरम करून टाकायला हवे.याने आपल्या कानाची सुज जखम देखील बरी होते अणि आपला कान दुखणे देखील थांबते.

● ज्यांच्या पोटामध्ये कृमी झाले असतील किंवा पोटदुखीचा त्रास असेल अशा व्यक्तींनी कलौजीचे तेल त्यात मध मिसळुन रात्री झोपण्यापूर्वी घ्यायला हवे.याने आपल्या पोटातील सर्व कृमी मरून जातात.अणि आपले पोट दुखणे देखील बंद होते.

कलौजीचा वापर आयुर्वैदात कुठे अणि कशासाठी केला जातो?

● ज्या व्यक्तींना पॅरालिसेसची समस्या असेल त्यांनी जर कलौजीचे तेल लावून आपल्या अंगास मालिश केली तर त्यांचा पॅरालिसेस लवकरात लवकर बरा होत असतो.

● कलौजीचा उपयोग हा युनानी औषध निर्माण करण्यासाठी करण्यात येतो.

● कलौजीचे तेल रकतवाढीसाठी देखील फार उपयुक्त आहे.जर आपण पुदिनाचे पान कलौजीच्या तेलात एक ग्लास पाणी घेऊन मिक्स करून पिले तर आपल्या शरीरातील रक्त वाढते.

See also  टेटच्या स्कोअर कार्डची पीडीएफ मोबाईल मध्ये कशी डाऊनलोड करायची आहे? How to download TAIT score card pdf in your mobile

● कलौजी मुळे मुतखडयाचा आजार बरा होतो.

● कलौजी मुळे कर्करोगाशी लढण्यासाठी आपल्या शरीरात शक्ती निर्माण होते.

● जे लोक कलौजीचे सेवण करतात त्यांना लठ्ठपणाची समस्या उदभवत नाही.

● ज्यांच्या शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी अधिक वाढली आहे अशा व्यक्तींना कलौजी फार फायदेशीर ठरते कारण कलौजीमुळे आपल्या शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी होण्यास मदत होते.

कलौजीचे सेवण कोणी करू नये?

गर्भवती महिलांनी कलौजीचे सेवण करू नये जरी सेवण करायचे असेल तर आधी तज्ञ डाॅक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.

ज्या स्त्रियांना मासिक पाळी अधिक वेळा तसेच उशिरा येते अशा महिलांनी कलौजीचे सेवण करू नये.अणि सेवण करायचेच असेल तर आधी तज्ञ डाॅक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.

ज्यांना पित्ताची समस्या आहे ज्यांच्या शरीराला अतिउष्णता मानवत नाही अशा व्यक्तींनी कलौजीचे सेवण करू नये.

ज्यांना कलौजीची अॅलर्जी आहे अशा व्यक्तिंनी कलौजीचे तेल आपल्या शरीराला लावु नये कारण त्यांना याने साईड इफेक्ट जाणवू शकतो.

कलौजीचे सेवण जर आपण औषध म्हणून करीत असाल तर कलौजीचे सेवण करण्याआधी एकदा आपण तज्ञ डाॅक्टरांचा सल्ला नक्कीच घ्यावा.पण याचठिकाणी कलौजीचे सेवण आपण मसाल्याच्या मार्फत करीत आहे तर याचा कोणताही साईड इफेक्ट होत नाही.