पीएम किसान निधी योजनेचा १३ वा हप्ता झाला रिलीज – PM KISAN 13TH INSTALLMENT RELEASED IN MARATHI
खुप वाट पाहील्यानंतर पंतप्रधान किसान सम्मान निधी योजनेचा १३ वा हप्ता अखेरीस लाभार्थ्यांना मिळाला आहे.
आठ ते दहा कोटी इतक्या लाभार्थी व्यक्तींच्या खात्यात सोमवारच्या दिवशी दोन हजार रूपये इतकी रक्कम जमा झाली आहे.
पी एम किसान सम्मान निधी योजनेअंतर्गत पंधरा कोटी पेक्षा अधिक रक्कम लोकांच्या खात्यात आतापर्यंत ट्रान्स्फर झाली आहे.
या आधी किसान सम्मान निधी योजनेचा लाभ अणि लाभाची रक्कम एकुण अनेक शेतकरींना देण्यात आली होती.आता ह्या योजनेचा हा तेरावा हप्ता असणार आहे.
आपल्या खात्यात तेराव्या हप्त्याची रक्कम आली की नाही कसे अणि कुठे चेक करायचे?
जर आपल्याला हे चेक करायचे असेल की डिसेंबर मार्च साठी देण्यात आलेली हप्त्याची दोन हजार रूपये इतकी रक्कम आपल्या खात्यात आलेली आहे की नाही तर आपणास आपल्या मोबाईल किंवा कंप्युटर किंवा लॅपटॉप वरून पीएम किसान सम्मान निधीच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
वेबसाईटवर गेल्यावर आपणास फार्मर्स काॅनर नावाचे आॅप्शन दिसुन येईल त्यात आपण लाभार्थी स्थिती ह्या आॅप्शनवर क्लिक करायचे.
यानंतर आपल्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल.नवीन पेजवर आपणास बॅक अकाऊंट नंबर तसेच आधार नंबर दोघांपैकी एक आॅप्शन निवडायचे आहे.
बॅक अकाऊंट तसेच आधार नंबर दोघांपैकी एक आॅप्शन निवडुन झाल्यावर आपला बॅक अकाऊंट नंबर किंवा आधार नंबर टाकुन घ्यायचा आहे.
अणि मग शेवटी गेट डेटा ह्या आॅप्शनवर क्लिक करायचे आहे.
इथे आपणास सर्व व्यवहारांविषयी माहीती प्राप्त होईल.आपल्या खात्यात कितवा हप्ता कधी अणि केव्हा जमा करण्यात आला कोणत्या बँक अकाऊंट मध्ये तो जमा करण्यात आला हे सर्व आपणास इथे माहीती होते.
ज्यांना मोबाईल दवारे हप्त्याची स्थिती तपासायची आहे असे व्यक्ती मोबाईल दवारे देखील आपल्या हप्त्याची स्थिती चेक करू शकतात.
यासाठी आपणास आपल्या मोबाईल मध्ये पीएम किसानचे अॅप डाऊनलोड करायचे आहे.अणि नवीन शेतकरी म्हणून रेजिस्ट्रेशन करायचे आहे.
यानंतर आपण मोबाईल किसान सम्मान निधीच्या मोबाईल अॅप दवारे आपले अॅप्लीकेशन स्टेटस चेक करू शकतो तसेच लाभार्थी यादीत आपले नाव आहे किंवा नाही हे देखील चेक करू शकतो.
कोणाला हप्त्याची रक्कम प्राप्त होणार नाही?
ज्या शेतकऱ्यांनी दिलेल्या विहित कालावधीत आपले ईकेवायसी केलेले नाहीये अशा शेतकरयांना १३ व्या हपत्याची रक्कम प्राप्त होणार नाही.
ज्यांचा तेरावा हप्ता आला नाही त्यांनी काय करायचे?
ज्या लाभार्थींना तेराव्या हप्त्याची रक्कम मिळालेली नाहीये किंवा हप्ता संबंधी इतर कुठलीही अडीअडचण असेल त्यांनी पीएम किसान सम्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाईट वर जायचे आहे.
अणि फार्मर काॅनर मधील हेल्प डेस्कला व्हिझिट करायचे आहे.
हेल्प डेस्कवर गेल्यावर आपण आपला मोबाईल नंबर,बॅक अकाऊंट नंबर किंवा आधार नंबर तिघांपैकी कुठलाही एक नंबर टाकायचा आहे.
अणि गेट डिटेल वर क्लिक करायचे आहे यानंतर आपणास एक क्वेरी फाॅम दिला जाईल त्यात आपली समस्या निवडुन तिचे वर्णन लिहायचे आहे अणि मग तो फाॅम सबमीट करून द्यायचा आहे.