डीएम एलटी कोर्स,पात्रता, फी, करिअर संधी व वेतन ?DMLT full form in Marathi

तयारी स्पर्धा परीक्षेची व्हाट्सअप ग्रुप Join Group

डीएम एलटीचा फुलफाॅम काय होतो?DMLT full form in Marathi

डीएम एलटीचा फुलफाॅम diploma in medical laboratory technology असा होतो.यालाच मराठी मध्ये वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञान डिप्लोमा असे म्हणतात.

आज आपल्यातील खुप जणांना कमी कालावधीचा कोर्स करून मेडिकल क्षेत्रात करीअर करायचे असते.डीएम एलटी हा एक असा मेडिकल डिप्लोमा कोर्स आहे जो आपण खुप कमी कालावधीत पुर्ण करू शकतो.

डीएम एलटी हा दोन वर्षे इतका कालावधी असलेला डिप्लोमा,पॅरामेडिकल संबंधित मेडिकल कोर्स आहे.हा कोर्स सायन्स शाखेतील कुठलाही विद्यार्थी बारावी नंतर करू शकतो.

डीएम एलटी कोर्स मध्ये एकुण चार सेमीस्टर असतात.हे सर्व सेमीस्टर क्लिअर केल्यानंतर आपणास डीएम एलटी कोर्स पुर्ण केल्याचे सर्टिफिकेट प्राप्त होत असते.

डीएम एलटी मध्ये सहा महिन्याचे एक सेमीस्टर असते ज्यात सहा महिन्यानंतर आपणास प्रत्येक सेमीस्टरची परीक्षा द्यावी लागते.

हा कोर्स पुर्ण केल्यानंतर आपणास कुठल्याही पॅथोलाॅजी सेंटर मध्ये लॅब असिस्टंट तसेच लॅब टेक्निशियन म्हणून काम करता येते.

ज्या विद्यार्थ्यांना मेडिकल लॅब मध्ये आपले करीअर घडवायचे असेल अशा विद्यार्थ्यांनी हा कोर्स करणे आवश्यक असते.कारण ह्या कोर्स मध्ये मेडिकल लॅब संबंधित सर्व महत्वाची तसेच मुलभुत माहिती दिली जाते.

कोणत्या आजाराची तपासणी कशी करायची त्याचे निदान कसे करायचे हे शिकवण्यात येते.
उदा,युरीन टेस्ट, ब्लड टेस्ट इत्यादी.

यात कुठल्याही क्लिनिक मध्ये केल्या जात असलेल्या हेल्थ टेस्ट विषयी प्रशिक्षण दिले जाते.लॅबरोटरी मध्ये असलेल्या कुठल्या उपकरणाचा कशापदधतीने वापर करावा हे शिकवले जाते.

See also  रिफायनरी म्हणजे काय? रिफायनरीचे महत्व काय आहे रिफायनरीचे काम समुद्र किनारीच का केले जाते? - What is Oil refinery project in Konkan coast

डीएम एलटी हया कोर्समध्ये उत्तीर्ण होणे सोपे नसते यात उत्तीर्ण होण्यासाठी आपल्याला खुप अभ्यास करावा लागतो.तेव्हा कुठे विद्यार्थ्यांना यात चांगले यश प्राप्त होते.

डीएम एलटी कोर्स करण्यासाठी आपणास कुठल्याही प्रकारची विशेष वयोमर्यादा अट देखील लादण्यात आली नाहीये.हा कोर्स करण्यासाठी आपणास कुठलीही प्रवेश परीक्षा द्यावी लागत नाही.

डीएम एलटी कोर्स करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागते?

डीएम एलटी हा कोर्स करण्यासाठी विद्यार्थ्यांचे कुठल्याही एका मान्यताप्राप्त बोर्डातुन किमान बारावी फिजिक्स केमिस्ट्री बायोलाॅजी विषयात ४५ टक्के गुण प्राप्त करून उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

डीएम एलटी कोर्स करण्यासाठी किती फी लागते?

डीएम एलटी हा मेडिकल डिप्लोमा कोर्स करण्यासाठी आपणास सरकारी काॅलेज मध्ये खाजगी काॅलेजच्या तुलनेत कमी फी लागते.

सरकारी काॅलेज मध्ये वर्षाला १० ते २० हजार इतकी फी भरावी लागते.

खाजगी काॅलेज मध्ये वर्षाला ५० हजार ते १ लाख इतकी फी भरावी लागते.काॅलेजातील सोयीसुविधा नुसार फॅकल्टी कशी आहे मध्यम स्वरूपाची की हाय स्टॅनडर्ड त्यानुसार यात अधिक वाढ केली जाऊ शकते.

डीएम एलटी कोर्स केल्यानंतर प्राप्त होत असलेल्या करिअरच्या संधी –

डीएम एलटी कोर्स केल्यानंतर आपणास कुठल्याही खाजगी तसेच सरकारी रुग्णालयात लॅब टेक्निशियन तसेच लॅब असिस्टंट म्हणून काम करता येते.

याव्यतिरिक्त आपणास डीएम एलटी कोर्स केल्यानंतर कुठल्याही डायग्नोस्टिक सेंटर मध्ये नोकरी करू शकतो किंवा आपणास नोकरी न करता स्वताचे एखादे खाजगी पॅथोलाॅजी लॅब देखील सुरू करता येईल.

डीएम एलटी ह्या मेडिकल कोर्समध्ये कोणकोणते महत्वाचे विषय शिकवले जातात?

१)पॅथोलाॅजी

२) मायक्रो बायोलाॅजी

३) बायोकेमिस्ट्री

डीएम एलटी कोर्स केल्यानंतर आपणास वेतन किती प्राप्त होते?

डीएम एलटी कोर्स केल्यानंतर आपणास कुठल्याही पॅथोलाॅजी सेंटर मध्ये लॅब असिस्टंट तसेच लॅब टेक्निशियन म्हणून काम मिळु शकते.

डीएम एलटी कोर्स केल्यानंतर आपणास १५ ते २० हजार रुपये महिना इतके मासिक वेतन प्राप्त होऊ शकते.जस जसा आपल्या अनुभवात वाढ होतो.तसतसे आपल्या वेतनात देखील वाढ केली जाऊ शकते.

See also  Pinterest काय आहे? । Pinterest information in Marathi
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा