नॅशनल बेस्ट फ्रेंड डे का साजरा केला जातो ह्या दिवसाचे महत्त्व तसेच इतिहास काय आहे? -National best friend day 2022 history and importance in Marathi

नॅशनल बेस्ट फ्रेंड डे -National Best friend day 2022 history and importance in Marathi

दरवर्षी ८ जुन रोजी नॅशनल बेस्ट फ्रेंड डे देशामध्ये साजरा केला जात असतो.दरवर्षी राष्ट्रीय पातळीवर मैत्रीच्या नात्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

दरवर्षी हा दिवस भारतासमवेत अमेरिकेत तसेच इतर देशात देखील साजरा केला जातो. आपल्या बेस्ट फ्रेंड विषयी मनात असलेली कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्याचा हा दिवस आहे.

आयुष्यात काॅलेज लाईफमध्ये,रोजच्या दैनंदिन जीवनात आपली खुप जणांशी मैत्री होत असते पण हे भेटलेले प्रत्येक व्यक्ती आपले बेस्ट फ्रेंड नसतात.

मित्र हे खुप असतात पण बेस्ट फ्रेंड हा फक्त एकच असतो जो आपल्या सर्व मित्रांमध्ये आपल्यासाठी खुप खास असतो आपला अतिशय जीवाभावाचा व्यक्ती असतो.

ज्याच्या जवळ आपण आपले सर्व सुख दुःख व्यक्त करत असतो आपल्या मनातील प्रत्येक भावना त्यांच्यासोबत शेअर करीत असतो.

बेस्ट फ्रेंड हा आपल्या जीवनातील एक असा हक्काचा व्यक्ती असतो.ज्याच्याजवळ आपण आपल्या मनातील कुठलीही बिनधास्तपणे बोलु शकतो.

आपला बेस्ट फ्रेंड हा आपल्या जीवनातील एकमेव असा व्यक्ती असतो ज्याच्यावर आपण डोळे झाकून विश्वास ठेवू शकतो.जो कधीही आपल्या विश्वासाला तडा जाऊ देत नसतो.

आपल्या ज्या गोष्टी समस्या अडीअडचणी आपण आपल्या कुटुंबासमवेत भावंडांसमवेत देखील शेअर करू शकत नाही सांगायला लाजतो घाबरतो अशा गोष्टी देखील आज आपण बिनधास्तपणे आपल्या जिवलग मित्रासोबत शेअर करू शकतो.त्याला सांगु शकतो.

नॅशनल बेस्ट फ्रेंड डे चा इतिहास काय आहे?

नॅशनल बेस्ट फ्रेंड डे हा अमेरिका देशामधील काही लोकांनी १९३५ मध्ये सर्वप्रथम साजरा केला होता.हया दिवशी आपण आपल्या सगळ्यात जवळच्या जिवलग मित्राला बेस्ट फ्रेंडला एखादे चांगले गिफ्ट द्यायचे असते.

See also  जालियनवाला बाग हत्याकांडांचा नेमका इतिहास काय आहे? -Jallianwala Bagh History

आपल्या बेस्ट फ्रेंड सोबत काॅलिटी टाईम व्यतीत करायचा असतो.हया दिवशी आपण आपल्या बेस्ट फ्रेंड सोबत त्याच्या आवडीच्या हाॅटेलात जेवायला जाऊ शकतो.

आपल्या प्रत्येकाच्या जीवनात किमान एक बेस्ट फ्रेंड तरी असायलाच हवा ज्याच्याजवळ आपण आपले मन मोकळे करू शकतो.

National best friend day 2022 history and importance in Marathi
Happy friendship day hand draw gray watercolor hand holding card design

आपल्या जीवनात बेस्ट फ्रेंडचे महत्व –

  1. आपला बेस्ट फ्रेंड हा नेहमी आपल्याला कुठल्याही अडीअडचणीच्या संकटाच्या काळात इमोशनल सपोर्ट करत असतो नेहमी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहत असतो.आपल्या प्रत्येक सुखदुखात चांगल्या वाईट काळात आपल्या सोबत राहत असतो.
  2. आपण खचुन गेल्यावर आपल्याला प्रोत्साहन देत असतो.
  3. बेस्ट फ्रेंडच आपल्याला सांगत असतो आपण कोणती गोष्ट करायला हवी कोणती गोष्ट नाही करायला हवी आयुष्यात आपण काय करणे गरजेचे आहे आपल्यासाठी काय योग्य आहे अणि काय अयोग्य आहे.बेस्ट फ्रेंड हा आपल्याला नेहमी योग्य तोच सल्ला देत असतो.
  4. बेस्ट फ्रेंड हा आपली खोटी प्रशंसा न करता, आपल्याला खोटे प्रोत्साहन न देता आपले चांगले वाईट गुण काय आहे आपली चुक आपणास स्पष्टपणे सांगत असतो.
  5. आपल्या बेस्ट फ्रेंड सोबत आपले कुठलेही रक्ताचे नाते नसते तरी देखील तो आपल्या सुख दुखाचा जोडीदार असतो.