लॅपरोस्कोपी सर्जरी म्हणजे काय? laparoscopy surgery meaning in Marathi

तयारी स्पर्धा परीक्षेची व्हाट्सअप ग्रुप Join Group

लॅपरोस्कोपी सर्जरी म्हणजे काय? laparoscopy surgery meaning in Marathi

लॅपॅरो याचा अर्थ शरीर आणि स्कोपी म्हणजे पाहणे असा अर्थ होतो.

लॅपरोस्कोपी ही एक प्रक्रिया असते ज्यामध्ये लॅपॅरो स्कोप नावाच्या एका उपकरणाचा वापर केला जातो.शरीराच्या पोट ओटीपोटात abdomen and pennies मध्ये असलेल्या सर्व अवयवांचे आजार यांचे निदान अणि उपचार करण्यासाठी केला जातो.

शरीराच्या ओटी पोटामध्ये असलेल्या अवयवांच्या सर्व आजारांवर शस्त्रक्रिया करण्यासाठी देखील लॅपरोस्कोपीचा वापर केला जातो.पोट अणि ओटीपोटात जे काही अवयव असतात.

उदा, अन्ननलिका,पोट,लिव्हर,अपेंडीक्स,किडनी इत्यादी पोटाचे जे काही आजार आहेत त्याचे तसेच ओटीपोटाचे गर्भ पिशवी अंडकोशाचे जे काही विकार असतात ह्या सर्व विकारांना लॅपरोस्कोपीच्या साहाय्याने बघता येत असते.

लॅपरोस्कोपी सर्जरी का केली जाते?

laparoscopy surgery meaning in Marathi
laparoscopy surgery meaning in Marathi

थोडक्यात सांगायचे म्हटले तर लॅपरोस्कोपी ही एक दुर्बिणीच्या साहाय्याने केली जात असलेली कमी जोखिम असलेली विशेष शस्त्रक्रिया आहे.जी पोटातील ओटीपोटातील अवयवांची तपासणी करण्यासाठी केली जाते.

ह्या शस्त्रक्रिये दवारे हे जाणुन घेण्याचा प्रयत्न केला जातो की रुग्णाच्या पोटात ओटीपोटातील अवयवात वेदना का होता आहेत त्या अवयवात कोणता आजार आहे.

याआधी रूग्णांची शस्त्रक्रिया करण्यासाठी त्याचे पोट उघडावे लागत असे.ज्यामुळे रूग्णांना खुप अधिक वेदनांना सामोरे जावे लागत असे.अणि रूग्णाच्या जखमा भरून येण्यासाठी देखील खुप कालावधी लागत असल्याने रूग्णाला खुप दिवस रूग्णालयात पडुन राहावे लागत असायचे.

पण जेव्हापासून लॅपरोस्कोपी टेक्नाॅलाजी आली आहे तेव्हापासून शस्त्रक्रिया दरम्यान हया सर्व अडचणींना रूग्णांना सामोरे जाण्याची आवश्यकता भासत नाहीये.

लॅपरोस्कोपी सर्जरी मध्ये रूग्णाच्या पोट तसेच ओटीपोटात जास्त छेद पाडले जात नाही फक्त एक किंवा दोन सेंटीमीटर असलेले एक दोन छेद करून दुर्बिणीच्या साहाय्याने ही शस्त्रक्रिया केली जाते.

See also  ब्रॉन्कायटीस म्हणजे काय?Bronchitis meaning in Marathi।

ज्यामुळे रूग्णाला जास्त वेदना देखील होत नसतात अणि तो लवकरात लवकर बरा होऊन आपल्या घरी जाऊ शकतो.

लॅपरोस्कोपी सर्जरी मुळे रूग्णाला जास्त दिवस रूग्णालयात तात्काळत बसुन राहावे लागत नाही.लॅपरोस्कोपी सर्जरी मध्ये खुप कमी टाके पाडले जातात.

लॅपरोस्कोपी सर्जरी कशी केली जाते?

  • लॅपरोस्कोपी सर्जरी मध्ये लॅपरोस्कोप नावाच्या एका यंत्राचा वापर केला जातो.हया यंत्रावर एक लांबलचक टयुब असते ह्या यंत्राच्या समोरील भागात एक कॅमेरा बसवलेला असतो.
  • ह्या कॅमेराचा अणि यंत्रावर लावलेल्या लाईटच्या प्रकाशात आपणास पोटातील सर्व अवयव बघता येत असतात.
  • लॅपरोस्कोप यंत्र पोटात टाकल्या नंतर त्यावर लावलेला लाईट चालु करून आत गॅस भरण्यात येत असतो.ज्यामुळे रूग्णाचे पोट थोडेफार फुगुन येत असते ज्याने डाॅक्टरांना रूग्णाच्या पोटातील सर्व अवयव व्यवस्थित दिसुन येत असतात.
  • लॅपरोस्कोपी सर्जरी मध्ये सर्वप्रथम रूग्णाच्या पोट तसेच ओटीपोटात एक छोटासा एक ते दोन सेंटीमीटरचा छेद केला जातो.
  • ही शस्त्रक्रिया करण्या अगोदर रुग्णाला भुलचे इंजेक्शन दिले जाते.

अणि मग ह्या पाडलेल्या छिद्रातून सर्जरी ची सर्व संसाधने रूग्णाच्या पोट ओटीपोटात घातली जात असतात.हया पोटात घातलेल्या सर्व साधनांची चित्रे मोठ्या स्क्रीनवर व्हिडिओ माॅनिटर मध्ये डाॅक्टरांना पाहावयास मिळत असतात.

लॅपरोस्कोपी सर्जरी मुळे डाॅक्टरांना कुठल्याही रूग्णाची खुली शस्त्रक्रिया न करता देखील त्याची तपासणी करता येत असते.

लॅपरोस्कोपीच्या मशिनच्या पुढील बाजूस एक कॅमेरा लावलेला असतो.ज्याचा प्रकाश अणि रिझोलयुशन देखील उच्च प्रतीचे असते.

लॅपरोस्कोपी यंत्राद्वारे कोणकोणत्या शस्त्रक्रिया केल्या जात असतात?

लॅपरोस्कोपी यंत्राद्वारे बॅरीएटीक सर्जरी,हायटस हरनिया,इनगिनल हरनिया, जठराचे कॅन्सर,लहान मोठ्या आतडीचा, गर्भाशयाचा कॅन्सर, लिव्हर,पित्ताशयाचा कॅन्सर,स्वादु पिंडाचे विविध आजार इत्यादीवर दुर्बिणीच्या माध्यमातून निदान तसेच आॅपरेशन केले जाते.

लॅपरोस्कोपी सर्जरीचे फायदे कोणकोणते आहेत?

  • लॅपरोस्कोपी सर्जरी मुळे रूग्णाला जास्त दिवस रूग्णालयात पडुन राहण्याची आवश्यकता भासत नाही.जास्तीत जास्त रूग्णाला दोन तीन दिवस आॅबझरवेशन करीता रूग्णालयात ठेवले जाते.
  • त्याची प्रकृती लवकर सुधारते ज्यामुळे तो लवकरात लवकर आपल्या घरी जाऊ शकतो किंवा कामावर रूजू होऊ शकतो.
  • लॅपरोस्कोपी सर्जरी मुळे रूग्णाला जास्त वेदना सहन कराव्या लागत नाही.अणि ह्या सर्जरी मधील जखम देखील लवकर भरली जाते.
  • ह्या शस्त्रक्रिये मध्ये रूग्णाचे रक्त देखील जास्त वाया जात नसते.तसेच ह्या शस्त्रक्रिये मध्ये रूग्णाला संसर्ग होण्याची शक्यता फार कमी असते.
  • लॅपरोस्कोपी सर्जरी दवारे हरनिया ह्या आजाराचे देखील निदान तसेच आॅपरेशन करता येते.
See also  ईपीएफओ मध्ये आजारपणासाठी आगाऊ रक्कमेचा दावा कसा करायचा? How to claim for advance for illness in EPFO in Marathi
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा