डीएनए टेस्ट म्हणजे काय? DNA test meaning in Marathi

डीएनए टेस्ट म्हणजे काय? DNA test meaning in Marathi

डीएनएचा फुलफाॅम deoxyribonucleic acid असा होतो.डीएनए टेस्टला अनुवांशिक चाचणी (genetic test) असे देखील म्हटले जाते.

ही चाचणी केल्याने भरपुर अनुवांशिक माहीती प्राप्त होत असते.डीएन ए हा अनुवांशिक रीत्या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होत असतो.

DNA test meaning in Marathi

डीएनए टेस्ट का केली जाते? डीएनए टेस्ट कधी केली जाते?

एखाद्या व्यक्तीचे आईवडील कोण आहेत हे जाणुन घेण्यासाठी डीएनए टेस्ट ही साधारणत केली जात असते.

आपली ओळख नेमकी काय आहे आपण नेमकी कोणाची संतान अपत्य आहोत याची शहानिशा खात्री करण्यासाठी ही डीएनए टेस्ट केली जात असते.

कारण आपण जेव्हा जन्माला येत असतो तेव्हा आपल्या माता पित्याच्या आनुवंशिक सामग्रीचा डीएनए आपल्या शरीरात प्रवेश करत असतो.

म्हणजे डीएन ए हा आईवडिलांकडुन मुलाकडे म्हणजेच एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होत असतो.

आपल्या डीएनए क्रमात काही बदल घडुन आल्यास तो जाणुन घेण्यासाठी देखील किंवा गुणसूत्र रचना जाणुन घेण्यासाठी ही टेस्ट केली जात असते.

याचसोबत ही चाचणी पितृत्व चाचणीसाठी देखील करण्यात येत असते.म्हणजे प्रेगनेंसी दरम्यान बाळ जन्माला येण्याआधी ही टेस्ट केली जाते.गुन्हेगारी तपास करण्यासाठी वंशाचा तपास करण्यासाठी देखील ही टेस्ट केली जाते.

डीएनए टेस्ट ही औषधांचा रूग्णांवर होत असलेला परिणाम जाणून घेण्यासाठी देखील केली जाते.

डीएनए टेस्ट करण्याचे फायदे –

डीएनए टेस्ट केल्याने आपणास अशा काही अनुवांशिक आजारांविषयी,विकारांविषयी समस्यांविषयी माहीती प्राप्त होत असते जे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे अनुवांशिकता रीत्या हस्तांतरित होत असतात.

वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर विषयी माहिती प्राप्त करण्यासाठी ही टेस्ट केली जाते.

See also  दही खाण्याचे आरोग्यदाही फायदे -Health benefits of eating curd daily

डीएनए टेस्ट कशी केली जाते?

डीएनए टेस्ट करण्यासाठी आपल्या रक्ताचा नमुना,लाळ किंवा लघवीचा तसेच केसाचा नमुना देखील घेतला जातो.

डीएनए टेस्ट केल्याने वेगवेगळ्या प्रकारची माहिती आपणास प्राप्त होत असते.

पण ही टेस्ट आपण कशासाठी करतो आहे गुन्हेगारी तपास करण्यासाठी का,वंशाचा तपास करण्यासाठी, एखाद्या रोगाचे निदान करण्यासाठी ह्यावरून यातुन आपणास काय माहीती प्राप्त होईल हे ठरत असते.

म्हणजे टेस्ट मधुन आपणास काय परिणाम रिझल्ट हवा आहे त्या पदधतीनुसार ह्या टेस्टचे सॅपल घेतले जात असते.

ही टेस्ट विशेष स्वरूपाची चाचणी असल्याने ही टेस्ट छोटया लॅब मध्ये पार पाडली जात नाही ही टेस्ट फक्त मोठमोठ्या लॅब मध्येच पार पाडली जात असते.

ह्या टेस्टचा रिपोर्ट खुप महत्वाचा असल्याने ही टेस्ट आपण एखाद्या मोठ्या विश्वासु अणि नोंदणीकृत लॅब मधुनच करायला हवी.