Shivshakti Point
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतात परतल्यानंतर त्यांनी भारतातील बंगलोर येथे इस्रोच्या आॅफिसला भेट देत इस्रोच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या अमुल्य कामगिरीसाठी त्यांचे कौतुक केले.
आज इस्रोच्या शास्त्रज्ञांमुळे भारताची मान संपूर्ण उंचावली आहे असे देखील नरेंद्र मोदी म्हणाले.
इस्रोच्या शास्त्रज्ञांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन महत्वाच्या घोषणा केल्या होत्या.
भारताचे चंद्रयान ३ ने २३ आॅगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर साॅफ्ट लॅडिग केली अणि प्रथमतः चंद्रावर आपला तिरंगा फडकावला होता म्हणून हा दिवस नॅशनल स्पेस डे म्हणून साजरा केला जाईल असे बंगलोर येथील इस्रोच्या आॅफिस मध्ये नरेंद्र मोदी म्हणाले.
भारताच्या चंद्रयान २ ने चंद्रावर ज्या ठिकाणी हार्ड लॅडिंग करत प्रथम पाऊल टाकले त्या जागेला तिरंगा पाॅईट म्हणून ओळखले जाईल असे देखील नरेंद्र मोदी म्हणाले.
जवाहर पाॅईट म्हणजे काय?
चंद्रयान १ अभियाना दरम्यान चंद्रयान १ ने चंद्राच्या पृष्ठभागावर ज्या ठिकाणी लॅडर उतरवले अणि साॅफ्ट लॅडिंग केली त्या जागेला जवाहर पाॅईट असे एक नाव देण्यात आले होते.
चंद्रयान १ हे अभियान २२ आॅक्टोंबर २००८ मध्ये लाॅच करण्यात आले होते.चंद्रयान एकने १४ नोव्हेंबर २००८ रोजी दक्षिण ध्रुवाच्या क्रॅश लॅडिग केले.
ज्या जागी चंद्रयान एकने क्रॅश लॅडिग केले त्या शेकलेटन क्रेटर असे म्हटले जाते.ज्या दिवशी हया यानाची क्रॅश लॅडिग करण्यात आली त्या दिवशी भारताचे प्रथम पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती देखील होती.
त्यामुळे जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीच्या दिवशी हे क्रॅश लॅडिग झाले म्हणून त्या पाॅईटला जवाहर पाॅईट असे नाव देण्यात आले होते.
शिवशक्ती पाॅईट म्हणजे काय?
ज्या ठिकाणी लॅडरची साॅफ्ट लॅडिंग होते त्या पाॅईटला एक नवीन नाव देऊन त्याचे नामकरण केले जाते ही एक प्रथा आहे म्हणून चंद्राच्या पृष्ठभागावर चंद्रयान ३ ने साॅफ्ट लॅडिंग करताच ज्या ठिकाणी चंद्रयान ३ च्या लॅडरने प्रथम पाऊल टाकले त्या पांॅईटला शिवशक्ती असे नाव देण्यात आले आहे.
बंगलोर येथे इस्रोच्या शास्त्रज्ञांना संबोधित असताना नरेंद्र मोदी म्हणाले की भारताचे चंद्रयान ३ चंद्राच्या पृष्ठभागावर दक्षिण ध्रुवावर ज्या ठिकाणी अलगदपणे उतरले तसेच ज्या ठिकाणी चंद्रयान ३ यानाचे लॅडर प्रथम उतरले त्या स्पाॅटला तसेच पाॅईटला शिवशक्ती पाॅईट म्हणून ओळखले जाईल.
शिवशक्ती म्हणजे काय?
चंद्रयान ३ उतरले त्या पाॅईटला शिवशक्ती पाॅईट असेच नाव का देण्यात आले?
शिवशक्तीचा निर्माण दैवी स्त्री शक्ती अणि भगवान शिव शक्ती यांच्या नावावरून झाला आहे.
शक्तीची शिवाशी झालेली भेट मानवाच्या उत्क्रांतीला शिखरावर पोहचवण्याचे कार्य करते.
शिवामध्ये म्हणजेच शंकराच्या अस्तित्वात मानवतेच्या कल्याणाचा संकल्प सामावलेला आहे.
ज्या ठिकाणी चंद्रावर गेलेल्या चंद्रयान ३ यानातुन लॅडर उतरले त्या पाॅईटला नरेंद्र मोदी यांनी शिवशक्ती असे नाव दिले.
- नरेंद्र मोदी यांनी हया नावाची फोड करताना सांगितले की आज शिवशक्ती मुळेच आपल्याला हा संकल्प पुर्ण करण्याचे बळ प्राप्त झाले आहे.
- मनातील कुठल्याही संकल्प पुर्ण करण्यासाठी शक्तीचा आर्शिवाद असणे आवश्यक आहे अणि ही शक्ती आपली नारीशक्ती आहे.
- आपल्या भारत देशातील सर्व माता भागिनी ह्या नारीशक्तीचे प्रतिक आहेत.निर्माणा पासुन प्रलया पर्यंत समस्त सृष्टीचा आधार नारी शक्तीच आहे.
- शिवशक्ती पाॅईट हा नारीशक्तीची साक्ष असणार आहे.अणि देशातील नवीन पिढीला विज्ञानाचा वापर मानवतेच्या कल्याणासाठी करण्याची प्रेरणा देईल.
- चंद्रयान ३ च्या लॅडिग पाॅईटला शिवशक्ती असे नाव दिल्याने समस्त देशाला देशाच्या विकासात महिलांचे असलेले योगदान लोकांना कळेल.याने देशभरातील सर्व महिला वर्गाला प्रेरणा प्राप्त होईल.
- आज शिवशक्ती ह्या नावातील शक्ती महिला वैज्ञानिकांच्या प्रेरणेतून सक्षमीकरणातुन तसेच त्यांच्या कठोर मेहनतीतुन निर्माण झाली असल्याचे दिसून येत आहे