६१५ कोटीचा खर्च करण्यात आलेल्या चंद्रयान ३ मोहीमेने एकुण किती कमाई केली? – Chandrayaan 3

६१५ कोटीचा खर्च करण्यात आलेल्या चंद्रयान ३ मोहीमेने एकुण किती कमाई केली? – Chandrayaan 3

भारताने लाॅच केलेल्या चंद्रयान ३ मोहिमेसाठी इस्रो ह्या भारतातील अंतराळ संशोधन संस्थेने तब्बल ६१५ कोटी इतका खर्च केला होता.

अणि ही मोहीम यशस्वीपणे पार देखील पडली पण आपल्यातील खुप जणांच्या मनात हा प्रश्न निर्माण झाला असेल की ह्या चंद्रमोहीमेमुळे भारतातील अंतराळ संशोधन संस्था इस्रोने किती कमाई केली.

आपल्या ह्याच प्रश्नाचे उत्तर आजच्या लेखात आपण जाणून घेणार आहोत.

रिपोर्ट नुसार असे म्हटले जाते आहे की चंद्रयान ३ मोहीम यशस्वीपणे पार पडल्यानंतर भारतासाठी अंतराळ क्षेत्रात वैज्ञानिक संशोधनाच्या नवनवीन संधी चालून आल्या आहेत.

ज्यामुळे आपल्या भारत देशाला संपुर्ण जगाच्या स्पेस कम्युनिटी मध्ये आपले मोलाचे योगदान देता येईल.

सौदी अरेबिया,साऊथ कोरिया सिंगापूर अशा अनेक देशांनी आता भारताच्या चंद्रयान ३ मोहिमेतील यशानंतर भारतासोबत अंतराळ क्षेत्रात सहकार्य प्राप्त करण्यासाठी तसेच भारतासोबत भागीदारी करण्यासाठी इस्रोशी संपर्क साधणे देखील सुरू केले आहे.

Chandrayaan 3 i
Chandrayaan 3 i

एवढेच नव्हे तर ह्या चंद्रयान ३ मिशनशी संबंधित जेवढयाही कंपन्या आहेत त्यांच्या शेअर्स मध्ये देखील अधिक वाढ झाली असल्याचे सांगितले जात आहे.

६१५ रूपये इतक्या अत्यंत कमी बजेट मध्ये लाॅच करण्यात आलेले भारतातील चंद्रयान ३ मिशन २३ आॅगस्ट २०२३ रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर साॅफ्ट लॅडिग करत यशस्वीपणे पार पडले.

यानंतर चंद्रयान ३ मिशनशी संबंधित अनेक कंपन्यांना याचा भरपुर आर्थिक लाभ प्राप्त झाला असल्याचे सांगितले जात आहे.

चंद्रयान ३ मिशन मधील यशामुळे चंद्रयान ३ मिशनशी संबंधित असलेल्या भारतातील सर्व कंपन्यांना फायदा झाला आहे.

चंद्रयान ३ मिशन मधील यशामुळे चंद्रयान ३ मिशनशी संबंधित असलेल्या सर्व भारतातील कंपन्यांना अवघ्या चार दिवसांच्या कालावधीत ३१ हजार कोटीची कमाई करता आली आहे.

फक्त चार दिवसांमध्ये अंतराळाशी संबंधित असलेल्या १३ कंपन्यांच्या मार्केट कॅप मध्ये ३० हजार ७०० कोटी इतकी तेजी आली असल्याचे पाहावयास मिळाले आहे.

See also  एम सी क्यु फुलफॉर्म - MCQ full form in Marathi

चंद्रयान मोहीम राबविणारया इस्रो ह्या भारतातील अंतराळ संशोधन संस्थेला सिस्टीम तसेच क्रिटिकल माॅडयुलसचा पुरवठा करणारी कंपनी सेंटम इलेक्ट्रॉनिक्स ह्या कंपनीच्या २६ टक्के इतकी वाढ झाली आहे.

एवढेच नव्हे तर लिंडे इंडिया,पारस डिफेन्स,भारत हेवी इलेक्ट्रॉनिक्स,अॅवेंटल इत्यादी अंतराळाशी संबंधित कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे.

याचसोबत अनेक गुंतवणूकदारांना असा गैरसमज झाला की इस्रोला गोदरेज इंडस्ट्रीच्या वतीने इस्रोला क्रिटिकल कंपोनंटसचा पुरवठा केला जातो म्हणून गुंतवणूक दारांनी गोदरेज इंडस्ट्रीच्या शेअर्स मध्ये देखील विपुल प्रमाणात खरेदी केले.

पण नंतर कंपनीने खुलासा केला की त्यांचा अंतराळाशी कुठलाही संबंध नाही.

एफ एमसीजी गोदरेज इंडस्ट्रीच्या शेअर्स मध्ये देखील ८ टक्के वाढ झालेली पाहावयास मिळाले आहे.

चंद्रयान ३ मिशन मध्ये इस्रोला मोहिमेसाठी लागत असलेल्या वेगवेगळ्या मटेरिअलचा पुरवठा करून भारतातील अनेक सार्वजनिक तसेच खाजगी कंपन्यांनी आपले अमुल्य योगदान दिले आहे.

ज्याचा पुरेपुर फायदा देखील चंद्रयान ३ मिशनच्या यशानंतर शेअर्स मध्ये वाढ झाल्याने त्यांना प्राप्त झाला

आहे.

६१५ कोटीचा खर्च करण्यात आलेल्या चंद्रयान ३ मोहीमेने एकुण किती कमाई केली

चंद्रयान ३ मिशन मध्ये योगदान दिलेल्या इतर कंपन्या –

१)लारसन अॅण्ड टर्बो

२)मिश्र धातु निगम

३) पीटीसी इंडस्ट्री

४) एमटीआर

५) बीएच ई एल

इत्यादी

अशा अनेक कंपन्या आहेत ज्यांनी चंद्रयान ३ मोहीमेत आपले अमुल्य योगदान दिले आहे.