महाराष्ट्रातील ५ टाॅप इंजिनिअरींग काॅलेज प्रत्येक विद्यार्थ्याला करायचे आहे ह्या काॅलेजांमधुन बीटेकचे शिक्षण- 5 Top Engineering colleges in Maharashtra for B tech.

तयारी स्पर्धा परीक्षेची व्हाट्सअप ग्रुप Join Group

महाराष्ट्रातील ५ टाॅप इंजिनिअरींग काॅलेज -5 Top Engineering colleges in Maharashtra for B tech

सर्व विद्यार्थ्यांना आपला जेईई मेंसचा निकाल समजला आहे.उदया १८ जुन २०२३ रोजी जेईई ऍडव्हान्सडचा निकाल देखील जाहीर करण्यात येणार आहे.

खुप विद्यार्थ्यांना प्रश्न पडला असेल की निकाल लागल्यानंतर महाराष्ट्र राज्यातील कोणत्या इंजिनिअरींग महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा?

आपल्या मनातील ह्याच प्रश्नाचे उत्तर आजच्या लेखात आपण जाणून घेणार आहोत.

आज आपण महाराष्ट्र राज्यातील काही अशा इंजिनिअरींग काॅलेजची नावे बघणार आहोत जिथे प्रवेश घेऊन आपण आपल्या करिअरला उत्तम पद्धतीने उच्च स्तरावर घेऊन जाऊन घडवू शकतो.

5 Top Engineering colleges in Maharashtra for B tech
5 Top Engineering colleges in Maharashtra for B tech

१)आय आयटी मुंबई –

आय आयटी मुंबई हे आपल्या भारत देशातील अणि महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठे प्रतिष्ठित अणि सर्वोत्तम इंजिनिअरींग काॅलेज आहे.इथे विद्यार्थ्यांना बीटेकचे शिक्षण विविध ट्रेडमधुन पुर्ण करता येते.

आय आयटी मुंबई काॅलेज मध्ये फी देखील थोडी जास्त घेतली जाते इथे चार वर्षांच्या शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना जवळपास १० लाखापर्यंत शैक्षणिक खर्च करावा लागतो.

२) काॅलेज ऑफ इंजिनिअरींग,पुणे-

हे सुद्धा आपल्या भारत देशातील तसेच महाराष्ट्र राज्यातील एक सर्वोत्तम इंजिनिअरींग काॅलेज आहे.हे आपल्या भारत देशातील सर्वात जुने अभियांत्रिकी महाविद्यालय आहे.

हे महाविद्यालय पुणे येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित आहे.अणि ह्या महाविद्यालयास एन बीए कडुन मान्यता देखील देण्यात आली आहे.हया महाविद्यालयाची स्थापना १८५४ मध्ये करण्यात आली होती.

३) विश्वकर्मा इंस्टीटयुट ऑफइंजिनिअरींग –

विश्वकर्मा इंस्टीटयुट ऑफइंजिनिअरींग मध्ये देखील विद्यार्थी बीटेक करीता अॅडमिशन घेऊ शकतात.हे देखील भारतातील उत्तम इंजिनिअरींग काॅलेज आहे जिथे कमी खर्चात उत्तमरीत्या विद्यार्थी आपले शिक्षण पूर्ण करू शकतात.

See also  लिपिक कायमस्वरूपी भरती पदसंख्या -40 - कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन मध्ये लिपिक पदासाठी कायमस्वरूपी भरती सुरू -Kolhapur Zilla Nagari Sahakari Bank Association clerk Bharti 2023

अणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे येथील उत्तम रीत्या अभ्यास करत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण पुर्ण झाल्यावर जाॅबसाठी एखादया चांगल्या कंपनीत प्लेसमेंट देखील उपलब्ध करून दिले जाते.

४) के जे सोमय्या काॅलेज ऑफइंजिनिअरींग –

के जे सोमय्या काॅलेज ऑफइंजिनिअरींग हे महाराष्ट्र राज्यातील मुंबई शहरात असलेले एक उत्तम इंजिनिअरींग काॅलेज आहे.हे काॅलेज मुंबई विद्यापीठाशी संलग्नित आहे.

ह्या काॅलेजची स्थापणा १९८३ मध्ये करण्यात आली होती.राज्य सरकारने अणि विद्यापीठ अनुदान आयोगाने केलेल्या शिफारशीमुळे मुंबई युनिव्हसिर्टीने ह्या काॅलेजला स्वायत्त दर्जा देखील प्रदान केला आहे.

के जे सोमय्या काॅलेज ऑफइंजिनिअरींग हे महाराष्ट्र राज्यातील सर्वोत्कृष्ट इंजिनिअरींग काॅलेजपैकी एक मानले जाते.इथे विद्यार्थ्यांना बीटेकचे शिक्षण देखील उपलब्ध करून देण्यात आले आहे.

५) वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट,मुंबई

वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट हे सुद्धा महाराष्ट्र राज्यातील मुंबई येथे स्थित असलेले एक प्रसिद्ध इंजिनिअरींग काॅलेज आहे ज्याची स्थापणा १८८७ मध्ये करण्यात आली होती.

इथे देखील विद्यार्थ्यांना विविध ट्रेडमधुन बीटेक करीता अॅडमिशन घेता येते.हया महाविद्यालया अंतर्गत ५० पेक्षा जास्त यूजीसी अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आले आहेत

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा