पाकिस्तानकडे भारतापेक्षा अधिक अण्वस्त्रांचा साठा चीनने केली भारतापेक्षा अधिक अणुबॉम्बची निर्मिती sipri 2023 report in Marathi
संपूर्ण जगभरात अणुबॉम्बची सध्याची स्थिती काय आहे याचा नुकतेच एका रिपोर्टवरून खुलासा झालेला आहे.
सिपरीच्या एका अहवालातुन असे समोर आले आहे की पाकिस्तान ह्या देशाने मागील एका वर्षात सर्वाधिक अण्वस्त्रांचा साठा करण्यात आपल्या भारत देशाला देखील मागे टाकले आहे.
याचसोबत चीन ह्या देशाने अणुबॉम्ब निर्मिती मध्ये भारत देशाला पिछाडीवर टाकत भारताहुन अडीच ते तीन पट अधिक अणुबॉम्बची निर्मिती केली आहे.
इंटरनॅशनल थिंक टॅक सिंपरीने दिलेल्या एका अहवालात असे सांगितले आहे की पाकिस्तान ह्या देशाने मागील वर्षात आणखी ५ अण्वस्त्रांची निर्मिती केली आहे.ज्यामुळे आता पाकिस्तान कडे १६५ नव्हे तर १७० बाॅम्ब झाले आहेत.
याच्या तुलनेत भारत देशात मागील वर्षी फक्त ४ अणुबॉम्बची निर्मिती करण्यात आली आहे.ज्यामुळे भारतातील अणुबॉम्बची संख्या १६० वरून १६४ वर पोहोचली आहे.
वरील अहवालात नमूद केलेल्या नुसार भारताच्या प्रतिस्पर्धी पाकिस्तान आणि चीन हे दोघे देश अण्वस्त्रांच्या निर्मिती मध्ये भारत देशापेक्षा अधिक आघाडीवर आहेत.
चीन आणि पाकिस्तान दोन्ही देशांनी त्यांच्या भात्यात जास्तीत जास्त अण्वस्त्रांचा साठा जमा केला आहे.फक्त आशिया मध्येच नव्हे तर सर्व जगामध्ये अण्वस्त्रांचा साठा अधिक प्रमाणात केला जातो आहे.
अण्वस्त्र निर्मिती बाबतीत चीन हा देश अव्वल क्रमांकावर आहे.चीनने मागील एका वर्षात ६० अण्वस्त्रांची निर्मिती केली आहे.चीनच्या पाठोपाठ रशियाने देखील मागील वर्षभरात १२ अण्वस्त्रांची निर्मिती केली आहे.
रशिया अणि अमेरिका ह्या देशात सर्वाधिक अण्वस्त्रांचा साठा असल्याचे सांगितले जात आहे.रशियाकडे ४ हजार ४८९ अण्वस्त्रांचा अणि अमेरिका कडे ३७०८ अण्वस्त्रांचा साठा आहे.एकुण अण्वस्त्रांच्या साठया मधील ९० टक्के अण्वस्त्रांचा साठा या दोन्ही देशाकडे आहे.
चीन ह्या देशाकडे ४१० अण्वस्त्रे आहेत.सर्वाधिक अण्वस्त्रांचा साठा असलेल्या देशांच्या यादीत रशिया पहिल्या क्रमांकावर आहे अमेरिका दितीय क्रमांकावर आहे अणि चीन तिसरया क्रमांकावर आहे.
सर्व जगात सध्या १२ हजार ५१२ अण्वस्त्रांचा साठा जमा केला गेला आहे.यातील ९ हजार पेक्षा अधिक अणुबॉम्ब वापरण्यासाठी सज्ज झाले आहे असे अहवालात नमूद केले आहे.
यावरून हे म्हणायला हरकत नाही की मानवता सध्या खुप धोकादायक जीवघेण्या टप्यातुन जाते आहे.देशांमधील आंतरराष्ट्रीय संबंध बिघडत असल्याने युद्धासाठी सज्ज होण्याच्या तयारीला सर्व देश लागले आहेत.