ग्रॅच्युइटी काय आहे ? Gratuity Marathi information

तयारी स्पर्धा परीक्षेची व्हाट्सअप ग्रुप Join Group
Gratuity Marathi information

ग्रॅच्युइटी म्हणजे काय आहे ?

नोकरी व्यवसायात आज बरीच स्थित्यंतरे होताना दिसत आहेत. पूर्वी नोकरी देणाऱ्या कंपनीवर बरचस  अवलंबून राहावं लागतं असे. नोकरी मागणाऱ्याला पगार  किंवा पगारासोबत मिळणारे इतर फायदे ,सुट्ट्या इत्यादी.

पण आज बरीच परिस्थिती बदलली, आता जिथं कौशल्य आधारितआहेत नोकरी आहेत त्या बाबत नोकरी मागणारा बरेच निर्णय घेताना दिसतात, जिथं नोकरी करायची ती कंपनी किती वेतन देतंय पॅकेज, त्या बाबत काय सुविधा मिळणार यावर नोकरदार आज निर्णय घेतात, कारण ज्यांच्या कडे त्या त्या क्षेत्रातल अद्यावत माहिती कौशल्य आहे त्यांना बरीच नोकरीचे ऑप्शन असतात. आणि हवी ती नोकरी निवडू शकतात.

सर्वच मोठ्या कंपन्या मध्ये चांगल्या स्टाफ ला सांभाळून ठेवण कठीण होत आहे, प्रत्येक कंपनी एकनिष्ठ, smart and hardworking  employee च्या शोधात असतात.

आजकाल ग्रॅच्युइटी  रक्कम चर्चेचा विषय बनलीय.काही बातमीनुसार केंद्र सरकार ग्रॅच्युइटी  नियमांमध्ये बदल करणार आहे.आपण या लेखात ग्रॅच्युइटी  म्हणजे काय ? आणि ग्रॅच्युइटी  कसे कॅल्क्युलेट करायचे ? , हे पाहणार आहोत ?

सरकार ग्रॅच्युइटी  5 वर्षाचे 1 वर्ष करण्याच्या विचारात आहे.जर असे झाले,तर याचा कर्मचाऱ्यांना नक्की फायदा होईल.आता कसे 5 वर्ष काम केल्यानंतर कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटी  चा फायदा होतो पण भविष्यात एक वर्ष काम केल्यानंतर कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटी  रककमेचा फायदा होईल.

ग्रॅच्युइटी  काय आहे ? Gratuity Marathi information

  • ग्रॅच्युइटी म्हणजे काय तर एकाद्या कर्मचार्‍याला त्याने नोकरीच्या ठिकाणी केलेल्या एकनिष्ठ , प्रामाणिक आणि सातत्यपूर्ण पूर्ण काम करत कंपांनीच्या वाढीत दिलेल्या उत्तम योगदाना प्रती दिला जाणारा एक आर्थिक मोबदला.
  • एका कंपनीमध्ये जास्त वर्ष काम केल्यानंतर कर्मचाऱ्याला सॅलरी, पेशन आणि प्रॉव्हिडंट फंड हा फायद्याच्या व्यतिरिक्त ग्रॅच्युइटी चा फायदा होतो.
  • ग्रॅच्युइटी हा एक रिवार्ड असतो जो की जास्त वर्ष कंपनीमध्ये काम केल्यामुळे दिला जातो.समजा एका कर्मचाऱ्याने 5 वर्षांपेक्षा जास्त एका कंपनीमध्ये काम केले आणि त्याने ग्रॅच्युइटी  साठी कंपनीच्या नियमांचे पालन करून अप्लाय केले.तर त्याला ग्रॅच्युइटी  चा फायदा नक्की होईल.
  • ग्रॅच्युइटी चा फायदा दोन हिष्यात वाटला जातो.त्यातील पहिला छोटासा हिस्सा कर्मचाऱ्यांच्या पगारातून आणि दुसरा मोठा हिस्सा हा कंपनीकडून दिला जातो.
  • चालू नियमानुसार एक कर्मचारी जर एका कंपनीमध्ये 5 वर्षांपासून जर काम करत असेल तर त्याला ग्रॅच्युइटी रक्कम रिवार्ड म्हणून दिले जाते.
See also  अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा ,कोटस तसेच संदेश - Akshay Tritiya Quotes ,sms Shubhechha 2023 in Marathi

पेमेंट ऑफ ग्रॅच्युइटी  ऍक्ट 1972 – Gratuity Marathi information

पेमेंट ऑफ ग्रॅच्युइटी  ऍक्ट 1972 नियमानुसार ज्या कंपनीमध्ये 10 च्या वरती कर्मचारी आहेत,त्या कंपनीतील कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटी  दिली जाते.समजा एका कंपनीतील कर्मचाऱ्यांने 5 वर्षापेक्षा जास्त सर्व्हिस केली आणि 5 वर्षांनंतर त्या कंपनीचे काम सोडून दुसरी कंपनी जॉईन केली किंवा तो कर्मचारी निवृत्त झाला.आशा वेळेस ग्रॅच्युइटी  रक्कम कंपनीकडून कर्मचाऱ्याला दिली जाते.

ग्रॅच्युइटी  रक्कम कॅल्क्युलेट कशी करतात ?

ग्रॅच्युइटी  रक्कम कॅल्क्युलेट करण्याचा एक फॉर्म्युला आहे.

सम्पूर्ण ग्रॅच्युइटी  रक्कम = शेवटचा पगार × (15/26) × कंपनीमध्ये किती वर्षे काम केले

ग्रॅच्युइटी  कॅल्क्युलेशन आपण उदाहरणावरून पाहु:

  • समजा एका कर्मचाऱ्याने कंपनीमध्ये 20 वर्ष सेवा केली आणि त्याचा कंपनी सोडताना पगार होता 75,000 रूल्ये ( सर्व भत्ता मिळून)
  • एक महत्वाची गोष्ट ग्रॅच्युइटी कॅल्क्युलेट करताना महिन्याचे फक्त 26 दिवस धरले जातात.कारण 4 ते 5 दिवस महिन्यामध्ये कंपनीला सुट्टी असतेच.
  • सम्पूर्ण ग्रॅच्युइटी रक्कम = शेवटचा पगार × (15/26) × कंपनीमध्ये किती वर्षे काम केले
  • सम्पूर्ण ग्रॅच्युइटी रक्कम = 75,000 × (15/26) × 20

वरील उदाहरणामध्ये संपूर्ण ग्रॅच्युइटी  रक्कम 8,65,385 रुपये इतकी होते.वरील उदाहरणामध्ये 20 वर्षे काम केलेल्या कर्मचाऱ्याला 8,65,385 रुपये इतकी ग्रॅच्युइटी  दिली जाईल.

वरील फॉर्म्युला नुसार जर एक कर्मचारी सहा महिन्यांच्या वर कंपनीमध्ये काम करत आहे,तर त्याची गणना एका वर्षांमध्ये केली जाते. म्हणजेच समजा एका कर्मचाऱ्याने 7 वर्ष अन 8 महिने कंपनीमध्ये काम केले आहे तर  ग्रॅच्युइटी  कॅल्क्युलेट करताना त्याने 8 वर्ष काम केले आहे असे समजले जाते आणि समजा एका कर्मचाऱ्याने एका कंपनीमध्ये 7 वर्ष 3 महिने काम केले आहे तर,ग्रॅच्युइटी  चेक करताना त्याने 7 वर्षे काम केले आहे असे समजले जाते.

शेवट –

आपण या लेखामध्ये ग्रॅच्युइटी  म्हणजे काय ? ग्रॅच्युइटी  रक्कम कशी कॅल्क्युलेट करायची ? याबद्दल माहिती पाहिली.आशा आहे तुम्हाला हा लेख नक्की आवडेल,

See also  प्रयोगशाळेत वापरल्या जाणार्‍या महत्वाच्या उपकरणांची यादी - Laboratory Equipment List And Their Use


SIP KNOWLEDGE

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा