आयुर्वेदिक अभ्यंग म्हणजे काय?
अभ्यंग म्हणजे डोक्यापासून ते खाली पायाच्या अंगठ्या पर्यंत कोमट आयुर्वेदिक औषधी तेलाने केलेली अभ्यंग विधी,.प्रयत्न हा असतो की या दरम्यान औषधी तेल पुर्णपणे शरीरात मुरल जावं आणि तसेच या आयुर्वेदिक अभ्यंग द्वारे शरीरात एक ऊर्जा निर्माण व्हावी हा उद्देश असतो.
यात शरीराची समोरची बाजू , डावी बाजू, उजवी बाजू ,पाठीवर आणि बसलेल्या स्तिथीत डोक्या पासून तर पाया पर्यंत प्रत्येक स्तिथी बदलत बदलत अभ्यंग विधीकेला जातो.
- हा मसाज नियमित केल्याने शरीर आणि मन दोन्ही कायम ऊर्जावन राहतात. त्यात संतुलन साधलं जात.
- ज्या स्रियां निरोगी असतील ,कोणत्या ही व्याधी नसतील त्या घरीच कोमट औषधी तेलाने नियमित अभ्यंग करू शकतात.
- आजारी माणसासाठी तेलाने अभ्यंग करणे फायद्याचे असते.
- जर तुम्ही आजारी असाल, चालताना तुम्हाला त्रास होत असेल,खाल्लेले अन्न पचत नसेल तर ह्याचा अर्थ तुमच्या शरीरामध्ये ड्राय नेस वाढत आहे, शरीर कोरड पडत आहे
- .समजा आपल्याला आत जखम झाली, मुक्का मार लगेलेला आहे .जखम झाल्यानंतर जखम एवढी दुखली नाही आणि दोन-तीन वर्षाने जखम झालेल्या ठिकाणी खूप दुखायला लागले,तेव्हा अभ्यंग विधीकरणे फायद्याचे ठरते.
तेल धारा विधी – ? Abhyanga Ayurvedic
- ह्या प्रकरात सम्पूर्ण शरीरा वर कोमट औषध तेलाची धार लावून मालिश करून नंतर अंघोळ केली जाते.ह्या अभ्यंग विधी मध्ये साधारण 3 ते 4 लिटर तेलाची आवश्यकता असते.अभ्यंग विधी ही साधारण 40 ते 50 मिनिटे चालते.जे लोक आजारी आहेत त्यांनीच अभ्यंग विधी करावी असा नियम नाहीये.
- आपण निरोगी राहण्यासाठी देखील तेल अभ्यंग विधीकरू शकतो.ज्या महिलांना कंबरेच्या दुखण्याचा त्रास आहे,त्यांनी किमान 14 ते 21 दिवसअभ्यंग विधी केली पाहिजे.ह्यामुळे हाडे मजबूत होतात,शरीरातील रक्तप्रवाह योग्यरीत्या होतो
- ही तेल मालिश केल्याने शारीरिक आणि मानसिक ऊर्जा वाढते.ज्या महिलांना शरीरासबंधी काही समस्या नाहीत त्यांनी स्वतः घरी अभ्यंग विधी केली तर ते त्यांच्यासाठी फायद्याचे ठरेल.महिलांना शरीरातील काही अवयवांवर जर दुखत असेल तर त्यांनी आयुर्वेदिक डॉक्टरांची भेट घ्यावी.
शिरोधरा अभ्यंग विधी-
- ज्यांना मेंदू संबंधी काही विकास आहेत त्यांच्यासाठी डोक्याची तेल मालीश फायद्याची असते.ह्या मालिश मध्ये आपल्याला झोपवले जाते आणि आपल्या डोक्याच्या बरोबर वर भांडे लटकवलेले असते आणि त्या भांड्यामध्ये कोमट औषधी तेल असते.
- त्या भांड्यातील कोमट तेल हळू हळू आपल्या मस्तकावर पडत असते,ह्याने आपले डोके शांत होते आणि आपल्या नर्व्हस सिस्टीम मजबूत होतात.
- वाताचा आजार किंवा असंतुलन म्हनजे ब भीती, चिंता, असुरक्षा या भावनेने आपलं मन ग्रासित होणं.
- तर पित्त च असंतुलन म्हणजे राग आणि चिडचिड वाढणे. अश्या परिस्थिती मनुष्य सारासार विचार करु शकत नाही व म्हत्वाचे निर्णय घेताना चुकतो
- मेंदू आणि नर्व्हस सिस्टीमला अराम मिळतो.ही लॉस,डिप्रेशन, इंझाईटी यांसारख्या आजारापासून मुक्त होण्यासाठी आपली मदत करते.
- झोप न लागण्याची समस्या समस्या दूर होते.
शिरोपीच्चू -? Abhyanga Ayurvedic Mahiti
- ज्यांची केस सारखे गळत आहेत किंवा किंवा जे अधिक चिंता आणि तनाव ग्रस्त आहेत त्यांची शिरोपिचू अभ्यंग विधीकेली जाते.ह्यामध्ये पहिल्यांदा औषधी तेलाने संपूर्ण तेलाची अभ्यंग विधी केली जाते.
- नंतर आपल्या केसांना केळीच्या पानांनी झाकले जाते आणि खेळाच्या पानाला मधोमध छिद्र पाडले जाते.आणि त्या छिद्रामध्ये परत औषधी तेलाची धार सोडली जाते.काही ठिकाणी शिरोपिचू अभ्यंग मध्ये तेलाच्या पानाचा वापर न करता त्या ऐवजी सुती कापडाचा वापर केला जातो.
- केसांबरोबर आपल्या मेंदूसाठी देखील फायद्याची असते.ही अभ्यंग 45 मिनिटे ते 1 तासापर्यंत पूर्ण होते
Comments are closed.