आयुष काय आहे ? Ayush Treatment information in Marathi

Ayush Treatment information in Marathi

आयुष म्हणजे काय ?

आपल्या वडीलधारी लोकांना आपण विचारलात तर ते सांगतील की साधारण शंभरेक वर्षांपूरवी  मागे गेलो,तर तेव्हा कुटुंबात कुणी आजारी पडली तर वैद्याला बोलवले जायचे.

वैद्यही आयुर्वेदिक औषधे म्हणजे औषधी वनस्पतीचा काढा देत असत आणि आजारी माणूस ठणठणीत बरा व्हायचा.त्या काळी काही आजारांवर वैद्याकडे उपचार नव्हते.आजकाल जास्त वापरात असलेलया औषधी ह्या रासायनिक असतात.त्या औषधी आपणाला लवकर ठीक करत असतील,पण त्या गोळ्या-औषधांचा आपल्या शरीरावर वाईट प्रभाव ही तितकाच पडतो.आयुर्वेदीक औषधांना महत्व देता सरकारने आता काही आयुर्वेदिक दवाखाने सुरू केली आहेत.भविष्यात आयुर्वेदिक दवाखान्याची संख्या नक्कीच वाढेल.

आताची काही लोक त्यांचा आजार बरा होण्यासाठी अॅलोपॅथिक औषधांपेक्षा आयुर्वेदिक औषधे घेणे जास्त सोयीचे समजतात.ह्याचाच विचार करून वर्ष 2013 मध्ये सरकारने IRDAI च्या मदतीने इन्शुरन्स कंपणींना त्यांच्या इन्शुरन्स प्लॅन मध्ये ‛आयुष उपचाराला’ स्थान द्यायचे सुचवले.

आयुर्वेदिक औषढधे प्राचीनकाळापासून भारतात वापरली जात आहेत.आजही तुम्ही जर गावात गेला तर छोट्या आजारांना आयुर्वेदिक औषधांच्या मदतीने ठीक केले जाते.गावातील लोकांचा जर घसा खवखवत असेल तर ते लगेच आले किंवा हळद आणि मिठाच्या गुळण्या करून घसा ठीक करतात.काही दिवसांनी तर लोक अॅलोपॅथिक उपचारापेक्षा आयुर्वेदिक उपचार घेणे चांगले संमजतील.आयुर्वेदिक औषधे निसर्गतःच उपलब्ध असल्यामुळे ते बनवताना जास्त खर्चही नाही येणार.

आयुष उपचार पद्धती म्हणजे नक्की काय ??

आयुष म्हणजे आयुर्वेदिक, योगा,नॅचरोपॅथी,होमिओपॅथी,उनानि व सिद्धा – Ayurvedic, Yoga and Naturopathy, Unani, Siddha, and Homeopathy औषधांचा उपयोग करून देण्यात येणारी वैद्यकीय उपचार पद्धती .आयुष उपचारांतर्गत आपण अ‍ॅलोपॅथी उपचारांना पर्यायी उपचार म्हणून आयुष उपचार पद्धती अवलबू शकता .

See also  Crush अर्थ काय? Crush meaning in Marathi

आयुष हे आयुर्वेदिक चा एक भाग आहे.वाढत्या आयुष उपचाराच्या पद्धतीतील नवीन नवीन संशोधन व लोकांचा कल पाहता पाहता सरकारने आयुष मंत्रालय ही तयार केले आहे.त्यांच्या अधीन हे आयुष काम करते.आयुष उपचार शहरी आणि गावी दोन्ही भागात चालू व्हावे यासाठी सरकार प्रयत्न करत आहेत.

आयुष उपचाराचे फायदे :

IRDIA नी इन्शुरन्स कंपणींना आयुष इन्शुरन्स कव्हर मध्ये समाविष्ट करण्यासाठी सांगितल्यापासून याची मागणी वाढली आहे आणि इन्शुरन्स कंपन्या वाढत्या  स्पर्धला तोंड देण्यासाठी नवनवीन योजना आणत आहेत.

आयुष् उपचार चया काही लक्षवेधी बाबी

  • खर्च इतर पद्धतीतील उपचारापेक्ष्या तुललेने कमी
  • पारंपरिक वैद्यकीय उपचारांन ऐवजी आयुष उपचार पद्धती घेणे या आरोग्य विमामुळे सोपं झालय.
  • पारंपरिक औषधांचा उपयोग होत असल्याने शरीरावर होणारे विपरीत परिणाम होत नाहीत.जे अलोपॅथी औषध मुळे होण्याची शक्यता असते
  • पॉलिसी मध्ये असणाऱ्या सर्व पर्यायी उपचार सेवा या आयुष विमा मध्ये कव्हर असतात.
  • ह्या आयुष विमा ची किंमत 2500 ते 20000 यामध्ये येते.ही किंमत वेगवेगळ्या कंपंनीच्या योजनानुसार कमी जास्त आहे
  • आयुष उपचार पद्धती ठीक होण्यासाठी वेळ लावते;पण ही उपचार पद्धती तितकीच परिणामकारक आहे.
  • आयुष विम्याची किंमत ही बाकीच्या आरोग्य विम्यापेक्षा कमी असते.
  • आयुष विम्याच्या कव्हर मध्ये ज्या ठिकाणावर सरकार मान्यता प्राप्त दवाखाने आहेत ती सर्व ठिकाणे येतात.
  • वयस्कर माणसे जास्त करून आयुष उपचार पद्धती कडे कल असतो .त्यामुळे त्यानी आयुष विमाचा चांगला प्लॅन घेतला पाहिजे.

लक्षात काय ठेवाल ?

  • भारत सारकरच्या पुढकराने आयशु ना मान्यता दिली गेली असली तरी आजू  ही काही आरोग्य विमा योजनांमध्ये याचा समावेष नाही त्या बाबत  काळजी घ्या ,विमा घेताना हा मुद्दा बारकाईनं पहा
  • नियम बाराईकने तपासा, आयुष् वैदकीय उपचारांच्या खर्च वर काही मर्यादा असतात  त्या नीट समजून घ्या
  • आयुष् प्लॅन ऍड असेल तर प्रीमियम किती वाढला ते तपासून पहा.
  • फक्त आयुष चा असा खास भर दिलेला प्लॅन अजून उपलब्ध नाही त्यामुळे नियमित योजनांची अभ्यास करून योग्य प्लॅन निवडावा
See also  CTET अभ्यासक्रम २०२३ पेपर १ आणि २ PDF डाउनलोड करा | CTET Syllabus 2023 Paper 1 And 2 PDF Download

आयुष विम्याच्या अंतर्गत कोणकोणत्या गोष्टी कव्हर नाही होणार ?-Ayush Treatment information in Marathi

  • आयुष विमा अंतर्गत उपचार फक्त सरकार मान्य दवाखाने किंवा सेन्टर वरती होऊ शकतो.
  • आयुष विम्यामध्ये नियमित चेक-अप कव्हर होत नाही.
  • 24 तासा पेक्ष्या कमी दवाखान्यात ऍडमिट असाल तर
  • दवाखाना व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्या ठिकाणी उपचार घेतले असतील
  • निदान आणि तपासणी करता केलेला खर्च
  • काळजी व प्रतिबंधात्मक उपचारासाठी केलेला खर्च जो वैदकीय दृष्टया आवश्यक नाही
  • उत्साहवर्धक उपचारासाठी चा खर्च

.

  • Star Health – Medi Classic Insurance Policy
  • Future Generali – Health Total
  • Max Bupa – Health Companion
  • HDFC ERGO Health – Easy Health
  • Cholamandalam MS Insurance – Healthline

लेखक : Post Author


SIP KNOWLEDGE

Comments are closed.