Adv Gunaratna Sadavarte vakili sanad- Charter Revoked
गुणरत्न सदावर्ते कोण आहेत? यांची वकिलीची सनद दोन वर्षांसाठी का रद्द करण्यात आली आहे?
नुकतीच एक महत्वाची बातमी समोर आली आहे वकिल गुणरत्न सदावर्ते यांची वकिलीची सनद दोन वर्षे इतक्या कालावधी करीता रद्द करण्यात आली आहे.
असे सांगितले जाते आहे बार काऊन्सिल मध्ये त्यांच्या विरूद्ध वकिल सुशील मंचरकर यांच्या द्वारे एक तक्रार दाखल करण्यात आली होती.
या तक्रारीवर चौकशी करण्यासाठी तीन वकिलांची समिती देखील नेमण्यात आली होती.
या समितीने चौकशी केली असता त्यात गुणरत्न सदावर्ते हे दोषी आढळले म्हणून त्यांच्यावर ही कठोर कारवाई करण्यात आली आहे.
गुणरत्न सदावर्ते यांची वकिलीची सनद दोन वर्षांसाठी रद्द करण्यात आली आहे.म्हणजे आता ते दोन वर्षे कुठलीही केस लढु शकणार नाहीये.
आजच्या लेखात आपण ह्याच विषयावर माहीती जाणुन घेणार आहोत.
गुणरत्न सदावर्ते यांची वकिलीची सनद का रदद करण्यात आली आहे?
गुणरत्न सदावर्ते यांच्यावर बार काऊन्सिलच्या नियम सातचे उल्लंघन करण्याचा आरोप केला होता.ज्यावर केलेल्या कारवाईत दोषी आढळले म्हणून त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
गुणरत्न सदावर्ते हे एसटी कर्मचाऱ्यांबाबद कोर्टात सुनावणी चालु असताना वकिलाचा गणवेश परिधान करून सार्वजनिक ठिकाणी म्हणजे आझाद मैदानावर जिथे एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू होता तिथे अधुन मधुन गणवेशातच जात होते.
एवढेच नव्हे तर त्यांनी गणवेश धारण केलेला असताना एसटी कर्मचारींसोबत आझाद मैदानावर डान्स देखील केला असल्याचे सांगितले जात आहे.
अणि ही गोष्ट वकिली पेशाच्या आचारसंहितेचे उल्लंघन करणारी असल्याने तसेच बार काऊन्सिलच्या नियमात न बसणारी असल्यामुळे सदर बाब लक्षात येताच वकिल मंचरकर यांनी याबाबद बार काऊन्सिल कडे तक्रार दाखल केली.
ज्यातुन झालेल्या कारवाईचे परिणाम स्वरूप गुणरत्न सदावर्ते यांना अखेरीस दोन वर्षे केस लढण्यासाठी महाराष्ट्र बार काऊन्सिल कडुन मज्जाव करण्यात आला आहे.
फेब्रुवारी महिन्यात सदावर्ते यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई सुदधा करण्यात आली होती.यावर सदावर्ते म्हणाले होते की माझ्यावर केली जात असलेली कारवाई कुठल्यातरी राजकीय उद्दिष्टाने केली जात आहे.अणि त्यांनी उच्च न्यायालयात धाव देखील घेतली असल्याचे सांगितले जात आहे.
तक्रार करताना काय म्हणाले सुशील मंचरकर?
सुशील मंचरकर यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्यावर बार काऊन्सिल मध्ये तक्रार दाखल करत असे सांगितले आहे की सदावर्ते हे नेहमी वकिलांच्या आचारसंहितेचे उल्लंघन करीत आले आहेत.
यावर अधिक सविस्तरपणे स्पष्टपणे सांगतांना मंचरकर असे देखील म्हटले आहे की कुठल्याही वादविवाद,सार्वजनिक कार्यक्रम,तसेच मोर्चा किंवा आंदोलनांमध्ये मिडिया वाल्यांसमोर ते वकिलीचा गणवेश धारण करून जातात.अणि वकिली आचारसंहितेचे उल्लंघन होईल अशी वर्तवणुक ते नेहमी करतात.
बार काऊन्सिल म्हणजे काय?
बार कौन्सिल ऑफ इंडिया ही भारतातील एक व्यावसायिक नियामक संस्था आहे ही संस्था भारतातील कायदेशीर व्यवसाय आणि कायदेशीर शिक्षणाचे नियमन करते.
बार काऊन्सिल ही एक स्वायत्त संस्था आहे.ही परिषद व्यावसायिक आचरण आणि शिष्टाचार आणि कायदेशीर शिक्षणाचे मानके ठरवण्याचे काम करते.
बार कौन्सिल ऑफ इंडियाची स्थापना वकील कायदा 1961 च्या कलम 4 अंतर्गत करण्यात आली आहे.
गुणरत्न सदावर्ते यांनी बार काऊन्सिलचा कोणता नियम मोडला आहे?
गुणरत्न सदावर्ते यांनी बार काऊन्सिलचा आठवा नियम मोडला आहे हा नियम असा आहे की वकिलांना सार्वजनिक ठिकाणी गाऊन अणि बॅड घालुन फिरण्यास बार काऊन्सिल कडुन मनाई करण्यात आली आहे.
तरी देखील गुणरत्न सदावर्ते यांनी बार काऊन्सिलचा नियम सात मोडुन आझाद मैदाना सारख्या सार्वजनिक ठिकाणी संप मोर्चा दरम्यान बॅड अणि गाऊन घालुन तेथील सार्वजनिक कार्यक्रमामध्ये आपला सहभाग नोंदविला एवढेच नव्हे तर ते नृत्य देखील करताना आढळून आले आहे.
म्हणजेच वकिलाची पत खालावेल अशी वर्तवणुक करताना ते अनेकदा आढळून आले होते.
बार काऊन्सिलचे नियम काय आहेत?
बार काऊन्सिलच्या नियमांमध्ये दोन नियम येतात एक न्यायालयाप्रती वकिलांच्या कर्तव्यावरील नियम अणि दुसरा वकिलाचे आपल्या ग्राहकाप्रती असलेल्या कर्तव्याचे नियम.
आज आपण वकिलांचे न्यायालयाप्रती कर्तव्यावरील नियम काय आहेत हे जाणून घेणार आहोत.यात गुणरत्न सदावर्ते यांनी कोणते नियम मोडले हे देखील बघणार आहोत.
१) सन्माननीय रीतीने वागणे
पहिल्या नियमात असे दिले आहे की न्यायालयासमोर कुठलीही केस सादर करत असताना वकिलाने न्यायालयासमोर सन्माननीय रीतीने वागायला हवे.
वकिलाने नेहमी स्वाभिमानाने वागले पाहिजे.तथापि,जेव्हा जेव्हा न्यायिक अधिकार्याविरुद्ध गंभीर तक्रारीसाठी योग्य कारण असेल तेव्हा वकिलाला त्यांची तक्रार योग्य अधिकार्यांकडे मांडण्याचा अधिकार आणि कर्तव्य सुदधा देण्यात आले आहे.
२) वकिलाने नेहमी न्यायालयाचा आदर करा
एका वकिलाने नेहमी न्यायालयाचा आदर केला पाहिजे.त्याने नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की न्यायिक कार्यालयाचा आदर सन्मान राखणे हे आदरयुक्त समुदायाच्या अस्तित्वासाठी अत्यंत आवश्यक असते.
३) वकिलाने कधीही न्यायाधीशांसोबत खाजगीत संवाद साधू नये
कुठल्याही वकिलाने न्यायाधीश किंवा इतर न्यायाधीशांसमोर प्रलंबित असलेल्या कोणत्याही प्रकरणा केस संदर्भात न्यायाधीशांशी खाजगी रीत्या जाऊन संवाद साधू नये.
तसेच वकिलाने कुठल्याही प्रकारचा बेकायदेशीर किंवा अयोग्य मार्ग वापरून जसे की जबरदस्ती, लाच इ. करून न्यायालयाच्या निर्णयावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न देखील करू नये.
४) विरोध करण्यासाठी कुठल्याही बेकायदेशीर रीतीने वागण्यास नकार देणे
वकिलाने कोणत्याही विरोधी वकील किंवा विरोधी पक्षाप्रती बेकायदेशीर किंवा अयोग्य रीतीने वागु नये अणि तसे करण्यास देखील नकार दिला पाहिजे.
वकिलाने नेहमी आपल्या क्लायंटला कोणत्याही बेकायदेशीर,तसेच अयोग्य रीतीने वागण्यापासून रोखायला हवे आणि कोणत्याही बाबतीत न्यायपालिका, शविरोधी वकील किंवा विरोधी पक्षांप्रती अन्यायकारक वागणूक वापरण्यापासून देखील आपल्या क्लाईटला रोखायला हवे.
५) अयोग्य मार्गांचा आग्रह धरणाऱ्या ग्राहकांचे प्रतिनिधित्व करण्यास नकार देणे
कोर्टात केस जिंकण्यासाठी चुकीच्या तसेच अयोग्य मार्ग वापरण्याचा आग्रह धरणाऱ्या कोणत्याही क्लायंटचे प्रतिनिधित्व करण्यास वकिलाने स्पष्टपणे नकार दिला पाहिजे.
वकिलाने कधीही आपल्या क्लाईटने दिलेल्या सूचनांचे आंधळेपणाने निमुटपणे पालन करू नये.
पत्रव्यवहारात आणि न्यायालयात प्रतिपक्षाशी युक्तिवाद करताना त्याची भाषा वापरण्यात तो सन्माननीय असायला हवा.
वकिलाने बाजू मांडताना खोट्या कारणांवरून समोरच्या पक्षाच्या प्रतिष्ठेला निंदनीयपणे नुकसान पोहोचेल असे वागु नये.न्यायालयात युक्तिवाद करताना वकिल कुठलीही असंसदीय भाषा देखील वापरू शकत नाही.
६) नेहमी योग्य ड्रेस कोडमध्ये दिसणे-
वकिलाने नेहमी कोर्टात फक्त बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या ठरलेल्या नियमांनुसार विहित केलेल्या पोशाखातच हजर राहावे.
७) वकिलाने संबंधांसमोर येण्यास नकार द्यायला हवा –
वकिलाने न्यायिक प्राधिकरणासमोर कोणत्याही प्रकारे हजेरी,कृती,याचिका किंवा सराव करू नये जर खंडपीठातील एकमेव किंवा कोणताही सदस्य वकिलाचे वडील,आजोबा,मुलगा,नातू,काका,भाऊ,पुतण्या,पहिला चुलत भाऊ या नात्याने संबंधित असेल तर.
८) वकिलाने सार्वजनिक ठिकाणी गाऊन तसेच बॅड घालुन फिरू नये –
वकिलाने न्यायालय वगळता इतर कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी गाऊन तसेच बॅड घालुन फिरू नये.हाच आठवा नियम गुणवंत सदावर्ते यांनी मोडला होता.
ज्यामुळे त्यांच्यावर कारवाई देखील करण्यात आली आहे.
९) वकिलाने आपल्या क्लायंटसाठी जामीन म्हणून उभे राहू नये
वकिलाने आपल्या क्लाईटसाठी जामीन म्हणून उभे राहू नये, किंवा कोणत्याही कायदेशीर कार्यवाहीच्या उद्देशाने त्याच्या क्लायंटला आवश्यक असलेल्या जामीनाची योग्यता प्रमाणित करू नये.
१०) आर्थिक हितसंबंधांच्या बाबतीत दिसत नाही
वकिलाने त्याचे आर्थिक हितसंबंध असलेल्या कोणत्याही बाबतीत काम करू नये किंवा बाजू मांडू नये.
उदाहरणार्थ, म्हणजे जर वकिल दिवाळखोरांचा कर्जदार असेल तर तेव्हा त्याने दिवाळखोरीच्या याचिकेत काम करू नये.त्याने ज्या कंपनीचा तो संचालक आहे त्याच्याकडून ब्रीफ स्वीकारू नये.
११) ज्या आस्थापनांचा तो सदस्य आहे त्याचे प्रतिनिधित्व करत नाही
वकिलाने आस्थापनेच्या व्यवस्थापनाचा सदस्य असल्यास कोणत्याही आस्थापनेसाठी किंवा विरुद्ध कोणत्याही न्यायिक प्राधिकरणामध्ये किंवा त्याच्यासमोर उपस्थित राहू नये.