युपीआय दवारे पैशांची देवाणघेवाण – पीपीआय
एन पी सी आय (national payment corporation) च्या युपीआय माध्यमातुन केल्या जात असलेल्या मर्चंट ट्रान्झॅक्शनवर पीपीआय म्हणजेच prepaid payment instrument fees आकारली जाणार आहे.
यामुळे 1 एप्रिल 2023 पासुन युपीआय दवारे पेमेंट करणे मोबाईल युझरसाठी महाग होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ह्या बाबत निघालेल्या सरक्युलर नुसार असे सांगितले जाते आहे की आता युपीआय दवारे पेमेंट करणारया व्यक्तींना 2000पेक्षा अधिक पैशांची देवाणघेवाण करण्यासाठी काही चार्ज द्यावा लागणार आहे.
हा पीपीआय चार्ज मर्चंट ट्रान्झॅक्शनवर लागु केला गेला आहे म्हणजेच व्यापारयांना युपीआय दवारे पेमेंट करणारया युझरला हा चार्ज भरावा लागेल असे सांगितले जाते आहे.
बिझनेस स्टॅडर्डने दिलेल्या वृत्तानुसार पीपीआयच्या माध्यमातून युपीआय पेमेंट केल्यावर मर्चंट ट्रान्झॅक्शन करणारया युझरला 1.1 टक्का इतका चार्ज लागु शकतो.
जे व्यक्ती व्यापारी व्यवहाराकरीता उद्योग व्यवसायातील छोटछोटया कामांसाठी आॅनलाईन गुगल पे फोन पे पे टीयम इत्यादी माध्यमांद्वारे आॅनलाईन पेमेंट करतात त्यांच्यासाठी ही चिंतेची बाब ठरू शकते.
आपल्यातील खुप जणांना हा प्रश्न पडला असेल की हे प्रीपेड पेमेंट इंसट्रुमेंट नक्की काय भानगड आहे याचा अर्थ काय होतो.
प्रीपेड पेमेंट इंसट्रुमेंट म्हणजे काय?ppi meaning in Marathi
प्रीपेड पेमेंट इंसट्रुमेंट हे एक असे प्लॅटफॉर्म आहे ज्याचा वापर करून वस्तु अणि सेवेची खरेदी केली जाऊ शकते.
यात त्या पैशांनी पैसे पाठवणे फंड ट्रान्स्फर करणे हे व्यवहार केले जाऊ शकतात.जे पैसे ह्या प्लॅटफॉर्मवर कस्टमरकडून ठेवले जात असतात.
यात कस्टमर आपले पैसे अॅड करू शकतो अणि तेच पैसे ट्रान्स्फर करण्यासाठी वापरू शकतो.प्रिपेड पेमेंट इंसट्रुमेंट कोणतीही कंपनीला इशु करू शकते फक्त यासाठी त्या कंपनीकडे आरबी आयने दिलेले लायसन्स असणे आवश्यक आहे.
प्रीपेड पेमेंट इंसट्रुमेंटचे तीन प्रकार आहेत –
१) क्लोज सिस्टम पीपीआय-
क्लोज सिस्टम पीपीआयला ज्या कंपनीकडुन इशु केले जाते तिचे कस्टमर फक्त त्या कंपनीकडुन कुठलीही वस्तु तसेच सेवा खरेदी करत असतात.
यात पैसे पाठविणे फंड ट्रान्स्फर करणे पैसे काढणे हे व्यवहार केले जात नसतात.क्लोज सिस्टम पीपीआय याला आरबीआय मान्यतेची मंजुरीची आवश्यकता नसते.
२) सेमी क्लोज सिस्टम पीपीआय –
सेमी क्लोज पीपीआयला आरबीआय मंजुरी प्राप्त बॅक किंवा नाॅन बॅक देखील इशु करू शकतात.
याचा वापर फक्त त्या विक्रेता व्यापारी वर्गाला पेमेंट करता येते ज्यांनी हे इशु केलेल्या बॅक नाॅन बॅक सोबत करार केला आहे.
सेमी क्लोज सिस्टम पीपीआयमध्ये कॅश विद ड्राॅवल होत नसते.
यात आरबीआयची मंजुरी असणे आवश्यक असते.
३) ओपन सिस्टम पीटीआय –
ओपन पीपीआयचा वापर फक्त आरबीआयची मंजुरी प्राप्त असलेली बॅक करू शकते.यादवारे कोणत्याही विक्रेता आणि व्यापारी ला पैसे पाठवले ट्रान्स्फर केले जाऊ शकतात.