ई-काँमर्सचे फायदे- Advantages Of E Commerce In Marathi

ई-काँमर्सचे फायदे- Advantages Of E Commerce In Marathi

जेव्हा पण आपल्या मनात आँनलाईन एखादी वस्तु(कपडे,मोबाईल,पुस्तक इत्यादी) खरेदी करण्याचा विचार येत असतो.

तेव्हा आपण सर्वात आधी अँमेझाँन ह्या वेबसाईटला भेट देत असतो.

कारण ही एक अशी जगप्रसिदध ई काँमर्स वेबसाईट तसेच आँनलाईन शाँपिंग सेंटर आहे जिथुन आपण कुठलीही वस्तु आँनलाईन एका झटक्यात खरेदी करू शकतो.

आणि याचे पेमेंट देखील आपण एका जागी बसुन गुगल पे फोन पे दवारे करू शकतो.यासाठी आपल्याला कुठल्याही बँकेत पैसे पाठवण्यासाठी जाण्याची आवश्यकता देखील पडत नाही.

याव्यतीरीक्त देखील असे अनेक फायदे आहेत जे ईकाँमर्स दवारे वस्तुंची खरेदी तसेच विक्री केल्यामुळे आपणास प्राप्त होत असतात.

आजच्या लेखात आपण ह्याच प्रमुख फायद्यांविषयी सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.

ई-काँमर्सचे फायदे किती आहेत आणि कोणकोणते आहेत?(Advantages Of E Commerce In Marathi)

ई-काँमर्सदवारे खरेदी करण्याचे काही प्रमुख फायदे पुढीलप्रमाणे आहेत-

● ईकाँमर्सचा सगळयात महत्वाचा फायदा हा असतो की आपण ईकाँमर्सदवारे कुठलीही वस्तु अतिशय वेगाने काही सेकंदात खरेदी करू शकतो.आणि तिचे पेमेंट देखील ताबडतोब करू शकतो.

म्हणजेच थोडक्यात सांगायचे म्हटले तर ईकाँमर्समदवारे खरेदी विक्रीचा कुठलाही व्यवहार आपण अतिशय जलदगतीने पार पाडु शकतो.म्हणुन सर्व जण आँफलाईन दुकानात जाऊन कुठलीही वस्तु खरेदी करण्यापेक्षा आँनलाईन ईकाँमर्स वेबसाईटदवारे ती खरेदी करणे अधिक पसंद करत असतात.

● ईकाँमर्सचा दुसरा फायदा हा असतो की इथे आपल्याला कुठलीही वस्तु आँफलाईनपेक्षा कमी दरामध्ये,स्वस्त दरात डिस्काऊंट प्राप्त करून खरेदी करता येत असते.

शिवाय इथे आपणास घरपोच वस्तु देण्याची सेवा पुरवली जात असते.त्यामुळे आपण आँफलाईन पेक्षा आँनलाईन खरेदी करण्याला जास्त प्राधान्य देत असतो.

● ईकाँमर्सदवारे खरेदी करण्याचा तिसरा फायदा हा आहे की आपण कुठेही न जाता एका जागेवर बसुन आँनलाईन आँडर्र करून कुठलीही वस्तु घरपोच प्राप्त करू शकतो.

See also  कंटेट मार्केटिंग म्हणजे काय? What is content marketing in Marathi

● ईकाँमर्सने खरेदी केल्यामुळे आपला दुकानात खरेदीसाठी जाण्या येण्यासाठी लागणारा अमुल्य वेळ तसेच रहदारीचा म्हणजेच पेट्रोल डिझेलचा खर्च देखील वाचत असतो.शिवाय शरीराच्या उर्जेची बचत होते.जी आपण इतर महत्वाच्या कामात वापरू शकतो.

● ईकाँमर्सदवारे खरेदी केल्याने आपल्याला वस्तु खरेदी करण्यासाठी रोख कँश देण्याची आवश्यकता पडत नसते.कारण इथे आपल्याला डिजीटल पेमेंटची सुविधा असते.

● जेव्हा आपण आँफलाईन खरेदी करतो तेव्हा आपल्यासमोर कुठलीही वस्तु खरेदी करण्यासाठी मोजकेच पर्याय असतात कारण आँफलाईनमध्ये वस्तुंचा स्टाँक मोजकाच असतो ज्यामुळे तिथे वस्तु खरेदी करताना त्या वस्तुचे एक किंवा दोन सँपल दाखवले जात असतात म्हणजेच इथे मल्टीपल चाँईसचा पर्याय नसतो.पण जर आपण आँनलाईन म्हणजेच ईकाँमर्सदवारे खरेदी केली तर एकाच वस्तुमध्ये आपल्याला वेगवेगळया व्हरायटीज उपलब्ध करून दिल्या जात असतात.ज्यात आपण पाहिजे त्या कलरमध्ये ती वस्तु खरेदी करू शकतो.

● ईकाँमर्सवरून खरेदी करण्यासाठी कुठलेही वेळेचे बंधन नसते आपण कधीही कुठलीही वस्तु इथे आँडर करून खरेदी करू शकतो.पण आँफलाईन मध्ये दूकान उघडण्याचा बंद होण्याचा एक ठाराविक वेळ असतो आणि त्यातच जाऊन आपणास कुठलीही वस्तु खरेदी करावी लागत असते.म्हणजेच इथे खरेदीसाठी एक वेळेचे बंधन असते.जे आपल्याला पाळावे लागते.

● ईकाँमर्सचा अजुन एक महत्वाचा फायदा हा आहे की आपल्याला जर एखादी वस्तु नाही आवडली किंवा आपण जी वस्तु आँनलाईन आँडर केली आहे ती न मिळता चुकीची वस्तु डिलिव्हर करण्यात आली असेल तर इथे आपण ती वस्तु रिटर्न करून त्याजागी दुसरी वस्तु मागवू शकतो.किंवा आपले पैसे रिफंड करू शकतो.

● ईकाँमर्स दवारे कुठलीही वस्तु खरेदी करण्याचा फायदा हा असतो की यात आपल्याला विविध ईकामर्स वेबसाईटवरील तसेच आँफलाईन दुकानांवर विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या प्रोडक्ट तसेच वस्तुंच्या किंमतींना एकमेकांसोबत कंपेअर करून कुठली आपल्याला स्वस्त पडेल हे बघता येते.

See also  अमेरिका ह्या देशाने गरोदरपणाच्या काळात बाळाचे संरक्षण करणारया पहिल्या आर एसव्ही लशीला दिली मान्यता -The US approved the first RSV vaccine to protect babies during pregnancy

● ईकाँमर्स दवारे कुठलीही वस्तु खरेदी करण्याचा फायदा हा असतो की ईकाँमर्स वेबसाईटवर विक्रीस असलेली कुठली वस्तु तसेच प्रोडक्ट अधिक उत्तम आहे हे जाणुन घेण्यासाठी आपण ती वस्तु याआधी ज्यांनी खरेदी केली आहे त्या कस्टमरचे रिव्युव्ह वाचु शकतो.याने आपल्याला कोणती वस्तु खरेदी केली पाहिजे आणि कोणती वस्तु खरेदी करु नये याचे एक बाईंग गाईड प्राप्त होत असते.

ई-काँमर्स वेबसाईदवारे आपल्या मालाची वस्तुंची विक्री करण्याचे काही प्रमुख फायदे पुढीलप्रमाणे आहेत-

● अँमेझाँन,शाँपीफाय,मेशो यासारख्या ईकाँमर्स वेबसाईटदवारे आपल्या वस्तुंची मालाची विक्री करून आपण जगभरातील कानाकोपरयात आपल्या व्यवसायाचा प्रचार प्रसार करू शकतो.जगभरात आपल्या मालाची विक्री करू शकतो.येथे विक्री करण्यासाठी कुठलेही जागेचे बंधन नसते.

● घरबसल्या आँनलाईन पदधतीने ईकाँमर्स वेबसाईटदवारे आपण आपला माल,वस्तु प्रोडक्टस विकु शकतो.

● आपल्याला आपला माल,वस्तु प्रोडक्ट स्टोअर करून ठेवण्यासाठी कुठल्याही फिजीकल स्टोअरची,शाँपची यात आवश्यकता पडत नसते.