एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विस लिमिटेड मध्ये १६६ जागांसाठी भरती सुरू – AIATSL Bharti 2023 in Marathi

तयारी स्पर्धा परीक्षेची व्हाट्सअप ग्रुप Join Group

एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विस लिमिटेड मध्ये १६६ जागांसाठी भरती सुरू AIATSL bharti 2023 in Marathi

AIATSL Bharti पदांची नावे –

एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट लिमिटेडच्या वतीने कनिष्ठ अधिकारी,हॅडीमन,ड्युटी आॅफिसर,ग्राहक सेवा कार्यकारी,हॅण्डीवूमन, ज्युनियर ग्राहक सेवा कार्यकारी,युटीलिटी एजंट कम रॅम्प ड्राइव्हर इत्यादी पदांची भरती करण्यात येत आहे.

पदांनुसार पात्र असणारया उमेदवारांची मुलाखत घेण्याची तारीख देखील निश्चित करण्यात आली आहे.

एकुण पद संख्या शैक्षणिक पात्रता,वयोमर्यादेच्या अटी अणि वेतन-

AIATSL Bharti एकुण पद संख्या -१६६

१)ड्युटी आॅफिसर -एकुण ६ पदे

वयोमर्यादा अट-

ह्या पदासाठी वयोमर्यादा अट-५० वर्ष इतकी ठेवण्यात आहे.

शैक्षणिक पात्रता -मान्यता प्राप्त संस्थेतुन पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.तसेच ड्युटी आॅफिसर पदावर काम करण्याचा बारा वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.

वेतन -डयुटी आॅफिसर पदासाठी निवडण्यात आलेल्या उमेदवारांना ३२ हजार २०० रूपये इतके वेतन असणार आहे.

२)हॅडीमॅन -एकुण ३६ पदे

वयोमर्यादा अट-

ह्या पदासाठी सामान्य उमेदवारांना २८वर्ष तसेच ओबीसींना ३१ वर्षे व एस एसटी कॅटॅगरी मधील उमेदवारांना ३३ वर्षे इतकी वयाची अट ठेवण्यात आली आहे.

See also  पुणे जिल्हा नागरी सहकारी बँकेमध्ये लिपिक पदाच्या ५० जागांसाठी भरती सुरू - Bhagini Nivedita Co Operative Bank Recruitment In 2023

शैक्षणिक पात्रता -१० वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वेतन -हॅण्डी मॅन पदासाठी निवडण्यात आलेल्या उमेदवारांना १९ हजार ३५० रूपये इतके वेतन असणार आहे.

३) हॅडीवूमन -एकुण ४५ पदे

वयोमर्यादा अट-

ह्या पदासाठी देखील सामान्य उमेदवारांना २८वर्ष तसेच ओबीसींना ३१ वर्षे व एस एसटी कॅटॅगरी मधील उमेदवारांना ३३ वर्षे इतकी वयाची अट ठेवण्यात आली आहे.

शैक्षणिक पात्रता -१० वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वेतन -हॅडी वुमन पदासाठी निवडण्यात आलेल्या उमेदवारांना १९ हजार ३५० रूपये इतके वेतन असणार आहे.

४) हॅडीवुमन किनर्स -एकुण २० पदे

वयोमर्यादा अट-

ह्या पदासाठी सामान्य उमेदवारांना २८वर्ष तसेच ओबीसींना ३१ वर्षे व एस एसटी कॅटॅगरी मधील उमेदवारांना ३३ वर्षे इतकी वयाची अट ठेवण्यात आली आहे.

शैक्षणिक पात्रता -१० वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वेतन -हॅण्डी वुमन किनर पदासाठी निवडण्यात आलेल्या उमेदवारांना १७ हजार ५२० रूपये इतके वेतन असणार आहे.

५) ग्राहक सेवा अधिकारी -एकुण ११ पदे

वयोमर्यादा अट-

ह्या पदासाठी सामान्य उमेदवारांना २८वर्ष तसेच ओबीसींना ३१ वर्षे व एस एसटी कॅटॅगरी मधील उमेदवारांना ३३ वर्षे इतकी वयाची अट ठेवण्यात आली आहे.

शैक्षणिक पात्रता -मान्यताप्राप्त संस्थेतुन पदवी प्राप्त

वेतन -ग्राहक सेवा कार्यकारी पदासाठी निवडण्यात आलेल्या उमेदवारांना २१ हजार ३०० रूपये इतके वेतन असणार आहे.

६) ज्युनियर ग्राहक सेवा कार्यकारी -एकुण २५ पदे

वयोमर्यादा अट-

ह्या पदासाठी सामान्य उमेदवारांना २८वर्ष तसेच ओबीसींना ३१ वर्षे व एस एसटी कॅटॅगरी मधील उमेदवारांना ३३ वर्षे इतकी वयाची अट ठेवण्यात आली आहे.

शैक्षणिक पात्रता -१०+ १२ उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वेतन -ज्युनिअर ग्राहक सेवा कार्यकारी पदासाठी निवडण्यात आलेल्या उमेदवारांना १९ हजार ३५० रूपये इतके वेतन असणार आहे.

७) युटीलिटी एजंट कम रॅम्प ड्राइव्हर -एकुण ७ पदे

वयोमर्यादा अट-

See also  एसटी मधुन हाफ तिकिट सवलतीमध्ये प्रवास करण्याचे प्रमुख नियम अणि अटी - 50 percent discount to women on st bus ticket rules of scheme in Marathi

ह्या पदासाठी सामान्य उमेदवारांना २८वर्ष तसेच ओबीसींना ३१ वर्षे व एस एसटी कॅटॅगरी मधील उमेदवारांना ३३ वर्षे इतकी वयाची अट ठेवण्यात आली आहे.

शैक्षणिक पात्रता -१० वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वेतन -युटीलिटी एजंट कम रॅम्प ड्राइव्हर या पदासाठी निवडण्यात आलेल्या उमेदवारांना १९ हजार ३५० रूपये इतके वेतन असणार आहे.

८) कनिष्ठ अधिकारी टेक्निकल -एकुण ४ पदे

वयोमर्यादा अट-

ह्या पदासाठी सामान्य उमेदवारांना २८वर्ष तसेच ओबीसींना ३१ वर्षे व एस एसटी कॅटॅगरी मधील उमेदवारांना ३३ वर्षे इतकी वयाची अट ठेवण्यात आली आहे.

शैक्षणिक पात्रता -मॅकेनिकल इंजिनिअरींग, इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग,इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरींग इत्यादी मध्ये बॅचलर डिग्री असणे आवश्यक आहे.

वेतन -या पदासाठी निवडण्यात आलेल्या उमेदवारांना २५ हजार ३०० रूपये इतके वेतन असणार आहे.

९) कनिष्ठ अधिकारी प्रवासी -एकुण १२ पदे

वयोमर्यादा अट-

कनिष्ठ अधिकारी पदाकरीता एस सी एस टी कॅटॅगरी मधील उमेदवारांना ४० वर्षे, ओबीसी कॅटॅगरी मधील उमेदवारांना ३८ वर्षे अणि सामान्य उमेदवारांना ३५ वर्षे इतकी वयोमर्यादा ठेवण्यात आली आहे.

AIATSL Bharti शैक्षणिक पात्रता –

भाडे,आरक्षण,तिकीट,संगणकीकृत पॅसेंजर चेक-इन/कार्गो यापैकी कोणत्याही क्षेत्रात किंवा त्याच्या संयोजनात 09 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे तसेच 10+2+3 पॅटर्न अंतर्गत मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे.

वेतन -या पदासाठी निवडण्यात आलेल्या उमेदवारांना २५ हजार ३०० रूपये इतके वेतन असणार आहे.

AIATSL Bharti निवड प्रक्रिया कशी असणार?

सर्व योग्य अणि पात्र उमेदवारांची निवड शैक्षणिक पात्रतेनुसार निर्धारीत करण्यात आलेल्या पदासाठी मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.

AIATSL Bharti मुलाखतीचे ठिकाण अणि तारीख –

सर्व उमेदवारांना मुलाखतीसाठी सर्व आवश्यक कागदपत्रे अर्ज घेऊन हाॅटेल प्रिसटाईन रेसीडेंसी विमानतळ रोड एस व्ही पी च्या पुढे इंटरनॅशनल सरदार नगर,हंसोल अहमदाबाद गुजरात -३८२४७५ ह्या पत्त्यावर मुलाखतीच्या दिवशी उपस्थित राहायचे आहे.

See also  पुणे येथे 12th पासवर सरकारी भरती 2023 | AFMC Pune Bharti 2023 In Marathi

● वरील सर्व पदांसाठी मुलाखत ही ७ ते १३ फेब्रुवारी दरम्यान घेतली जाणार आहे.

AIATSL Bharti अर्ज शुल्क तसेच फी किती आहे?

सर्व उमेदवारांना भरतीसाठी अर्ज करायला ५०० रूपये इतके शुल्क फी भरावी लागणार आहे.

आॅफिशिअल वेबसाईट –

अधिक माहितीसाठी एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट लिमिटेड कंपनीची आॅफिशिअल वेबसाईट www.aiasl.in ही आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा