ॲमेझॉन प्राईम विषयी माहिती Amazon prime information in Marathi
मित्रांनो आपणा सर्वांना माहीत आहे की ॲमेझॉन ही अमेरिकेतील स्थित असलेली आंतरराष्ट्रीय कंपनी तसेच जगातील सर्वात मोठी आँनलाईन शाॅपिंग तसेच ईकाॅमर्स वेबसाईट आहे.जिचे मालक जेफ बेजोज हे आहेत.
ॲमेझॉन ह्या आँनलाईन शाॅपिंग वेबसाईटवरून जगभरातील लोक आपल्याला हव्या त्या वस्तूंची चांगल्या डिस्काउंट सोबत घरबसल्या इंटरनेटच्या माध्यमातून खरेदी तसेच शाॅपिंग करत असतात.
ॲमेझॉन ह्या आंतरराष्ट्रीय कंपनीने भारतामध्ये त्यांचा ईकाॅमर्स प्रोडक्ट,वस्तू सेलिंगचा व्यवसाय ॲमेझॉन डाॅट इन ह्या वेबसाईट द्वारे सर्वप्रथम सुरू केला होता.
आजच्या लेखात आपण ॲमेझॉन ने लाॅच केलेल्या एका अत्यंत महत्त्वाच्या फिचरविषयी माहीती जाणुन घेणार आहोत.ज्याचे नाव ॲमेझॉन प्राईम असे आहे.
ॲमेझॉन प्राईम काय आहे?
ॲमेझॉन प्राईम हे ॲमेझॉन ने काही वर्षांपूर्वी लाॅच केलेले फिचर आहे.हे फिचर युएस मध्ये खुप प्रसिद्ध आहे पण भारतात अजुनही बहुतेक जणांना ह्या फिचरविषयी विशेष माहीती नाहीये.
ॲमेझॉन प्राईम ही ॲमेझॉन डाॅट इनकडुन सुरू करण्यात आलेली एक प्रिमियम सर्विस आहे.
ह्या सर्विसचा लाभ प्राप्त करण्यासाठी युझरला म्हणजेच ॲमेझॉन वरून आनलाईन वस्तू खरेदी करणारया ग्राहकांना आधी ॲमेझॉन प्राईमचे पेड सबस्क्रिप्शन घ्यावे लागते.
ॲमेझॉन प्राईमचे सबस्क्रिप्शन घेण्याचे फायदे कोणकोणते आहेत?
● ॲमेझॉन प्राईमचे पेड सबस्क्रिप्शन घेतल्यानंतर आपणास ॲमेझॉन प्राईम वरून खरेदी केलेल्या कुठल्याही वस्तू तसेच प्रोडक्ट वर शिपिंग चार्ज,डिलीव्हरी चार्ज भरावा लागत नसतो.याचसोबत इतरही अनेक फ्री सेवा सुविधा आहेत ज्या आपणास यात प्राप्त होत असतात.
● जे व्यक्ती ॲमेझॉन द्वारे एखादी वस्तूची खरेदी करत असतात अणि त्यांना ती वस्तू लवकरात लवकर हवी असते त्यांना फास्ट डिलीव्हरी प्राप्त करण्यासाठी प्रोडक्टच्या,वस्तुंच्या मुळ किंमतीसोबत अतिरीक्त किंमत देखील मोजावी लागते.
● पण ॲमेझॉन प्राईमचे सबस्क्रिप्शन घेतल्यानंतर आपणास कुठल्याही प्रोडक्ट सर्विसची आॅनलाईन डिलीव्हरी हातात घेताना अतिरीक्त किंमत म्हणजेच एक्सट्रा चार्ज मोजावा लागत नाही.अणि आपला प्रोडक्ट देखील आपल्याला घरबसल्या वेळेत भेटुन जात असतो.
● ॲमेझॉन प्राईमची मेंबरशीप घेण्याचा अजुन एक फायदा आहे.म्हणजे समजा ॲमेझॉन कडुन लाईटनिंग डिल्स किंवा एखादी आॅफर सुरू झाली तर प्राईम मेंबरला हया डिलचा आॅफरचाअॅक्सेस प्राईम मेंबरशीप न घेतलेल्या सामान्य व्यक्तींच्या आधी प्राप्त होत असतो.याने डिस्काउंट प्रोडक्ट मर्यादित प्रमाणात उपलब्ध असले तरी आपणास त्याचा प्राईम मेंबरशीप घेतल्यामुळे सर्वप्रथम लाभ प्राप्त होत असतो.आपण प्रोडक्टच्या खरेदी पासुन वंचित राहत नसतो.
● यात युझर्सला प्राईम व्हिडिओ, प्राईम म्युझिक, प्राईम फोटो प्राईम रिडिंग हया सुविधा देखील प्राप्त होत असतात.
● यात आपण प्राईम व्हिडिओ वर कुठलाही चित्रपट टिव्ही शो वेबसीरीज बघु शकतो.
● ॲमेझॉन प्राईम म्युझिक दवारे आपण कुठल्याही जाहीरातीची अडचण न येऊ देता गाणे संगीत ऐकू शकतो.यासाठी आपणास अॅड फ्री स्ट्रीमिंग आॅशन निवडावे लागते.यात आपण विविध भाषेत गाण्यांचा आस्वाद घेऊ शकतो एकदा ऐकलेले गाणे आपण डाऊनलोड देखील करून ठेवू शकतो.
● ॲमेझॉन प्राईमचे सबस्क्रिप्शन घेणारया युझरला प्राईम फोटोची सर्विस देखील प्राप्त होत असते.यात आपण आपले महत्त्वाचे प्रायव्हेट फोटो आॅनलाईन स्टोअर तसेच सेव्ह करून ठेवू शकतो.
● ज्या प्राईम सबस्क्रिप्शन घेतलेल्या युजरला वाचनाची आवड आहे ते ॲमेझॉन प्राईम किंडल वरून ईबुक रीडींग करू शकतात.
ॲमेझॉन प्राईमचा लाभ कोणाला प्राप्त होणार आहे?
भारत देशातील जे नागरीक ॲमेझॉन वरून आॅनलाईन कुठलीही वस्तू मागवतात तसेच खरेदी शाॅपिंग करत असतात अशा व्यक्तींना ह्या फिचरचा खुप लाभ प्राप्त होणार आहे.
ॲमेझॉन कडुन युझर्ससाठी ६० दिवसांची फ्री ट्रायल सर्विस देखील सुरू करण्यात आली आहे.म्हणजे ॲमेझॉन प्राईमचा सभासद बनून आपण साठ दिवसांच्या कालावधीत फ्री मध्ये प्राईम फिचरचा फायदा उठवू शकतो.
साठ दिवसांनंतर देखील आपणास ह्या फिचरचा लाभ उठवायचा असेल तर काही विशिष्ट अमाऊंट आपणास पे करावे लागेल.
फक्त ॲमेझॉन वरून कुठलीही वस्तू खरेदी करताना आपण जी वस्तू खरेदी करतो आहे ती ॲमेझॉन प्राईम मध्ये येते की नाही याची आपण एकदा शहानिशा करून घेणे गरजेचे आहे.
आपण खरेदी करत असलेली वस्तू अॅमेझॉन प्राईम मध्ये येते की नाही हे चेक करण्यासाठी आपण ॲमेझॉन प्राईमचा लोगो चेक करू शकतो जर आपण खरेदी करतो आहे त्या वस्तुवर ॲमेझॉन प्राईमचा लोगो दिलेला असेल तर समजून घ्यायचे की आपण खरेदी करतो आहे ती वस्तू अॅमेझॉन प्राईम अंतर्गत येते.अन्यथा नाही.
ॲमेझॉन प्राईमची मेंबरशीप कशी घ्यायची?
सर्वप्रथम आपण ॲमेझॉन डाॅट इन ह्या वेबसाईटला व्हिझिट करायचे
वेबसाईट वर गेल्यावर आपल्याला ॲमेझॉन प्राईमचा एक लोगो दिसेल त्याच्याखाली ट्राय प्राईम नावाची एक लिंक आपणास उपलब्ध होईल.
त्यावर क्लिक करून आपण जिथे मेंबरशिप जाॅईनिंगचे आॉप्शन दिलेले असेल त्यावर जाऊन क्लीक करून मेंबरशिप घेऊ शकतो.फक्त यासाठी आपल्याला आपल्या अकाऊंट वरून लाॅग इन करायचे आहे.
यानंतर आपण ॲमेझॉन प्राईमच्या ६० दिवसांच्या फ्री ट्रायल सर्विसचा लाभ घेऊ शकतो.अणि साठ दिवसांच्या फ्री कालावधीनंतर याचे पेड सबस्क्रिप्शन देखील घेऊ शकतो.